अप्रकाशित कविता - आता काय देवा वदूं

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


आता काय देवा वदूं
आता झालों आहें अधू.

नाही केलें पुण्य तोरें
आता भोगितों हें सारें !

कृपा करी मायबाप
सर्व जगाचे चालक

कवि म्हणे जैसे बीज
तैसें होई त्याचें चीज

१९०६

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP