TransLiteral Foundation

अप्रकाशित कविता - निनावी पक्षी

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


निनावी पक्षी
नांव गांव तव काय विहङगमा ?
साङग ! साङग चिमण्या हृदयङगमा !
पाहतांच तुजला गति खुण्टली,
पाहण्यांत तुजला मति गुन्तली. १

अन्द्रनीलमणितुल्या मनोहर
छान सान तनु ही अति सुन्दर;
भृङगतुल्य वर पङख लहानसे  -
अहिकामधि तुझी गणना नसे ! २

पुष्पतुल्य हलका अससी अहा
डाहळी न लववी तव भार हा
चोंच बारिक तुझी कुसुमान्तर
थेट जावुनि मधू तिथला हरी. ३

वायुची झुळुक त्यासम पांखरा,
सौख्यदायक परी बहु धांवरा;
स्वप्न तू युवतिच्या नवती मनीं
गुङग हो प्रथम जी प्रिय चिन्तनीं. ४

नाव काय तव सांगच प्रेमळा,
बागवान म्हणतो न कळे मला;
नाहि माहित कुणासच नांव तें
नामहीन किति सुन्दर गांव तें ? ५

सुमारें जनेवारी १९१४

Translation - भाषांतर

Last Updated : 2016-11-11T12:50:16.8730000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

फुशारखोर

  • c  One that vaunts emptily. 
RANDOM WORD

Did you know?

shatshastra konati?
Category : Puranic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.