अप्रकाशित कविता - माझें प्रेम समुद्र
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
माझें प्रेम समुद्र. त्यास भरती येऊ, कधी ओहटी;
प्रेमाचा हृदयांत सञ्चय परी राहो जशाच्या तसा,
काहींची वर वाफ ने विरह हा, खाली परी मीलन
आणी त्यास, मिळून काय विरहा हे लाडके, तू न भी.
राही मूर्ति तुझी सदैव विमला प्रत्येक बिन्दूमधी;
जैसा तो अविनाशि तूहि असशी तैशीच, सन्देह न !
मी हें जें तुज नेहमी म्हणतसें त्याची सखे, स्त्यता
कालावांचुनि कोण गे पटवुनी देऊल ? नाही कुणी !
सुमारें मार्च १९१४
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP