मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीरंगनाथस्वामी| ओंव्या श्रीरंगनाथस्वामी प्रस्तावना आणि चरित्र श्रीगुरुगीता रामजन्म अध्याय १ ला रामजन्म अध्याय २ रा गजेंद्रमोक्ष निजानंदसाधने सुदामचरित्र शुकरंभासंवाद पंचीकरण मिथ्या माया स्वरूप ओंव्या बद्धमोक्षविवरण स्फुट पदें १ ते ५ स्फुट पदें ६ ते १० स्फुट पदें ११ ते १५ स्फुट पदें १६ ते २० स्फुट पदें २१ ते २५ स्फुट पदें २६ ते ३० स्फुट पदें ३१ ते ३५ स्फुट पदें ३६ ते ४० स्फुट पदें ४१ ते ४५ स्फुट पदें ४६ ते ५० स्फुट पदें ५१ ते ५८ मार्तंडाष्टक करुणाष्टक श्लोकपंचक गरुडसत्यभामागर्वहरण श्रीएकाखडी - ओंव्या रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला. Tags : ranganath swami poemकवितामराठीरंगनाथ श्रीएकाखडी - ओंव्या Translation - भाषांतर करितां सारासारविवेक । कर्मचि कर्मा मोचक, । काम्य निषेध रहित एक । निष्काम उत्तमश्लोक आचरती. ॥१॥खरें पाखरूनि घेतां लेख । खर्चूं जातां परम सुख । खोटं लागतां वाटे दु:ख । पिशुन देख हांसती. ॥२॥गर्विष्ठांचे कर्म सांग । गजांत लक्ष्मी परि मातंग । गर्भांधवनितेचा चांगभाग । न देखे निजांग आपुलें ॥३॥घंटाघोषें निष्काम ओघ । घडघडां वाहती अनघ ।घन पावावया सिंधूचें सैंघ । धांवती अमोघ चपळत्वें ॥४॥न धरूनि कर्मानिमान । नानापणार्पणविधिविधान ।नरवैडुर्यें करितां पावन । ब्रह्मसनातन पाविजे ॥५॥चकोरांचा खर्चवेंच । चंद्रामृतचि साच । चंदन सर्वांगें फळतोच । हो कां उंच नीच भलतैसा ॥६॥सत्रींचें अन्न उदक स्वच्छ । छेदी सुकृतहंसाचें पिच्छ । छलना करी तया साधु तुच्छ । मानिती जेंवि मत्स्य मद्यातें ॥७॥जया काम्यकर्माचें बीज । जन्ममृत्यूचें नाचवी भोज । जनीं जनार्दन भावी तो सहज । सायुज्यशेज तयासि ॥८॥झकवेना तो कैसा बुझे । झडोनि गेलिया माझें ।झडपितां महद्भूतें ओझें । उतरलें द्वैतबुद्धीचें ॥९॥यानंतर कर्ता कार्य क्रिया । या त्रिपुटी गेलिया विलया ।यामार्ध लव पळ नवचे वायां । ब्रह्मसमन्वयावांचूनि ॥१०॥टाकूनि जगद्भानपट । टाळी पिटिली समसकट । टवाळ जाणोनि सेवट । देखती एक चित्तंतु ॥११॥ठक पडलें वेदासि उत्कट । ठसावलें हृदयीं वैकुंठपीठ ।ठायिंच्या ठायीं निराकारमठ । बोलतां ओंठ उमलेना ॥१२॥डाव साधला प्रचंड । डळमळीना पडतां ब्रह्मांड ।डंवरला चित्तें जैसा मार्तंड । अखंड दंडायमान तो ॥१३॥ढाल निजविजयाची गूढ । ढळेना उभी केली दृढ ।ढेंकर देऊनि स्वसुखासनारूढ । झाला प्रौढ स्वानंदें ॥१४॥नभ सर्वी सर्वत्र व्यापून । न मिळे अलिप्त समसमान ।नलिनीपत्रावरि जीवन । असतां अभिन्न त्यामाजी ॥१५॥तैसा कर्मीं वर्तत । तया बोलिजे जीवनमुक्त ।तक्रामाजी जैसें नवनीत ॥ घातलिया होत वेगळें ॥१६॥थापटूनि सद्गुरुनाथ । थडिचे पाववितो समर्थ ।थोर अर्थ स्वार्थ परमार्थ । देऊनि अनर्थ चुकवितो ॥१७॥दयार्णव तो ज्ञानप्रद । दवडूनि माया मोह मद ।दश दिशा ब्रह्मानंद । करितो भाग्यमंदासि ॥ १८॥धन्वंतरि सद्गुरु प्रसिद्ध । धांवे घेऊनि दिव्यौषध ।धगधगीत शुद्ध बुद्ध । पूर्ण बोध पूर्ण मात्रा ॥१९॥न कळे करितां साधन । न कळे धरितां मौन ।न कळे करितां निरोधन । तें अवलोकनमात्रें आंगळे ॥२०॥पढतां वेदशास्त्र जप । पर्वतीं बसोनि करितां तप ।परंतु न कळे निजरंगस्वरूप । तें सद्गुरु आपेंआप दाखवी ॥२१॥ N/A References : N/A Last Updated : December 16, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP