मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीरंगनाथस्वामी| निजानंदसाधने श्रीरंगनाथस्वामी प्रस्तावना आणि चरित्र श्रीगुरुगीता रामजन्म अध्याय १ ला रामजन्म अध्याय २ रा गजेंद्रमोक्ष निजानंदसाधने सुदामचरित्र शुकरंभासंवाद पंचीकरण मिथ्या माया स्वरूप ओंव्या बद्धमोक्षविवरण स्फुट पदें १ ते ५ स्फुट पदें ६ ते १० स्फुट पदें ११ ते १५ स्फुट पदें १६ ते २० स्फुट पदें २१ ते २५ स्फुट पदें २६ ते ३० स्फुट पदें ३१ ते ३५ स्फुट पदें ३६ ते ४० स्फुट पदें ४१ ते ४५ स्फुट पदें ४६ ते ५० स्फुट पदें ५१ ते ५८ मार्तंडाष्टक करुणाष्टक श्लोकपंचक गरुडसत्यभामागर्वहरण निजानंदसाधने रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला. Tags : ranganath swami poemकवितामराठीरंगनाथ निजानंदसाधने Translation - भाषांतर निजानंदप्राप्तीची साधने । कर्णी आकार्णिजे सावधमने ॥साधवया साधक जने । जैसी निधाने पायाळे ॥१॥सद्गुरुकृपा दिव्यांजने । वांचूनि न दिसती धने ॥अवलोकितां परोक्षज्ञाने । भूते, स्मशाने, भासती ॥२॥संत श्रोतयांचे कृपेने । किंचित बोलो अरुष वचने ॥क्षमा करुनि विद्वज्जने । द्यावी अवधाने समस्ती ॥३॥वर्णाश्रमी विहित कर्मे । नित्य नैमित्यके सम्त्रमे ॥अवश्य स्वधर्मे । त्यांची वर्मै जाणुनी ॥४॥प्रथम साधन मूळ पाया । भूमिका हे तरणोपाया ॥उपादान अनुकंपाया । सदगुरुपायाची पाहिजे ॥५॥काम्य कर्म तें गाळिजे । निषिध्द निषेधे वाळिजे ॥निरहंकृतीने पाळिजे । फळेच्छे जाळिजे समूळी ॥६॥ब्रह्मी ब्रह्मार्पण बुध्दी । कर्मै समर्पिता त्रिशुध्दी ॥उतरोनिया भवाब्धी । सायोज्य सिध्दी तो पावे ॥७॥साधनचतुष्ट्य द्वय दुसरे । संक्षेपे बोलिजे निर्धारे ॥ते परिसावे चतुरे । अति आदरे करुनी ॥८॥पहिला नित्यानित्य विचार । करावा निरखुनी साचार ॥जैसा मराळ क्षीरनीर । निवडूनि सार स्वीकारी ॥९॥देहादि भुवनत्रय अनित्य । त्यागावें जाणोनि अकृत्य ॥निजानंद परतें सत्य । घ्यावें नित्य निरंतर ॥१०॥इहामुत्र फलभोग । तोचि प्रत्यक्ष भवरोग ।काकविष्ठा सुंदर सांग । तैसा प्रसंग परियसा ॥११॥शम दम तितिक्षा उपरम । समाधान श्रध्दा परम ॥शमादि षटक याचें नाम । विश्रामधाम दायिते ॥१२॥मनासी संपूर्ण शम घडे । तरी विषमता सहज मोडे ॥निजानंद जोडी जोडे । साधनी घडे सापेक्षे ॥१३॥दम इंद्रियनिग्रह भागे । तो कवि किंकरा केंवि सांगे ॥श्रोतयांनी प्रश्न प्रसंगे । कृपापागें हा केला ॥१४॥तंव स्मरण झाले अंतरी । रमतो ऐसिये परी ॥आंगी सुइजे दाही द्वारी । इंद्रिये व्यापारी वर्ततां ॥१५॥रामकृष्ण नारायण हरी । वाचें स्मरण निरंतरी ॥प्राणांत झालिया वैखरी । उच्चार न करी निंदेचा ॥१६॥करे करावें हरिपूजन । किंवा करावें धर्मदान ॥पडिलियां वापी कूपांतून । कडे काढून रक्षावें ॥१७॥चरणाची हेंचि करणी । दीन जन संरक्षणी ॥तीर्थ देवालय - प्रदक्षणी । हरीरंगणी नाचावे ॥१८॥लिंगाप्रती हा नियम । विध्युक्त पाणीगृहणी काम ॥तेथेही अधमोत्तम । करावा संभ्रम विवेके ॥१९॥गुदे क्षरावे परिमित । शौचविधी शुचिष्मंत ॥कर्मैद्रियाची हे मात । ज्ञानेंद्रिया देत अवधारा ॥२०॥श्रवणे करावें सच्छास्त्र - श्रवण । त्वत्रे स्पर्शावें हरिगुरुचरण ॥चक्षुरिंद्रिये अवलोकन । घ्यावे दर्शन संताचे ॥२१॥जिव्हे रामरसचि सार । इतर रसी अनादर ॥घाणे होवोनि भ्रमर । निर्माल्य सुंदर सेवावें ॥२२॥दशेद्रिये येणे रीती । नेमावी अहोराती ॥या वेगळी एक रती । ढळो कल्पांती नेणावी ॥२३॥आतां उपरम तो कैसा । बोली बोलतां झणी चिळसा ॥वांती न पाहे सहसा । मागुति जैसा त्याग या ॥२४॥अनेक जन्मी अगणित दु:खे । भोगिली ती नाकळे नखे ॥परावृत्ती धरोनि सुखे । जवळी पारिखे येऊं नेदी ॥२५॥तितिक्षा बोलिजे ऐसी । सहनशीलता मानसी ॥गर्जन तर्जन निंदापसी । न गणी सोसी सर्वथा ॥२६॥समाधान ते पांचवे जाण । आत्मप्राप्तीलागी पूर्ण ॥अखंड दंडायमान । ज्ञानसंपन्न व्हावया ॥२७॥श्रध्दा नित्य नवी गाडी । पदोपदी चढावोढी ॥निजानंद पद प्रौढी । पावावया गुढी उभारी ॥२८॥शमदभादि षटक इया नावें । तृतीय साधन जाणावे ॥यावरी मुमुक्षु स्वभावे । लाहे दैवे मुमुक्षु ॥२९॥मुमुक्षत्वाची ऐसी गोष्टी । तरणोपायांची इच्छा पोटी ॥अनिवार धरुनि उठी । विरक्ति गांठी बांधोनि ॥३०॥साधनचतुष्ट्य ह्मणिजे । जे ऐसिये चिन्ही जाणिजे ॥इतर साधनी न शिणिजे । न गणिजे कलि काळा ॥३१॥येणे साधने सुनिश्चिती । निजानंदपद प्राप्ती ॥जरी भेटे सद्गुरुमूर्ती । तरी भवभ्रांती फिटेल ॥३२॥जन्ममरण निस्तराया । दुस्तर भवसिंधु तराया ॥शरण जावें सद्गुरुराया । उध्दराया अपपणे ॥३३॥पळे पळ निमिष । करावें सद्गुरुदास्य ॥पूर्ण ब्रह्म होती सतशिष्य । भूत भविष्य वर्तमानी ॥३४॥त्या सतशिष्याची लक्षणे । ह्र्दयभुवनी संरक्षणे ॥अत्यानंदे विचक्षणे । नुपेक्षणे सर्वथा ॥३५॥अक्रोध वैराग्य जितेंद्रिय । क्षमा शांती जनप्रिय ॥निर्लोभ दाता निर्भय । सदय ह्रदय जयाचे ॥३६॥निरभिमान निर्वैर । नि:संग निरुपचार ।असूया निंदा तिरस्कार । जयाचे अंतर नेणेची ॥३७॥अहिंसा अदंभ आर्जव । सबाह्य शोच मार्दव ॥धैर्योदार्य हे सर्व । गुण अपूर्व ज्यापासी ॥३८॥मुखी रामनाम स्मरण । साधुसंता अनन्य शरण ॥शुध्दसत्व अंत:करण । जन्ममरण मोचका ॥३९॥श्रवण कीर्तन विष्णुस्मरण । पादसेवन अर्चन वंदन ॥दास्य सख्य आत्मनिवेदन । नवविधा जाण या नावें ॥४०॥जे सिध्दाचें समाधान । तेंचि साधकाचे साधन ॥पूर्ण ब्रह्म सनातन । भवबंधनछेदक ॥४१॥ऐसिया साधने सिध्द झाले । निजानंदपद पावले ॥जैसे विहंगम झेंपावले । तृप्त केलें अमृतफळे ॥४२॥या साधन परिपाठी । शुक्रसनकादिकांचिया कोटी ॥सरत्या झाल्या वैकुंठ पिठी । विष्णु जगजेठी संनिध ॥४३॥निजानंदाची गोडी । नेणतीच ते बापुडी ॥विषयसुखे झाली वेडी । पायी बेडी ममतेची ॥४४॥अनाधिकारी येविशी । साधनी विमुख अहर्निशी ॥निजानंद त्यांचिये देशी । औषधासी मिळेना ॥४५॥हा त्यांसचि फावला । अहळे बहळे उपेगा गेला ॥जैसा अमृतसमुद्री जुडाला । तो मेला, वांचला न ह्मणावें ॥४६॥तो देही परी विदेही । जगदोध्दारी लीलाविग्रही ॥एतद्विषयीं संशय नाही । श्रुतिस्मृति ग्वाही देताती ॥४७॥तो सहज पूर्ण निजानंद । रंगी रंगोनि निर्द्वद्व ॥निरतिशय सुखाचा कंद । विचरे स्वच्छंद स्वभावे ॥४८॥ N/A References : N/A Last Updated : December 16, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP