मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीरंगनाथस्वामी| स्फुट पदें १६ ते २० श्रीरंगनाथस्वामी प्रस्तावना आणि चरित्र श्रीगुरुगीता रामजन्म अध्याय १ ला रामजन्म अध्याय २ रा गजेंद्रमोक्ष निजानंदसाधने सुदामचरित्र शुकरंभासंवाद पंचीकरण मिथ्या माया स्वरूप ओंव्या बद्धमोक्षविवरण स्फुट पदें १ ते ५ स्फुट पदें ६ ते १० स्फुट पदें ११ ते १५ स्फुट पदें १६ ते २० स्फुट पदें २१ ते २५ स्फुट पदें २६ ते ३० स्फुट पदें ३१ ते ३५ स्फुट पदें ३६ ते ४० स्फुट पदें ४१ ते ४५ स्फुट पदें ४६ ते ५० स्फुट पदें ५१ ते ५८ मार्तंडाष्टक करुणाष्टक श्लोकपंचक गरुडसत्यभामागर्वहरण स्फुट पदें १६ ते २० रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला. Tags : ranganath swami poemकवितामराठीरंगनाथ स्फुट पदें १६ ते २० Translation - भाषांतर १६.तो एक निजयोगी, निजयोगी । परदारा स्वयें स्वयें भोगी ॥ध्रु०॥ निशंक मात्रागमनी, भक्षी अभक्ष्य शंका नमनी ॥तो०॥१॥ गोवध घडला ज्याला, नित्य सुरापान जो प्याला ॥तो०॥२॥ निजरंगीं रंगेला, अपुले उगमीं संगम जाला ॥ तो एक निजयोगी, निजयोगी । परदारा स्वयें स्वयें भोगी ॥३॥१७.बोल रे बोल कान्हा । काय बोलसी निजनयना ॥ध्रु०॥ बोल बोलवीत कोण । बोल उद्भवला कोठून । त्याचे एकांतीं आहे कोण । त्याचा न कळे महिमान ॥बोल रे०॥१॥ कृष्ण म्हणे अहो आई । मूळ शोधोनियां पाहीं । निजमूळ पडतां ठायीं । चुकेल जन्ममरण ॥बोल रे०॥२॥ निजरंगी रंगतां तद्रूप । पाह्तां सद्गुरुपूर्णस्वरूप । आपेंआप होइंजे । बोल रे बोल कान्हा । काय बोलसी निजनयना ॥३॥१८.बापा तें नोहे, तें नोहे । व्यर्थचि श्रमि कां व्हावें ॥ध्रु०॥ साधुनि आसन मुद्रा, । शब्दज्ञाना बोलति क्षुद्रा ॥बापा०॥१॥ नवरस करूनि कवि, । पोटासाठीं सोंगें दावी ॥बापा०॥२॥ म्हणती काळें पिवळें । दाबुनि धरिती बळकट डोळे ॥बापा०॥३॥ बळेंचि शिष्य करिती । विशाळ यंत्रांतें पसरिती ॥बापा०॥४॥ व्यर्थचि टिळाटोपी । समाधि म्हणूनि जाती झोंपी ॥बापा०॥५॥ निजरंगीं रंगलें । रंगुनि रंगपणा मावळलें ॥ बापा तें नोहे, तें नोहे । व्यर्थचि श्रमि कां व्हावें ॥६॥१९.भवजलनिधितरणोपाया, श्रीहरिचे गुणगण नौका ॥ध्रु०॥ अरे नाना चरितें श्रीहरिलीला । दूरि करिति कलीला । ऐसें जाणुनि नवघननीला । न भजसि दु:शीला । विषयीं रत होउनि अनुदिनिं पडलासी । धिग् धिग् तूं नरकीं बुडसी । वावुगी मानुनि शंका ॥भव०॥१॥ तरले जन हे हरिभजनेंकरुनी । सद्भावा धरुनी । रमती हरिचरणीं ममता हरुनी । चिन्मयपद धरुनी । दीक्षा लावुनि ते मुमुक्षु भजनीं । लाविति मन अनुदिन रजनी । प्रक्षालुनि संसृतिपंका ॥भव०॥२॥ कैंचा भवसागर कैंची माया । जड जीव श्रमाया । स्वप्नीं गृह सुत पति कांचन जाया । चित्रतरूची छाया । मिथ्या सर्वहि पूर्ण प्रबोधीं । रंगीं रंगला निजानंदीं । निस्तरुनी भवभयशोका । भवजलनिधितरणोपाया, श्रीहरिचे गुणगण नौका ॥३॥२०.जें जें झालें दैवयोगें । तें तें योगी मानी हें वावुगें ॥ध्रु०॥ सुखदु:खात्मक देह वळखुनी । चित्त स्वरूपीं स्थिर करि वळुनी । चंद्र जसा निश्चळ परि गगनीं । फिरें जेंवि अभ्रयोगें ॥जें जें०॥१॥ अज्ञदशे जें कर्म निपजलें । कर्ता मी हें म्हणुनि वाटलें । उसनें त्या मापें फेडियलें । भोक्ता अहं योगें ॥जें जें०॥२॥ यापरि योगी सांडुनि शोका । नुपेक्षी गृहवासनादिकां । सहज निजरंगीं रंगूनि सम्यका । झाला किंतया आंगें ॥ जें जें झालें दैवयोगें । तें तें योगी मानी हें वावुगें ॥३॥ N/A References : N/A Last Updated : December 16, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP