मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीरंगनाथस्वामी| स्फुट पदें ४६ ते ५० श्रीरंगनाथस्वामी प्रस्तावना आणि चरित्र श्रीगुरुगीता रामजन्म अध्याय १ ला रामजन्म अध्याय २ रा गजेंद्रमोक्ष निजानंदसाधने सुदामचरित्र शुकरंभासंवाद पंचीकरण मिथ्या माया स्वरूप ओंव्या बद्धमोक्षविवरण स्फुट पदें १ ते ५ स्फुट पदें ६ ते १० स्फुट पदें ११ ते १५ स्फुट पदें १६ ते २० स्फुट पदें २१ ते २५ स्फुट पदें २६ ते ३० स्फुट पदें ३१ ते ३५ स्फुट पदें ३६ ते ४० स्फुट पदें ४१ ते ४५ स्फुट पदें ४६ ते ५० स्फुट पदें ५१ ते ५८ मार्तंडाष्टक करुणाष्टक श्लोकपंचक गरुडसत्यभामागर्वहरण स्फुट पदें ४६ ते ५० रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला. Tags : ranganath swami poemकवितामराठीरंगनाथ स्फुट पदें ४६ ते ५० Translation - भाषांतर ४६.हें मज कळलें हो, कळलें हो । तरीच मन हें वळलें हो ॥ध्रु०॥ इतर साधनें तैशीं । छाया चित्रतरूची जैशी ॥हें मज०॥२॥ वाचे नाचे नाम । तो निजरंगें आत्माराम ॥ हें मज कळलें हो, कळलें हो । तरीच मन हें वळलें हो ॥३॥४७.अझुनी जागी नव्हेसि कंठ शोकला वो माय । कां केला अव्हेर किंवा झालें तुजला काय ॥ध्रु०॥ श्रीरंगें माझे माते । तान्हें मी एकुलतें । पुर्यष्टकपाळण्यांत मजला घातलें कां ह्मतें । सहजसमाधीशेजे निजलिस स्वस्थ चित्तें । उठिं देईं स्तनपान क्षुधा लागली वो मातें ॥अझुनी०॥१॥ देहअहंकार हा वैरी । असुरी गुणमयि याची जाया । यापासुनी जाले रजतम । त्यांनीं विसंचिली मम काया । पाळण्यांतुनी काढुनि नेईं सत्वर मज निजठायां । जागी हो जननिये विलंब न करीं पुरवीं थाया ॥अझुनी०॥२॥ धांवा ऐकुनि श्रवणीं जागी होउनि श्रीगुरुमाता । निजानंदें रंगुनि मनिंची हरिली ममता चिंता । वोसंगा घेउनियां परमामृतपयपानें आतां । नित्य तृप्त मज केलें तेणें झाली सर्वही समता । अझुनी जागी नव्हेसि कंठ शोकला वो माय । कां केला अव्हेर किंवा झालें तुजला काय ॥३॥४८.तरीच सार्थक झालें आल्या मानवजन्माचें । ब्रह्मार्पणबुद्धि फल पावसि केल्या कर्माचें ॥ध्रु०॥ अक्षयि सुख पाहिजे तरी हरिभजानेंच लागावें । सच्छस्त्रसंगमीं संतसमागमिं अखंड जागावें । विषवत मारक जाणुनियां विषयांतें त्यागावें । अहंममतेतें निरसुनि शाश्वत निजसुख भोगावें ॥तरीच०॥१॥ विहिताचरणें हरिगुरुस्मरणें मानवाची काया । हेळामात्रें तरणें हरिची दुस्तरतर माया । विषयांचें सुख तैसें जैसी चित्रतरूची छाया । क्षणभंगुर जड दृश्य विकारी हें जाइल विलया ॥तरीच०॥२॥ पढतमूर्ख ते म्हणती माझा गोड संसार । विषमिश्रित शर्करा रसने सेवितां मधुर । विषयांचें सुख तैसें ऐसें जाणति ते चतुर । निजरंगें रंगले सज्जन माझें माहेर । तरीच सार्थक झालें आल्या मानवजन्माचें । ब्रह्मार्पणबुद्धि फल पावसि केल्या कर्माचें ॥३॥४९.सदा हरिभजनीं सद्भाव पांडवांचा । स्तविति महिमा कृष्णतांडवाचा ॥ कृष्णध्यानीं मनी कृष्णमय चिंतनीं । श्रीकृष्णध्यानीं मनीं कृष्णमय चिंतनीं । श्रीकृष्णस्मरणीं अखंड वाचा ॥१॥ सत्य संभाषणीं कर्म ब्रह्मार्पणीं । धर्म चूडामणी विहित कायी । भीम अर्जुन नकुळ सहदेव सहनशीळ ॥ द्रौपदीसह समूळ विमळ चर्या ॥२॥ राज्यपदभ्रष्ट वरि दुष्ट दुर्योधनें । बहु समयीं पाडिलें त्या अपायीं । रक्षिता हरि तयां काय कारन भया । न चळती निश्चया सदय हृदयीं ॥३॥ लक्ष ब्राह्मण वनीं इच्छिलें ते मनीं । मिष्टान्न भोजनीं नित्य तृप्ती । हा नव्हे नवलाव भक्त तेथें देव । देव तेथें सर्व भुक्तिमुक्ती ॥४॥ दुष्ट दानव दमुनि साधु संरक्षणें । धर्म संस्थापणें याचसाठीं । निर्गुणी सगुण हे अवतार धरुनियां । धांवतो श्रीहरी भक्तभेटी ॥५॥ ऐक्य गोडॆए गुळा कर्पुरा परिमळा । निवडितां होय कुंठीत वाचा । निजरंग निर्द्वंद्व नेणती मतिमंद । सहज पूर्णानंद भेद कैंचा ॥६॥५०.रमाकांत अनंत मी संतवेषें । असें ज्यां कळे प्रिय मला ते विशेषें । ब्रह्म विद ते स्वयें ब्रह्मकृत निश्चयें । हरि म्हणे सकळ जग हें मदंशें ॥१॥ नित्य नैमित्यकें तें मदर्पण निकें । करुनि निष्काम धामासि आलें । दृश्य दृष्टी गार रसनेसि तें नीर । सेवितां नित्य मद्रूप झालें ॥२॥ नगसहित महि बुडो मस्तकीं नभ पडो । प्राचिनें तनु झडो याच देहीं । तरि हरीभजनिं रत डंडळीना चित्त । आत्मलाभें तृप्त सर्वदाही ॥३॥ रविबिंब स्वप्निंही न देखे अंधतम । त्या तमारी म्हणति लोक सारे । संत शाश्वत पदीं रंगला निजसुखें । म्हणवेल मनुजसम तो कसा रे ॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 16, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP