मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह|
ललितानंद

ललितानंद

विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.


मंजीरध्वनिभूषणी, शुभमणीसद्रत्नहारोत्कटी,
स्फूर्जत्सिंहकटी, घनस्तनतटी, सत्कंचुकीगोमटी,
नीलेंदीवरकांति, मीननयना, श्रीमद्गिरींद्रात्मजा,
शंभुज्ञानकळा, विलासकुशळा, कैवल्यलक्ष्मीध्वजा,  १
श्रीदत्ताख्य परंपरा गुरुकुळीं आनंदनाथावळी,
नित्यानंदपरानुरक्त विमळानंदाख्य या भूतळीं
तत्पादाब्जषडंघ्रिचित्त ललितानंदाननें सुंदरी
बोले प्राकृत हे टिका स्विकारणें राहूनि हृत्कंदरीं.  २
वाग्देवी ममहृत्सरोजनिहिता बोधी, अरे बाळका,
मद्वत्सा, भ्रमसी वृथा भववनीं, ना जाणसी काळ कां ?
नाशी जन्म, जरा, त्रिताप समुळीं श्रीमत् शिवा सुंदरी.
तत्पादाब्जामिलिंदचित्त करणें मांगल्य अत्यादरीं.  ३
श्रीशंकराचार्यवाणी मणीमंदिरीं
संस्थिता श्रीराजराजेश्वरी सुंदरी
तत्पादांभोज पुष्पांजळी अर्पणी
श्रीवरिवर्ति हो अर्पितां स्रग्विणी.  ४
कवी गौरीकांतें विवरणसमीचीनरचना
पदव्यक्ती केली कविबुधवरग्राह्यवचना.
महाराष्ट्री भाषा उघड हृतभूषा वधु जसी,
परी तात्पर्याथें अभिक पुरुषां योग्यचि तसी.  ५
जसीं गोधूमान्नें रुचिर हरिणाक्षी, सुगरणी
करीती स्वादार्थे विविधअभिधें आकृतिगुणीं,
परीक्षा शब्दार्थे बुधवर सती जाणुनि मनीं
रुए तें तें अंगीकृति करिति साष्टांग नमनीं.  ६
अहो मार्गीं कांटे अवचट निमित्तेंचि पडती,
कृपाळू ते साधूजन उपकृती दूर करिती.
तसे दोषारोपें प्रतिजनक जे कंटक पदीं
तरी ते काढावे विमळपथिं सौंदर्यसपदीं.  ७

इति श्रीमत्सकलाम्नायदीक्षशिक्षाविचक्षणविद्वद्वृंदविनुतचरणनिरामांतामृताब्धिनंदिनीनिवृत्तिलक्ष्मलक्ष्म्यालिंगितविग्रहश्रीमन्नित्त्यानंदशिष्यश्रीविठ्ठलानंदचरणावरविंदमिलिंदीकृतमानसललितानंदविरचिता श्रीसौंदर्यलहर्या विवृत्ति: समाप्तिमगमत् ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP