मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीरंगनाथस्वामी| स्फुट पदें ५१ ते ५८ श्रीरंगनाथस्वामी प्रस्तावना आणि चरित्र श्रीगुरुगीता रामजन्म अध्याय १ ला रामजन्म अध्याय २ रा गजेंद्रमोक्ष निजानंदसाधने सुदामचरित्र शुकरंभासंवाद पंचीकरण मिथ्या माया स्वरूप ओंव्या बद्धमोक्षविवरण स्फुट पदें १ ते ५ स्फुट पदें ६ ते १० स्फुट पदें ११ ते १५ स्फुट पदें १६ ते २० स्फुट पदें २१ ते २५ स्फुट पदें २६ ते ३० स्फुट पदें ३१ ते ३५ स्फुट पदें ३६ ते ४० स्फुट पदें ४१ ते ४५ स्फुट पदें ४६ ते ५० स्फुट पदें ५१ ते ५८ मार्तंडाष्टक करुणाष्टक श्लोकपंचक गरुडसत्यभामागर्वहरण स्फुट पदें ५१ ते ५८ रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला. Tags : ranganath swami poemकवितामराठीरंगनाथ स्फुट पदें ५१ ते ५८ Translation - भाषांतर ५१.भाव धरा भजन करा हरिचें । तारूं हें भवसागरिंचें । विविध कटकीं कनक । एक तें जसें ताईत कडें हो सरीचें ॥ध्रु०॥ श्रीहरिभक्तिची मुक्ति दासी अंकिली नव जाय जरी टाकिली । भजनभानुची दीप्ती मुक्ती हे कैसी जाईल ते झांकिली ॥१॥ नवविधा श्रवण कीर्तन स्मरण चरणसेवन । अर्चन वंदन दास्य अनन्य । लवणजाळा सख्य दीपीं कर्पुरें केलें आत्मनिवेदन ॥२॥ या रिती करिति भजन भावभक्तियुक्त ते । पूर्णलक्षणोक्त सहजिं सहज निजानंदें रंगले त्यासि शरन नित्य मुक्त ते ॥३॥५२.बाई माझें मानस मोहिलें येणें ॥ध्रु०॥ स्वर्ग मृत्यु पाताळीं । भूमंडळीं जळीं स्थळीं । हरिविण कांहिंच नेणें ॥बाई०॥१॥ संकल्प विकल्प मावळले । स्वस्वरूपीं मीळाले । खुंटलें येणें जाणें ॥बाई०॥२॥ द्वैतसंग भंगला । निजानंद रंगला । देही म्हणावें कोणें । बाई माझें मानस मोहिलें येणें ॥३॥ ५३.मांडी थापटोनी जाण । रिघे देवासीं शरण तरी नरनारायण । तोचि सहज आहे ॥१॥ करील तें नोव्हे काय । विश्व वंदी त्याचे पाय । स्वर्गीम देवसमुदाय । सर्व तटस्थ राहे ॥२॥ स्वयें चारी मुक्ती दासी । होवोनीयां अहर्निशी । दास्य करिताती त्यासी । वक्र कोणी न पाहे ॥३॥ झाला निर्गुण निष्काम । तेव्हां तोचि आत्माराम ॥ दृश्य दृष्टी रूप नाम । परी मनुष्य नोव्हे ॥४॥ विद्वद्वर्य साधुसंत । पूर्ण ब्रह्म मूर्तिमंत । ज्याच्या स्वानंदाचा अंत । ब्रह्मादिकां नाकळे ॥५॥ सत्य वैकुंठ कैलास । जे जे तेथील विलास । त्यांचा नाहीं अभिलाष । जे उदास मोकळे ॥६॥इंद्रपदींचे जे भोग । मानीती ते क्षय रोग । नित्य निजानंदीं योग । भोगिताती सोहळे ॥७॥ सर्व संगीं जे नि:संग । नित्य अक्षयी अभंग । निजानंदें पूर्ण रंग । वर्म त्यांसीच कळे ॥८॥५४.माझ्या भक्तांचीं नामें, वाचे गाऊं सप्रेमें । नामसंकीर्तनीं तांडव कृष्णें, म्यां नाचावें निष्कामें ॥ध्रु०॥ अर्जूनाचीं घोडीं धूतसे आवडी, होवोनियां चतुर्भूज । धर्माचिया घरीं उच्छिष्टें काढी, सोडोनियां सर्व लाज । द्रौपदीचा धांवा ऐकोनिया झालें, काय सांगों तें मी चोज । बळिच्या द्वारीं द्वारपाळ झालों, भक्ताभिमानी मी सहज ॥माझ्या०॥१॥ अंवऋषीसाठीं गर्भवास दहा, सोसिलें म्यां नारायणें । प्रल्हादाकारणें अवतरलों तेव्हां, विश्व झालें सुखी तेणें । अनंत मी माझ्या अनंत विभूती, संख्या केली त्यांची कोणें । कलियुगीं हरिभक्तांच्या नामस्मरणें, पतीतपावन झालों तेणें ॥माझ्या०॥२॥ मुकुंदराज गहिनी निवृत्ति, ज्ञानेश्वर सोपान मुक्ताई मुक्त । भानूदास नामा तुकोबा मृत्युंजय, प्रतिष्ठानीं एकनाथ । कृष्णदास जयराम केशवराज आनंदमूर्ति साधु संत । निजानंदें रंग रंगले ते युक्त, भक्त मुक्त ज्ञानवंत । माझ्या भक्तांचीं नामें, वाचे गाऊं सप्रेमें । नामसंकीर्तनीं तांडव कृष्णें, म्या नाचावें निष्कामें ॥३॥५५.भज गोविंदा, सांडुनि सकळहि धंदा, रे मतिमंदा ॥ध्रु०॥ नरतनु प्राप्त अकल्पित पाहीं । परि क्षणभंगुर संशय नाहीं । आयुष्य जातसे लवलाहीं । धरिं हरिपदारविंदा ॥भज गोविंदा०॥१॥ आसुरि कामादिक परवीर । मोठे मारक महाशूर । करिती स्वहिताचा चकचूर । तुझिया पेटले द्वंदा ॥भज गोविंदा०॥२॥ निगमाचार्य निजसंमत्तें । विवेकवैराग्याच्या हातें । त्यागुनि विषवत या विषयांतें । सेवीं परमामृतकंदा ॥भज गोविंदा०॥३॥ श्रवण कीर्तन विष्णुस्मरण । पादसेवन अर्चन वंदन । दास्य सख्य आत्मनिवेदन । या प्रिय भक्ति मुकुंदा ॥भज गोविंदा०॥४॥ संशय अवघा हृदयीं आठवीं । अनन्यभावें हरिगुरुपायीं ॥ रंगुनियां शरण जाईं । सहज पूर्ण निजानंदा ॥ भज गोविंदा, सांडुनि सकळहि धंदा, रे मतिमंदा ॥५॥५६.लाभालाभीं संतोष खेद न मानिती ॥ध्रु०॥ ज्ञानी निजलाभें संपन्न । जैसें ध्रुवा अक्षय स्थान । क्षीरसागरीं उपमन्य । कांजी न वांछी सहसा ॥लाभालाभीं०॥१॥ दिनमणि सन्निध आलें गेलें । दीप आणिलें वा मालविलें । तेणें न्यून पूर्ण झाले । प्रताप काय रवीचे ॥लाभालाभीं०॥२॥ जग मृगजल हें नसतां दिसे । दृश्य दृष्टी भास भासे । कर्पुरदीपीं जैसा तैसे निजानंदीं रंगलें ॥ लाभालाभीं संतोष खेद न मानिती ॥३॥५७.राममय वृत्ती झाली आतां काय उणें । अहंकारदग्ध झाला स्वात्मसुख घेणें ॥ध्रु०॥ ज्ञानदीप लावुनियां तमनाश केला । मजमाजी पाहतांचि स्वप्रकाश झाला ॥राममय०॥१॥ जीवऐक्य जालें जगत् ब्रह्म दिसे । पशु पक्षी नाना याती एकाकार भासे ॥राममय०॥२॥ बोलि बोलुनि मुनि गेले आतां काय बोलूं ॥ पूर्ण शेजेवरि निजरंगी रंगुनि लोळूं ॥ राममय वृत्ती झाली आतां काय उणें । अहंकारदग्ध झाला स्वात्मसुख घेणें ॥३॥५८.जडली गुरुचरणीं आवडी । स्वानंदाची उभविली गुडी ॥ध्रु०॥ स्वरूपाची प्राप्ती झाली । ममता गेली समता आली । षड्वर्गाची बोहरी केली । आशा तृष्णेसहीत ॥जडली०॥१॥ भेद झाला पाठीमोरा । गुणदोषांचा नलगे वारा । विश्वीम देखे विश्वंभरा । नाहीं थारा भ्रांतीसी ॥जडली०॥२॥ दया वाढली अपार । निंदा द्वेष झाला भार । विवेक वैराग्य निर्धार । हे साचार बळावले ॥जडली०॥३॥ सदा संतोषेसीं खेळ । नवविधारी गदा रोळ । निरावकाश सुखकल्लोळ । काळ वेळ नाठवे ॥जडली०॥४॥ भोगमोक्षीं वीतरागी । शांति बाणली सर्वांगीं । निजानंदरंगसंगीं । ब्रह्मयोगी विराज तूं ॥ जडली गुरुचरणीं आवडी । स्वानंदाची उभविली गुडी ॥५॥ N/A References : N/A Last Updated : December 16, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP