मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश| एकादश किरण श्री माधवनाथ दीपप्रकाश अनुक्रमणिका आभार प्रथम किरण द्वितीय किरण तृतीय किरण चतुर्थ किरण पंचम किरण षष्टम किरण सप्तम किरण अष्टम किरण नवम किरण दशम किरण एकादश किरण द्वादश किरण त्रयोदश किरण चतुर्दश किरण पंचदश किरण षोडश किरण सप्तदश किरण अष्टादश किरण एकोनविंशति किरण विंशतितम किरणः एकविंशतितमः किरण दीपप्रकाश -द्वाविंशतितम किरण त्रयोविंशतितम किरण चतुर्विंशतितम किरण पंचविंशतितम किरण षड्विंशतितम किरण सप्तविंशतितम किरण अष्टविंशतितम किरण नवविंशतितम किरण त्रिंशत्तम किरण एकत्रिंशत्तम किरण द्वात्रिंशत्तम किरण त्रिस्त्रींशतितम किरण चतुस्त्रिंशतितम किरण पंचत्रिंशतितम किरण दीपप्रकाश - एकादश किरण Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India. Tags : granthamadhavanathmarathiग्रंथमराठीमाधवनाथ नामसप्ताह वर्णन Translation - भाषांतर श्रीसद्गुरुनाथायनमः --नमूं सकल कला विशारदा । सकल शास्त्र स्वयं - सिद्धा । सकळ विद्याधीश विद्यानंदा श्री सद्गुरु माधवा ॥१॥तुझ्या स्वरूप सागरांत । चिन्मय मोतीं असती अनंत । मज द्यावीं गा समर्था । आणोनियां ॥२॥मी धरणीवरी नेटकें । नाथा चालूं न शके । मज पोहणें ही न ठाउकें । मग बुडी कैसी देउं ॥३॥तरी तूंच नेई सागरांत । शिकवी बुडीचा सिद्धांत । मग मी शोधुनी त्यांत । काढीन मुक्त - शिंपलिया ॥४॥परी एवढेंचकरी श्रीहरी । मज नेई त्या भीतरीं । तुज कष्टवी ना हरी । यावीण ॥५॥तूं भक्ताकारणें कष्ट अनंत । केलेस आणि करिसी सतत । मग इतुकें सहज कष्ट । कां पां न घेसी ॥६॥मी तुझें मूढ लेंकरूं । दयाळा नको अव्हेर करूं । मज दाखवी ऐसा सागरू । प्रेमपूर्ण ॥७॥तव कृपेचा होतां उदय । प्रकाशलीं किरणें दहा । दाविला एकादश नवा । किरण उज्वल ॥८॥तव कृपेवीण हीं किरणे । ठायींच राहती गुप्तपणें । घालितों कृपेचे लेणें । अंगावरी ॥९॥घेतां कृपेचें वस्त्र । दिसली वाड्मयाची मूर्त । शब्दही असंख्यात । आठवूं लागले ॥१०॥मजपुढें येती शब्द सुंदरी । म्हणती आम्हांस घेई किरणावरी । झगडती एकमेकावरी । यावया प्रकाशांत ॥११॥ऐसें तव कृपेचें देणें । मज न घेववे चक्रपाणे । तव कृपेनेंच दीनवाणे । विचार मावळले ॥१२॥तव कृपेचें उपनेत्र । नेत्रीं लावितां मी खचित । आली दृष्टी अवचित । लेखनाची ॥१३॥ऐशी तव कृपा माउली । म्या सद्भावें अभिवंदिली । मग किरणप्रभा दाविली । रेखाटुनी ॥१४॥श्रीनाथ येतां नाशिकास । जाती श्रीगोपालदर्शनास । गोपालदास हे परमहंस । होते राममंदिरीं ॥१५॥न कळे त्यांचें मूळ ठिकाण । न कळे आले कोठून । राहती कर्दमी बसून । वर्षत्रय ॥१६॥येती कांहीं भाविक जन । त्यांचें शरीर टाकिती धुऊन । परि पुनरपि आळूचे कर्दमीं जाऊन । लाविती अंगीं मृत्तिका ॥१७॥होतां वर्षे तीन पुरीं । उभे राहती पूर्वद्वारीं । न बसतां भूमीवरी । एक वर्ष ॥१८॥ऐसें प्रखर तप आचरिलें । मग कांहीं भक्तांनीं विनविलें । द्यावें आसन येथें भले । पूर्व दिशाद्वारीं ॥१९॥ऐकिलें भक्तांचें वचन । गोपालें केलें आसन । पेटविलें धुनी साधन । निज सन्मुख ॥२०॥सदा राहे अफाट वृत्ति । दिगंबर नग्न मूर्ति । परि कोणाही न कष्ट देती । योगेश्वर ॥२१॥सर्व तेथेंच करिती विधि । परि न सुटे दुर्गंधी । जो स्वयेंच असे सुगंधी । तेथे घाण केंवी येई ॥२२॥सदा राहे आत्मस्थितींत । ओढी गांजाच्या चिलमा अनंत । त्यांत चरसादि घालित । ओढावया ॥२३॥सहस्त्राहुनी अधिक वेळी । महंत चिलीम उजळी । परि कोणीहि न देखिली । मूर्ती असावध ॥२४॥पाळी धेनूंचीं खिल्लारें । श्वानहि तेथें गुरगुरें । आनंदाविण दुसरें । कांही न सांपडे ॥२५॥होता सन्मुख एक स्तंभ । त्यास चर्चिला सिंदूर लांब । त्यातें नृसिंह हे नाम आरंभीं । ठेवी तो साधू ॥२६॥‘ जय नरसिंग ’ ही सदा ध्वनी । जन म्हणती त्या नरसिंग मुनी । करी अघटित करणी । नाथप्रभू सम ॥२७॥माधवनाथ गोपालदास । हे असती विष्णु महेश । परस्परांची परस्परांस । खूण प्रगटे सदैव ॥२८॥कित्येका पाठवी दासांकडे । दासही पाठवी प्रभूकडे । परस्परा सांगती रोकडे । खूण गोष्टी ॥२९॥यांच्या तारायंत्रा न लागे तार । अथवा तारांचे आधार । न लागती चाकर । अथवा एक पैसा ॥३०॥न लागे अर्धक्षण । अथवा काळवेळांचें कुंपण । विद्युल्लतेचें भरण । न लागे कृत्रिम ॥३१॥ज्यांनीं घेतली सृष्टीची तार । स्वये होती वीज प्रखर । खेळती मग कौतुककर । सदोदित ॥३२॥श्रीगोपालदासें अंधास । दिला दिव्य दृष्टी - प्रकाश । जाळिलें रौप्य - वचन पत्रकास । दिधलें धन अपार ॥३३॥कोणा म्हणे वाजवी बाजा । कोणास सांगे षड्जिन्यावरी जा । कोणासा बिल्वदलाचा मौजा । करी म्हणतसे ॥३४॥ऐसा गोपाळ महानुभाव । त्यास प्रत्यक्ष भेटूं ये नाथदेव । तो सोहळा अपूर्ण । वर्णवेना ॥३५॥ज्या ज्या भक्तें हें दृश्य देखिलें । धन्य तयांचे वंश भले । नाथसुता हें भाग्य मिळे । कृतार्थ मानी आपणांसी ॥३६॥नाथ येतां देखें दुरून । केलें परमहंसें हास्य - वदन । हांसतचि उभा राहून । मांडीवरी थाप ठोकिली ॥३७॥नाथें ठोकिले निजदंड । केला एक निनाद । गोपालनेंही तैसा स्वरभेद । केला निजमुखें ॥३८॥झाला हाचि संवाद । हेचि या संतांचे शब्द । याचा अर्थ बहु गोड । संतचि जाणती ॥३९॥दुसरी भेट म्यां पाहिली । ती अद्यापि मज दिसे उजळी । श्रीरामनवमीच्या वेळीं । जाई मंदिरी नाथजी ॥४०॥परमहंसें देखतां योगेश्वर । घेती हर्षानें कडेवर । नाचती रामासमोर । आत्माराम ॥४१॥दाविती एकमेकां वांकुल्या । हृदयाशीं कान लाविला । कंठीं हात घातला । योगेंद्रानें ॥४२॥न करितां भाषा सार । घेती आप आपुलें स्थल सत्वर । ऐशा भेटीचा अर्थ थोर । मज वर्णवेना ॥४३॥घेवोनी भाईची भेटी । हरिसिंग शिष्याचें गृहीं जाती । तेथें नवलाई दाविती निज लीलेची ॥४४॥नाशिकीं होते जहागिरदार । तयाचें नाम सुकेणकर । शरण येवोनी पायावर । म्हणे कृपा करावी ॥४५॥मम गृहीं तस्करांनीं । हरिलीं सुवर्णाचीं लेणीं । तीं द्यावीं आणोनी । नाथदेवा ॥४६॥हंसुनी म्हणे सद्गुरू । मी नव्हे तुमचा तस्करू । आम्हांवर हा आळ थोरू । नका ठेवूं ॥४७॥मी हृदयाची करितों चोरी । मज नका ठेवूं मायाबाजारीं । आमची चोरी जो उघड करी । तोचि साधू ॥४८॥ देखोनि भक्ताचें वदन । कळवळला दयाघन । वृक्षास ठोकितां खिळे तीन । चोरी तव मिळेल ॥४९॥तस्कर होईल बहुत घाबरा । येईल धांवत आपुल्या घरां । एकवीस दिवसांच्या अवसरां । मिळेल सर्व ॥५०॥मग त्या शिष्यातें सांगती । तव शरीराची न दिसे शुभ गती । तु ज्वर पीडा दृष्टी । दिसे भयंकर ॥५१॥परि चिंता मानसीं न करी । तुज रक्षीन मी ज्वरारी । ज्वर येतां एक कार्य करी । जे तुज सांगेन ॥५२॥आणोनी एक पेढा । शय्येजवळी ठेवी गड्य़ा । पिपीलिकांचा न लागला वेढा । जरी त्यासी ॥५३॥तूं निःसंशय रोगमुक्त । होशिल हें निश्चितार्थ । ज्या सहाय्यक प्रभू समर्थ । त्या दैन्य कोठलें ॥५४॥ऐसे देवे त्यासि कथिलें । दोन्ही संकट - पर्वत टाळिले । स्वतेजातें प्रगटविले । ऐशा प्रकारें ॥५५॥मिळालें त्याचें धन । पीडिला तापें दारूण । श्रीनाथदेवा स्मरून । ठेवी पेढा संनिध ॥५६॥मुंग्यांची झाली दाटी । परि त्या पेढ्यातें स्पर्शु न शकती । ही नवलाची रीती । दाविली नाथरायें ॥५७॥ विषमज्वरें पीडिला तो शिष्य । न राहिली कोणा आस । परी जगदीश तारील त्यास । माराया समर्थ कोण ॥५८॥त्याच गृहीं असता जगदीश । एक वर्तले नवल सुरस । होता एकादशीचा दिवस । संनिध शिष्य परिवार ॥५९॥श्री पांडुरंगाची कीर्ती । गात होती नाथमूर्ती । म्हणे भूलोकीच्या वैकुंठी । जावे सर्वांही ॥६०॥भूवरी असती अनेक क्षेत्रें । परी पंढरीची सरी न ये त्यातें । सदा नामाचा घोष जेथें । नाचती वारकरी ॥६१॥श्रीज्ञानदेव तुकाराम संत । श्रीएकनाथ दास समर्थ । हे चार मुनि निश्चित । भागवत सांप्रदायाचें ॥६२॥याही रचिले चार वेद । ज्ञानेश्वरी अभंगसमुद्र । भागवत श्रीदासबोध । ग्रंथराज ॥६३॥वेदांत सांगे अद्वैत । तेची प्रतिपादिती महंत । विशद करिती महाराष्ट्रात । ईशसंकल्पानुसार ॥६४॥नामघोष हे सोपे साधन । कलियुगी देई श्रीभगवान । यमनियमातें साधून । जपावे निशिदिनीं ॥६५॥जरि न साधे अभ्यासयोग । अथवा भक्ती - ज्ञान - वैराग्य । तरी अहोरात्र नामसंग । ठेवावा साधकें ॥६६॥ऐसे सांगे भक्तांसी । तो तेथे आला एक तापसी । वर्ण काळा ठेंगू ऐसी । मूर्ती त्याची ॥६७॥तो येतांच नाथें । दिधलें अपुले आसन बैसायाते । वंदिले तयाच्या चरणाते । नाथ रायें ॥६८॥सुचवी प्रिय पुत्रास । तुम्ही वंदावें या महाभागास । परि मूर्ती होई अदृश्य । द्वारातचि ॥६९॥कोणा नकळे मतितार्थ । सकल होती चकित । शून्य साम्राज्य पसरत । त्या स्थळी ॥७०॥नाथें लाविली होती समाधी । सोडिली क्षणैक उपाधि । उतरवी वायूची गादी । मग पाहे सन्मुख ॥७१॥म्हणे कोठें गेला सांवळा । ब्राह्मण वेषें जो आला श्रीपांडुरंग कैसा सजला । मनुज वेषें ॥७२॥तुम्ही त्यातें वंदिले । का भ्रांतीचें घेतलें जाळे । येंरूनीं सर्व सांगितलें । प्रभूचे खेळ ॥७३॥योगीराज मनीं हांसती । म्हणती पाहिजे तयास दृष्टी । मज विठ्ठल आज्ञापिती । करावा नामसप्ताह ॥७४॥ऐसे काढोनी उद्गार । जाहला पुनरपि स्थिर । तो येई एक चतुर । भाविक भक्त ॥७५॥त्या भक्तानें आम्रफळें । तीन आणिलीं भावबळें । कर जोडोनी विनविलें । घ्यावा स्वाद याचा ॥७६॥परि नाथ फळें न खाई । बर्फी पेढ्यांचे नावही नाही । भाताविण न ठावें कांहीं । अन्य पदार्थ ॥७७॥त्या भक्तातें आश्वासिलें । मज तुझें देणे पावले । परी स्वाद घ्यावा रसाळे । म्हणोनी हट्ट धरियेला ॥७८॥न जाई तो शिष्य । माझी पुरवा एवढी आस । घ्यावा अल्प मधुर रस । आम्रफळांचा ॥७९॥फळे असती बहूत मधुर । म्हणूनि आणिलीं गुरूवर । न चाखिता मज दुःख फार । होईल देवराया ॥८०॥देखोनी तयाचा पूर्ण हट्ट । घेई ती फळें नाथ । ओढोनि श्वास अमृत । अमृत फळें चाखी ॥८१॥एक फल देई भक्तास । दुसरें एका भ्रमित शिष्यास । जयाच्या मनी किंतुप्रवेश । झाला सद्गुरुविषयी ॥८२॥दोघें चाखितीं आम्रफळें । परि रूची कोणाही न कळे । हा आम्र कीं पपईचीं फळें । हेहीं नुमजे ॥८३॥प्रताप देखोनी ऐसा । लाजला मनीं भ्रमित शिष्य । म्हणे मी केले अन्यायास । क्षमा करावी दयाळा ॥८४॥न सांगतां न बोलतां । हरविला त्याचा दोष तत्वतां । तूं धन्य रे समर्था । योगीराया ॥८५॥तेथेंचि येती पळशेकर । नेती आपुल्या गांवीं गुरूवर । सप्ताहाचें स्थल रूचिर । नाथ मनीं ठसावें ॥८६॥सांगे सकल शिष्यातें । करावा नाम सप्ताह येथें फडकवूं दिंड्या पताकातें । ऐसें वाटे ॥८७॥आज्ञा होतां सद्गुरूंची । झाली आनंदी वृत्ति तयांची । बघोनी तिथी एकादशी । ठरविती निश्चय ॥८८॥आधींच ते शिष्य भक्तीचें वेल । त्यावरी नाथें सिंचितां जल । निज कर्त्यवास्तव प्रफुल्ल । कां न व्हावें ॥८९॥शक अठराशें तेवीस । होता शुक्ल ज्येष्ठमास । श्रीआई देवी पुढती श्रेष्ठ । करिती निश्चय सप्ताह ॥९०॥श्री आई देवी ही योगिनी । श्रीनाथ सांप्रदायी स्वामिनी । जी होती केवळ देवरूपिणी । जगदंबा ॥९१॥लावी समाधी अचल । राहे विरक्त केवळ । तूर्येचें चाखी जळ । ती चित्कला ॥९२॥देवीने जिवंत समाधी घेतली । परि सूक्ष्मरूपें अद्यापि सजली । भक्तें भावितां माऊली । भेट देई प्रेमानें ॥९३॥ऐशा पवित्र स्थलीं । नामाची गर्जना झाली । नाथमूर्ती सन्मुख बसली । श्रीदेवीच्या ॥९४॥’या नामसप्ताहाचा जनक । श्रीज्ञानेश्वर महाराज एक । केलें भारीच कौतुक । माउलीनें ॥९५॥अहोरात्र सात दि । करावें श्रीहरी स्मरण । हातीं टाळ वीणा घेऊन । नाचावें आदरें ॥९६॥न ठेवावें टाळ खालीं । अखंड नामगर्जना पाहिजे केली । नाना अभंगाची स्तोत्रावलि । गावी भक्तीनें ॥९७॥वाढविला भक्ती सांप्रदाय । करी सारे प्रेमी बांधव । ठेवी ऐक्यतेचा भाव । ज्ञानेश्वर ॥९८॥करावें गा अन्नदान । कोणाही न द्यावें परतून । जितुकें येतील संतजन । तितुक्या भोजन द्यावें ॥९९॥सर्व जळवळीचें गूज । ठेवी यांत ज्ञानराज । उघडोनी नयन सहज । पहावें श्रोतृजनीं ॥१००॥आमुच्या सद्गुरू नाथास । आवडे तोच सांप्रदाय विशेष । नामें रंगूनी जाई योगीश । रंगवी इतरां ॥१॥करी पंढरीची वारी । पंढरी ही त्याची प्रेम नगरी । नाचे श्रीविठ्ठला सामोरीं । आमुचा विठ्ठल ॥२॥केला नामसप्ताहाचा सोहळा । येई दशसहस्त्र मेळा । कोणी दर्शन कोणी । भजनाला । येती भाविक ॥३॥इतुक्याहि मिळे अन्नदान । देखोनी नाथ हास्यवदन । जेथें प्रत्यक्ष अन्नपूर्णा । तेथें अपूर्णता कैंचे ॥४॥जणूं पळशास आली पंढरी । येती दिंड्या वारकरी । भजनाची गर्दी सारी । चहूंकडे ॥५॥सप्ताह स्थळीं नसे रीघ । स्थापिती अनेक स्थलीं मग । श्रीहरि भजनाचें संघ । भजनास्तव ॥६॥न राहे एकहि घर । जेथें नसे नाम गजर । पळशाचें भाग्य थोर । झालें भू - वैकुंठ ॥७॥या सप्ताहीं आमुचा नाथ । सेवी अल्प दुग्ध मात्र । न खाई अन्न भात । भान नसे तयासी ॥८॥न निद्रा न विश्रांती । अहोरात्र नामाची महती । नामावीण नाथमूर्ती । अन्य भाषा न करीच ॥९॥नामचि देणें नाम घेणें । नाम हीच संध्यास्नानें । नाम हींच वस्त्र भूषणें । नाथें घेतली ॥११०॥नाम हेंच नाथा पाणी । नामाचेंच तांबूल वदनीं । नाम हीच पूजा मनीं । पूजे समयीं ॥११॥करी सर्व कर्मे यथास्थित । परी तीं नामगर्जनें सहित । देहीं असोनि विदेहस्थित । नाथ झाला ॥१२॥भक्त येती अनंत । अनंतपदीं मस्तक ठेविती । नामाचाच आशीर्वाद देती । सद्गुरू नाथ ॥१३॥भक्तमस्तकाचा भार । पडला नाथपदावर । स्फुरण पावले पद थोर । जणूं चिरोट्या ॥१४॥पाया सूज येई भारी । परी भजनरंगीं मुरारी । मग आई देवीते चिंता भारी । उद्भवली ॥१५॥देई एक भक्ता आभास । पाहीं सद्गुरूच्या पदास । भक्त म्हणे स्वप्न - भास । परी जाई गुरूपदीं ॥१६॥नवनीताहुनी कोमल पाय । केंवी भार सहन होय । तुटलें भक्तांचें हृदय । मग उचलिती नाथास ॥१७॥एका वृक्षावरी करोनी आसन । तेथें ठेविती भक्तभूषण । दुरोनी घ्यावें दर्शन । म्हणती भाविकांस ॥१८॥नाथा तुझी लीला अगोचर । करी कृति अगोचर । तीस भक्तमस्तकाचा भार । सोसवेवा ॥१९॥तूं अमरकंटकीं जासी । तैं कोमलत्व कोठें टाकिसी । रंभा पाटलाच्या । क्षेत्री वससी । माळ्यावर ॥१२०॥सूर्य सहस्त्र - किरणे तापला । तुज तापद न होई कोमला । भक्त - मधुपाचा योग कमला । तुज भार वाटला रे ॥२१॥चढसी सप्तश्रृंग - गड । तुडविसी वृक्ष - नद्या अवघड । तेव्हां तुझें कोमलपद । कोठें होतें सांग पां ॥२२॥नाथा तूं नससी नवनीत । नससी प्रस्तर सत्य । हाचि तव लीलेचा अर्थ । मज दावी ॥२३॥ऐसा सात दिवस सप्ताह झाला मग काल्याचा प्रसंग आला । केली प्रभूनें गोपाळलीला । ती ऐकावी सादर ॥२४॥नाथ झाला गोपाळ । भक्त होती धेनू सकळ । प्रेमें करी सांभाळ इंद्रिय - धेनूंचा ॥२५॥रात्रीं ठेवी गुरे बांधून । करावें रवंथ मना । देई हरिनामाचें तृण । भक्ती - जळ निर्मळ ॥२६॥मग होई गोपपाल । सद्भाव गोपांचा लडिवाळ । करी नाथ वेल्हाळ । नानापरी ॥२७॥दहीं दुग्ध हें चिद्रस । लुटायातें नेई त्यांस । चुकवी वृत्ती गोपींस । देई प्रिय भक्तांसी ॥२८॥या रसी स्वरूपलाह्या । मिळवी माझी तात माया । मृत्तिकेच्या घटीं बांधोनियां । ठेवी पंचतत्व मंडपीं ॥२९॥मग बोले प्रिय भक्तास । घ्यावे निश्चय - दंडास । फोडोनि घट सावकाश । लुटा लाह्या सत्वर ॥१३०॥हाच प्रभूनें काला केला । तो सर्व भक्तांनी घेतला । आनंद - वायू विरहला । चिदाकाशीं ॥३१॥मग ब्राह्मण - संतर्पण । सर्व संतांसीं भोजन । न कळे किती सहस्त्र खूण । पंक्तीची या ॥३२॥न मिळती विशाळ पात्रें । केले चुन्याचें हौद नाथें । द्वि - सहस्त्राचे अन्न तेथें । शिजविलें ॥३३॥तीर्थाचें केलें सिंचन । सांगे सर्व ग्रामा द्यावें भोजन । पंचक्रोशींचे सर्व जन । आणावें भोजना ॥३४॥तो यवन वा महार । होवो अथवा चर्मकार । कोणी न खावी भाकर । आज गृहीं ॥३५॥ऐसी द्वाही फिरवावी । स्वयें आमंत्रणें ही द्यावी । कोणीही न बोलावीं । दुरूत्तरें ॥३६॥ऐसी कडक आज्ञा केली । भक्तांनी संतोषें पाळिली । वीस सहस्त्र पानें जेविली । नाथ प्रसादें ॥३७॥इतुके जेविले संतजन । परी अन्न परिपूर्ण । दूसरे दिनीं देती भोजन । पशु - समुदाया ॥३८॥ऐसें अपूर्व नवल केलें । सर्व जन पूर्ण धाले । मग नाथें सोडिलें । सप्ताह पारणें ॥३९॥पुरविली भक्तांची कामना । केली कौतुक सीमा नारायणा । किती गावें तुज सुजाणा । हें न कळेची ॥४०॥या भक्तसमुदायांत । मल्हारबोवा नामें वर्तत । जो सत्वगुण मूर्तिमंत । त्यावरी नाथ कृपा करी ॥४१॥केलें त्यास अनुग्रहीत । घातली माळा गळ्यांत । चालवी सप्ताहाचें व्रत । भक्तराया ॥४२॥ऐसा आशिर्वाद देउनी । शिरीं ठेविलें कर दोन्ही । ओतिला रस हृदयभुवनीं । त्या भक्ताच्या ॥४३॥शिष्य होता शुद्ध लोखंड । त्यांत मृत्तिकेचा नव्हता संबंध । म्हणोनि परिस लागतां लोखंड । सोनें जाहलें ॥४४॥मल्हारीनें भक्ति मुक्ति । घेतल्या अपुल्या सवें युवती । द्वैत निशाचरा पदीं तुडविती । बसती प्रेम - पठारीं ॥४५॥मल्हारबोवा नाथ कीर्ति । वाढविती अखिल महाराष्ट्री । वैदर्भ - प्रांतीं हा भक्त सुमती । करी नामसप्ताह ॥४६॥दुसरा शिष्य काशीनाथ । तयाच्या शिरीं ठेवी हस्त । सांगती योगक्रिया उचित । हो भजनानंदीं ॥४७॥शिंपी जातीचा तो भक्त । जानोरीगांवी सदा वसत । केली तयानें मात खचित । निज देहाची ॥४८॥ती कथा पुढील किरणीं । करावी श्रवण संतांनी । तेथेंही अनेका भजनीं । लावील नाथ ॥४९॥श्रीनाथ हा निर्मल आरसा । त्यांत पाहील जो जैसा । दिसेल त्यांत तैसा ठसा । घ्या तयासी ॥१५०॥श्रीनाथ ही शुद्ध गंगा । तीमाजीं मिळवितील ज्या रंगा । तोच खुलवीत अंतरंगा । साधकाच्या ॥५१॥श्रीनाथ हें केवळ गगन । तेथें विलसती अनंत उडुगण । जैसा कृतीप्रकाश तैसें स्थान । मिळे तयासी ॥१५२॥ इति श्रीमधवनाथदीपप्रकाशे नाथसुविरचिते श्रीनामसप्ताहवर्णनं नाम एकादश किरणः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP