मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह| संतप्रताप स्फुट कविता संग्रह गंगाष्टक उद्धवचिद्धन जयरामसुत शिवराम संतनामावळी उद्धवसुत सिद्धचैतन्य कपोताख्यान सुदामचरित्र ॐ नमो भगवते वासुदेवाय व्यंकटेशस्त्रोत्र श्रीमल्लारीस्तोत्रराज श्रीराम जयराम जयजयराम स्तोत्र श्रीविठ्ठलस्तोत्र सांबशिवाष्टक देवीअष्टक श्रीसांबशिवध्यान श्रीमहालक्षीस्तोत्र श्रीगुरुस्तव द्रौपदीवस्त्रहरण पुंडलीकचरित्र पारावतचरित्र सोमवारचरित्र सीताकल्याण रुक्मिणीस्वयंवर पंचाक्षरीमाहात्म्य चंडेश्वरकथा उपमन्युचरित्र ध्रुवचरित्र मार्कंडेयचरित्र गजमुखचरित्र राधाविलास नौकाचरित्र संतप्रताप प्रश्नमालिका गजेन्द्रमोक्ष लघुबोध सौंदर्यलहरी रसमंजरी गर्भगीता कपोताख्यान बापूवामन निरंजनमाधव ( बनाजी ) निरंजनमाधव ( बनाजी ) निरंजनमाधव ( बनाजी ) निरंजनमाधव ( बनाजी ) निरंजनमाधव ( बनाजी ) निरंजनमाधव ( बनाजी ) निरंजनमाधव ( बनाजी ) श्रीसांबशिवध्यान निरंजनमाधव ( बनाजी ) निरंजनमाधव ( बनाजी ) रामसुतात्मज वीरेश्वरकृत वीरेश्वरकृत वीरेश्वरकृत वीरेश्वरकृत वीरेश्वरकृत वीरेश्वरकृत वीरेश्वरकृत वीरेश्वरकृत नरहरितनयकृत नरहरितनयकृत वीरेश्वरकृत आनंदतनय श्रीधरस्वामीकृत वीरेश्वरकृत नारायण मौनी ललितानंद ललितानंद ललितानंद भैरव गर्भगीता संतप्रताप विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या. Tags : poemकविताकवीकाव्यगीतमराठीश्रीधरस्वामी श्रीधरस्वामीकृत Translation - भाषांतर अपार महिमा । संतांचा वर्णवे कोना ? ॥ध्रु०॥आचार्य शंकर जाण, । देवी देत स्तनपान,मतें उच्छेदी संपूर्ण. ॥१॥हस्तामळक सज्ञान । अष्टावरुषें मोहन ।बोले आचार्यास देखोन. ॥२॥कलियुगीं हरिनाथ । अवतरला रमाकांत. ।मांडीवरि श्रीपद दावित. ॥३॥जयंतपाळें ब्राह्मण । कोंडिले हें जाणोन । मुकुंदराजें प्रगटिलें ज्ञान. ॥४॥ पशुमुखें वेदध्वनि । करविली प्रतिष्ठानीं, ।ज्ञानेश्वर ज्ञानाची खाणि. ॥५॥चौरंग करूनि सत्य । मारिला जो राजसुत, ।उठवित गोरक्षनाथ. ॥६॥मातेच्या वचनें बोध, । वैराग्य धडधडित शुद्ध, ।महाराज राजा गोपीचंद. ॥७॥महामुद्गल देखोन । करींचा पांवा टाकून ।घेत हातीं धनुष्यबाण. ॥८॥बिल्वमंगळ रामाहातीं । मुरली धरवी प्रीती; ।अयोध्येंत केली हे ख्याति. ॥९॥मिराबाईचें विष । प्याला जगन्निवास; ।गोष्टि हे ठाउकी सर्वांस. ॥१०॥नृसिंह मेहता महाभक्त । हुंडी त्याची भगवंत ।द्वारकेमाजी भरित. ॥११॥भानुदासाच्या गळां । घातला कंठींच्या माळा, ।आंग रगडिलें ते वेळां. ॥१२॥महारामेश्वर भक्त, । राम झाल त्याचा सुत; ।नंदादीपा तेल आणित. ॥१३॥एकनाथाचे घरीं । कावडी वाहत हरि; ।चमत्कार दावी मुरारि. ॥१४॥वधून टाकिली गाये । नामदेव हरीस बाहे. ।उठविली सवेंचि लाहे. ॥१५॥पद्मावतीचे प्राण । गेले होते निघोन. । जयदेवें आणिले परतोन. ॥१६॥धाना जाटाचें शेत । पेरी स्वयें भगवंत. ।तुकोबाच्या वह्या राखित. ॥१७॥जसवंतास नवज्वर । जाला असतां फार, ।जानकीनें पाजिलें नीर. ॥१८॥अच्युताश्रमाचा नेम । सर्वां हातीं म्हणवीं राम. ।भक्त भेटला नि:सीम. ॥१९॥विठ्ठल पुरंदर । उघडिलें त्यास द्वार. ।सुरदासा दिधले नेत्र. ॥२०॥सेउ सीतम महाभक्त । अन्न देतीदुष्काळांत; ।भगवंतें पाहिला अंत. ॥२१॥कबीर निजधामा जात, । माघें न दिसेच प्रेत ।पुष्पें आणि तुळसी होत. ॥२२॥ध्यानीं ब स सेना भक्त, । त्याचें रूप राम धरित.रायासीं, हो, तेल मर्दित. ॥२३॥रोहिदास सप्रेम । फिरोनि ये शालिग्राम; ।भावाचा भोक्ता श्रीराम. ॥२४॥कूर्मदास नाहिंत पाये, । विठोबा भेटीस जाये. ।सांवत्याचे पोटीं सामाये. ॥२५॥कुल्लाळ गोरा भक्त, । तोडून घेतलेल हात; । पंढरिये पुढती फुटत. ॥२६॥सतीदास मयराळ बाळ; । निश्चय देखोन निर्मळधांवली रुक्मिणी वेल्हाळ. ॥२७॥नागोबा जनमैत्र; । व्याघ्ररूपें त्रिनेत्र ।भेटला, हें मोठें चरित्र. ॥२८॥चांगदेवें आपली । मोठ दृढ बांधिली. । पांडुरंगें हृदयीं धरिली. ॥ २९॥नरहरी सोनारें । कडदोरा घडिला, खरें. ।विठोबाचे माजीं न पुरे. ॥३०॥अनामिक चोखामेळा । ब्राह्मणीं दवडिला; ।विठोबा त्यालागीं फिरला. ॥३१॥जालया समाधिस्त । दर्शन दे रंगनाथ. ।कीर्तनेंचि समंध मुक्त. ॥३२॥तोडून आशापाश, । सर्वदाही उदास, ।महाराज स्वामी रामदास. ॥३३॥देखोन गुरुभक्त । वृंदावन डोलत; ।आनंदमूर्ति तो समर्थ. ॥३४॥जयरामस्वामी संपूर्ण, । पांडुरंग प्रसन्न; ।करविलें श्रीकृष्णदर्शन. ॥३५॥ब्रह्मानंद समाधिस्थ । जाल्या, बाहे येक भक्त; ।‘ वो ’ ऐसी ध्वनि उठत. ॥३६॥असोत आतां बहुत भक्त; । वर्णितां नलगेच अंत. ।ब्रह्मानंदरूप समस्त. ॥३७॥श्रीधरें प्रेम गुणीं । संतमाळल गुंफूनि, ।गळां घाली दिवसरजनी. ॥३८॥अपार महिमा । संतांचा वर्णवे कोणा ? ॥ध्रु०॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP