मिथ्या माया स्वरूप

रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला.


मिथ्या मायेचें स्वरूप । सांगो जातां शब्द सोप । नाहींच त्याचा प्रताप । वर्णितां संताप मानसीं. ॥१॥
गंधर्वनगरींचा भूपति । पुरुषार्थे विख्यात त्रिजगतीं । भीष्मकन्या तयाप्रति । नोवरी निश्चिति नेमिली. ॥२॥
लग्न लागलें वाडें कोडें । सामग्री सिद्ध निज निवाडें । मृगजळाचें घातले सडें । कोल्हेरीघोडे पालाणिले. ॥३॥
चित्रतरूची शीतळ छाया । खपुष्पगंधें हर्ष राया । बंध्यापुत्र मंत्री तया । नाना उपचार जाणविती. ॥४॥
वारयाच्या वळूनि वाती । भिजविल्या कूर्माच्या घृतीं । खद्योततेजाच्या दीप्ति । प्रकाश दिगंतीं न समाय. ॥५॥
रज्जुसर्पाच्या श्रवणीं । घोष पडतां वाद्यध्वनि । दर्पणांच्या अमूप धनी । ब्राह्मण भूरिदानीं कुबेर झाले. ॥६॥
इंद्रजाळींचे राय । गौरविले सहसमुदाय । अजन्म्याची माय । विहिण स्वप्नीं मिरवत ॥७॥
ऊर्णनाभीचें वस्त्रसंभार, । वोडंबरीचे अलंकार, । अश्वशृंगाचे करभार । देऊनी नृपवर गौरविला. ॥८॥
नपुंसकाचे पुत्र । चिरूंदें वर्णिती विचित्र । सत्य नसतां ब्रह्मसूत्र । लग्न ऐसें लागलें. ॥९॥
अमूप सामग्री वेंचिती । दिवसा अंधार जोखिती । आंधळे पाहोनि देती । थोटे घेती स्वहस्तें. ॥१०॥
पांगुळ नटवे नाचती । मुके गायनें गाती । बधिर श्रोते ऐकती । बोहला शोभती नोव्हरे ते. ॥११॥
अश्वत्थपुष्प चूर्ण । माजी नभनीळिमा संपूर्ण । एकत्र करितां पतिवर्ण । वस्त्रें शोभले वर्‍याडी. ॥१२॥
पिळूनि मोतियांचें पाणी । वरी शिंपिती वर्‍हाडिणी । दिगांबर वधुवरां भरणी । लग्नमंडपीं मिरवती. ॥१३॥
मिथ्या माया यापरी । रूपक करतां कवेश्वरीं । व्यर्थ शिणवावी वैखरी । उदकमथन वावुगें. ॥१४॥
घाणा घालूनि वाळूं । निरर्थक काय गाळूं । अजागळस्तन पिळूं । आकाश कवळूं कांसया. ॥१५॥
करितां सारासारविचार । विष्णुनामस्मरण सार । सद्गुरुभजन निरंतर । वाचे उच्चार श्रीराम ॥१६॥
विश्रांतीचें जन्मस्थान । सतरावियेचें स्तनपान । करूनियां सहज पूर्ण । निजानंद रंगावे. ॥१७॥
संपूर्णमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP