अप्रकाशित कविता - सन्मित्रांनो, हे गुलाबी फुलांनो ?

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


प्रियेला ऐकाने फुलें पाठविलीं. तीं तोडण्याच्या आधी तो म्हणाला -

सन्मित्रांनो, हे गुलाबी फुलांनो,
अद्यानींच्या मन्द वाताऽकुलांनो,
हा कुन्दाचा कुञ्ज सोडून येथे
जावें भेटायास माझ्या प्रियेतें. १

अङगा झोम्बे चावरा माघ - वात
न्हाणी प्रेमें जो तुम्हांला दंवांत,
रात्रीं झोंके देऊनी गोड गाणीं
गाऊनीया झोंप तुम्हांस आणी. २

या बाम्बूच्या दाट बेटांत त्यास
सोडा, चालो येथ त्याचा विलास;
ठावी त्याला का सुखाची शिसारी ?
आनन्दाची वृत्ति आंतूनि सारी ! ३

फेब्रुवारी १९१५ सुमारें

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP