मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीरंगनाथस्वामी| गजेंद्रमोक्ष श्रीरंगनाथस्वामी प्रस्तावना आणि चरित्र श्रीगुरुगीता रामजन्म अध्याय १ ला रामजन्म अध्याय २ रा गजेंद्रमोक्ष निजानंदसाधने सुदामचरित्र शुकरंभासंवाद पंचीकरण मिथ्या माया स्वरूप ओंव्या बद्धमोक्षविवरण स्फुट पदें १ ते ५ स्फुट पदें ६ ते १० स्फुट पदें ११ ते १५ स्फुट पदें १६ ते २० स्फुट पदें २१ ते २५ स्फुट पदें २६ ते ३० स्फुट पदें ३१ ते ३५ स्फुट पदें ३६ ते ४० स्फुट पदें ४१ ते ४५ स्फुट पदें ४६ ते ५० स्फुट पदें ५१ ते ५८ मार्तंडाष्टक करुणाष्टक श्लोकपंचक गरुडसत्यभामागर्वहरण गजेंद्रमोक्ष रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला. Tags : ranganath swami poemकवितामराठीरंगनाथ सवाई Translation - भाषांतर श्रीनिजमूर्ति तुझे पदसेवन जीवन देउनि नीववि काया ।जे भवतारक,तापनिवारक, लावि गिरा तव नाम वदाया ॥मानस मीपण टाकुनि निश्चळ सत्स्वरुपी रत छेदुनि माया ।रंग अभंग करी नलगे मज इंद्रपदादिकही गुरुराया ॥१॥पार अपार हरादिक नेणति तो गुरुराज सखा मजला ।बोलियला मुनिमानसमोहन मागसि ते दिधले तुजला ॥बोल सुखावह डोलति सज्जन सांग गजेंद्र कसा तरला ? ।तो वर लाहूनियां शिरसा मग रंग सुखानुभवी भरला ॥२॥एक मनोरम तो गिरि उत्तम, ज्या त्रिकुटाचल नाम विराजे ।दीर्घ शते शतयोजनमंडित त्या तुळणे सम मेरुचि साजे ॥वृक्ष लता बहुतपरि डोलति कोकिळशूकसुखारव वाजे ।खेळति पक्षिकुळे विविधाकृति शार्दुल गर्जति अंबर गाजे ॥३॥किन्नरगायन नाद सुधारस ऐकति सिध्द मुनीद्र सुखे ।योगलिळेप्रति साधक साधिति ते सुख वानिल कोण मुखे ॥एक निवृत्त परावरशोधक डोलति ऐक्यपणे हरिखे ।त्या अनुपम्य पदाप्रति दाविल श्रीगुरुवांचूनि कोण सखे ॥४॥अमृततुल्य सरोवरीचे निर सेवुनिया क्रिडती वनगाई ।हेममया कमळी रत षटपद मज्जन पान अती सुखदाई ॥पादष पुष्पफळांकित उत्तम तेथिल वानिल कोण नवाई ।मानुनियां सुखभोज विराजतसे गजराज मदोन्मत ठाई ॥५॥भीमपराक्रम काळ तुळे सम दिग्गज नामभये दुरि जाती ।निर्जरनायकवाहनही भयभीत धरातळिचे गज किती ॥मेघसुखाहुनि घोष विशेष भये क्षिति लक्षिति श्वापदयाती ।कोण गणी अगणीत बळा ? गज राज्य करी समवेत स्वजाती ॥६॥यापरि हिंडतसे वन धुंडित सेवित कोमल पल्लवचारा ।कामसुखे विचरे विधि टाकुनि बोधित कोण तया अविचारा ॥क्रोध कदा न शमे अघदायक मोह सदां स्रवती मदधारा ।मत्सर दंभ निरंतर गर्व अनावर सर्व अनर्थ पसारा ॥७॥एक दिनी फळ पल्लव सेवुनि व्याकुळ प्राण तृषा सकळांसी ।उत्तम तीर निरीक्षुनियां निर देउनि तृप्त करी सहवासी ॥तोय सुखी जंव घालितसे तंव वोढवले बहु अद्भुत त्यासी ।नक्र जळी पद वोढित जेविं दिवाकरबिंब बळें ग्रह ग्रासी ॥८॥रोवुनि दंत पदी पद ओढितसे गज ताडित त्यासि बळे ।थाप जळावरि मारितसे परि नक्रपराक्रम तो न ढळे ॥गोवियला गजराज निरीक्षुनियां परिवार समूळ पळे ।युध्दवशे तनु जर्जर होऊनि व्याकुळ तो गज शक्ति गळे ॥९॥चिंतितसे गज संकट हे मज बंधु सुता सुत निष्ठुर पाहा ।प्रीय कलत्र सगोत्रज मित्र तयांप्रति तो उचितार्थ नव्हे हा ॥वैभव तो सुखसंभ्रम दाविति कृत्रिम लाघव लाविति मोहा ।व्यर्थ अनर्थकरे प्रतिपाळुनि शेवट येकट येकट आहा ॥१०॥कामविलास सुखावह मानुनि अचितसे मजलागुनि जाया ।बंधु वदे धनसंग्रह दे मज याविण तो स्नेह दाविसि वाया ॥पुत्र सभाग्यपणी अनुकूल उपेक्षिति जे दिनि जर्जर काया ।पामर मी भुललों मृगतृष्णिक भूलविलों ममता मोह माया ॥११॥खेद करी अनुताप धरी अवलोकित काय उपाय करावा ।आठवला सुखदायक मंत्र दयानिधि तो जगदीश वरावा ॥वारिल संकट तो सुखसागर भावबळे भवसिंधु तरावा ।याविण आणिक मित्र नसे कळले गुज हा मज लोक परावा ॥१२॥अंबुज एक करी अवलंबुनि भक्तिपुरस्पर डोलतसे ।ह्रत्कमळी कमळापति चिंतुनि मंद गिरा मग बोलतसे ॥ह्रद्रत तूं निजमूर्ति सखा तुजवीण दुजे मज कोण असे ।पाव अपाय निवारुनि मी मज दावुनि वारि समूळ पिसे ॥१३॥तूं अज अव्यय नित्य निरामय तूं सच्चिन्मय सौख्यनिधाना ।हा जगडंबर भासत तद्वत वोघतरंग जळावरी नाना ॥कुंडल किंकिणि नूपुर ककंण कांचन एक बहू अभिधाना ।वेद वदे जगदंतर एक निरंतर नातळसी भवभावना ॥१४॥विश्वरुपा ! अरुपा ! अविकार ! अनाम ! असंग ! अनंत ! अपारा !शास्त्र पुराण विवाद सदां करिती परि निश्चिति नेणति पारा ॥विश्व तुझ्या स्वरुपी परिकल्पित विद्वत वानिति विश्वअधारा ।नेति वदोन सरे श्रुतिवादन वाच्य अवाच्य वृथा श्रम सारा ॥१५॥साच नसे मृगतोय सुनिश्चित आश्रय भानु तयाप्रति पाहे ।लोह चळे परि चुंबक अक्रिय निष्क्रिय तेविं विलासत आहे ॥दृश्य नसे घन चिद्रुप तद्रुप तंतु पटत्त्वरुपे दिसताहे ।हे निज गुह्य अलौकिक जाणति संत अनंत सुखे रमताहे ॥१६॥निर्गुण जे रुप यापरिचे विणभेद सगूणहि त्या वदती ।ते सुखदायक मानुनि एक विराग धरुनि मने भजती ॥भक्तिसुखे तुज अर्चिति उत्तम ते पर मी तर हीन किती ।त्या करुणाकार श्रीचरणांप्रति मी शरणागत आर्तमती ॥१७॥उध्दरिला अजमीळ अहंकृति तारियली गणिका अघराशी ।हिंसक व्याध अगाध जिवांप्रति विंधुनियां शर भक्षिति त्यांसी ॥चोज कसे ? गुज सांग तयाहुनि पातक काय असे मजपाशी ।दीनदयाकर हे बिरुदवळि वनिति वेद निरंतर कैसी ॥१८॥पीडितसे ग्रह वारुनि यासि अनुग्रह दे मज पूर्ण सुखा ।कीर्ति करी निज भूषण तारुनि दुष्कृतराशि पशू विमुखा ॥मी तृणभक्षक मंदमती महिमान अगोचर शेषमुखा ।जाणसि अंतरिचे अति संकट आन नसे तुजवीण सखा ॥१९॥अंतरिचा अनुताप विलोकुनि तो करुणाघन येऊनि नेटे ।नक्र जळी जंव वोढितसे तंव हाणितला निजचक्रचपटे ॥फोडुनियां मुख काढित बाहिर नक्रगजां अति अद्भुत मोठे ।पद्मकरे अभयंकर देउनि सोडविली पशुदेह सुनाटे ॥२०॥अमृतहस्तक ठेवुनियां कुरवांळित मस्तक तो सुखदानी ।वाजति मंगळ घोष सुकीर्ति सुभाषित बोलति देव विमानी ॥भक्तिसुखाहुनि थोर नसे सुखकारक वेद वदे गुज कानी ।मायिक ती लटकी अघदायक जानकिनायक एक निदानी ॥२१॥भक्तिसुखे प्रर्हाद तरे मुनि नारद भक्तिसुखे विचरे ।भक्तिसुखे सनकादिक पावन भक्तिसुखे उपमन्यु सरे ॥भक्तिसुखे ध्रुवबाळ सुखावह व्यासमुखे जगताप हरे ।वाल्मिकि अंबऋषी बळि भीष्म शुक्रादिक तन्मय भक्तिभरे ॥२२॥उध्दव अर्जुन धर्म बिभीषण रामपदी रत चित्त जयाचे ।अक्रुर वैष्णव भक्त कपी हनुमंत सभाग्य जिणे विदुराचे ॥भानुकुळी रुखुमांगद भक्त सुधाकरवंशि परीक्षिति साचे ।ऐक्य निरंतर चित्स्वरुपी निजभक्त वदे श्रुति नाम तयाचे ॥२३॥भक्तिसुपानसुखी मन होऊनि उन्मन भेदअभेदविना ते ।भोगिति भोग अतीद्रिय देखति एकपणेचि जनां विजनांते ॥सारुनि मीपण भाविति आपण अक्रिय निश्चित ज्ञानघनाते ।रंगविना निज वस्तु सदोदित प्रत्यय निश्चय साधुजनांते ॥२४॥ N/A References : N/A Last Updated : December 16, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP