मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित असंग्रहीत कविता|अप्रकाशित कविता| नयनां न दिसो, दिसो रवि अप्रकाशित कविता आता काय देवा वदूं नैराश्याचें गीत चन्द्रास सुखास आता मिती नसे ग निनावी पक्षी माझें प्रेम समुद्र मी आणि माझी आऊ To My Mother खळखळ जसा ओढा To T. R. नयनां न दिसो, दिसो रवि बहुत हट्ट करूनि पदोपदीं ताई, कां रडतेस कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीं १२ वाजतां प्रणयचञ्चले प्रणयीं तव बद्ध जाहलों सन्मित्रांनो, हे गुलाबी फुलांनो ? एक शोकपर्यवसायी नाटक अभङग देवाच्या द्वारीं कणिका वाटे तुझ्यापाशी धावतच जावें अप्रकाशित कविता - नयनां न दिसो, दिसो रवि डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले. Tags : kavitamadhav julianpoemकविताकाव्यमराठीमाधव जूलियन नयनां न दिसो, दिसो रवि Translation - भाषांतर [वियोगिनी वृत्त]नयनां न दिसो दिसो रवि गगनीं तो तळपे निरन्तर;फिरवो मुख त्याजपासुनी पृथिवी; प्रेमल सारखाच तो !’ १अतिकृष्ण अशा ढागामुळे गगनश्री जरि काळवण्डते;पृथिवी रुसते रवीवरी - न सदाचें परि काहि यांतलें ! २सखये, रवितेज अक्षय हृदयप्रेम तसें तुझ्यावरीरुसवी रडवी क्षणोक्षणीं, हृदयाला फुलवी हसूनि वा ! ३तिकडे बग कोपर्यांत त्या क्षितिजाच्या; तरुमागुनी असेंरविबिग्ब, कितीक सौम्य हें प्रणयारक्त सदैव सुन्दर ! ४अवकाश अता जरा हवा - बघ आकाशच लाल राहिलें !अवकाश पुन्हा जरा अता बघ छाया पसरे तयावरी ! ५घनदाट विषण्ण शान्तता ! विहगांची किलबिल न ऊकुं ये !परि खास फुटेल ताबम्डे नवपक्षी म्हणतील ‘यायनें’. ६मग साङगच आज लाडके ! सखये मम जीवनप्रभे !करणार कधी खरोखरी चिर माझी भवितव्यता अषा ?२१ ऑगस्ट १९१४ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP