मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीरंगनाथस्वामी| स्फुट पदें २१ ते २५ श्रीरंगनाथस्वामी प्रस्तावना आणि चरित्र श्रीगुरुगीता रामजन्म अध्याय १ ला रामजन्म अध्याय २ रा गजेंद्रमोक्ष निजानंदसाधने सुदामचरित्र शुकरंभासंवाद पंचीकरण मिथ्या माया स्वरूप ओंव्या बद्धमोक्षविवरण स्फुट पदें १ ते ५ स्फुट पदें ६ ते १० स्फुट पदें ११ ते १५ स्फुट पदें १६ ते २० स्फुट पदें २१ ते २५ स्फुट पदें २६ ते ३० स्फुट पदें ३१ ते ३५ स्फुट पदें ३६ ते ४० स्फुट पदें ४१ ते ४५ स्फुट पदें ४६ ते ५० स्फुट पदें ५१ ते ५८ मार्तंडाष्टक करुणाष्टक श्लोकपंचक गरुडसत्यभामागर्वहरण स्फुट पदें २१ ते २५ रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला. Tags : ranganath swami poemकवितामराठीरंगनाथ स्फुट पदें २१ ते २५ Translation - भाषांतर २१.प्रारब्ध भोग आनंदें, एका घरिं नांदति दोघे ॥ध्रु०॥ मांडिला खेळ गारोडी, जाणुनियां सर्वहि खोटें । तैसी ही देखुनि सृष्टी, ज्ञान्याला कौतुक वाटे । बा भिन्न विषय दोहींचे, मग भांडण लागेल कैंचें । काय कमी होय ज्ञात्याचें, या प्रारब्धाच्या योगें ॥प्रारब्ध०॥१॥ वस्तु जरी मिथ्या ठरली, तत्काळचि नष्ट न होयी । सुखदु:खभोग व्हायाला, सत्याची गरजचि नाहीं । कां संशयडोहीं बुडसी, तूं व्यर्थ आग्रहा पढसी, आवडे तेंचि बडबडसी, भुललासी मायायोगें ॥प्रारब्ध०॥२॥ प्रारब्धें मिथ्या जग ठरवुनि आतां, कां करितां संसारातें । वरचेवर ऐसें पुसती, अविचारी तत्वज्ञाते । दोहींचीं भिन्नचि कामें, नेणति या सिद्धांतातें । प्रारब्धभोग तो देई, निजबोधचि निजसौख्यातें । निजरंगीं निजआनंदें, दोन्हीही कौतुक पाहें । प्रारब्ध भोग आनंदें, एका घरिं नांदति दोघे ॥३॥२२.रविवंशाभरणा हो यावें ॥ध्रु०॥ सत्यज्ञानानंत अपारा । विगतविकारा जगदोद्धारा । निगमागमसारा यावें ॥रवि०॥१॥ निर्गुणनित्यनिरामयधामा । अवाप्तकामा मंगलधामा । मुनिजनमनविश्रामा यावें ॥रवि०॥२॥ विश्वविलासा श्रीजगदीशा । पूर्णपरेशा सच्चिद्भासा । निजरंगा अविनाशा यावें ॥ रविवंशाभरणा हो यावें ॥३॥२३.हें रे, रे हें, रे रे, घ्याईं ॥ध्रु०॥ एक नवल देखिलें भाई । तेंचि बोलत नोबलें कांहीं । बोलत्यासिच ठाव पैं नाहीं । ऐसें तें काय एक पाहीं बापा ॥हें रे०॥१॥ तें हे जवळी परि भासेना । नांदे डोळ्यांत परि दिसेना । ऐसें अलक्ष्य बहु लक्षेना । ध्यानीं अतर्क्य तें तर्केना ॥हें रे०॥२॥ तेंचि सर्वांहूनि थोर आहे । लहान राईहुनिही पाहें । तें वर्णिलें कोणा नवजाये । ऐसें म्हणणें तेंचि तें आहे ॥हें रे०॥३॥ गुरुकृपे जेव्हां पाहसी । स्वानुभावें तुझाचि तूं होसी । मग उरी कैंचि बोलासी । निजरंगीं रंगुनि मौन रहासी रे रे ॥ हें रे, रे हें, रे रे, घ्याईं ॥४॥२४.मी माझें विसरें । नाहीं साधन बा दुसरें ॥ध्रु०॥दु:खित जीव भ्रमें भुलालाहे । कारण त्यासि अहंममता हें ॥मी माझें०॥१॥ यासाठीं श्रुति संग्रहणें । सहकरणें मानस निग्रहणें ॥मी माझें०॥२॥ हाचि मंत्र सनकादिक गाती । भाविक हृत्कमलांतरिं ध्याती ॥मी माझें॥३॥ विद्वज्जनिं हा हृद्रत भाव ।हाचि पूर्ण निजरंगस्वभाव ॥ मी माझें विसरें । नाहीं साधन बा दुसरें ॥४॥२५.सज्जन जन सारे जन सारे । पाहतां वस्तुविचारें ॥ध्रु०॥ घटमठमहदाकाशीं । आकाश अद्वय अन्यअविनाशी ॥सज्जन०॥१॥ पाहतां नाना ध्वनी । अवघा एकचि नाद निदानीं ॥सज्जन०॥२॥ चित्सागरिंचे तरंग । सहजीं सहज पूर्ण निजरंग ॥ सज्जन जन सारे जन सारे । पाहतां वस्तुविचारें ॥३॥ N/A References : N/A Last Updated : December 16, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP