अप्रकाशित कविता - सुखास आता मिती नसे ग

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


सुखास आता मिती नसे ग ! सुखास आता मिती !
नातें प्रगूढ अपुलें किती ! नसे ग सुखास० ध्रु०

मज नसे कशाची स्पृहा -
तू मात्र सुखामधि रहा
भूषवीत अपुल्या गृहा;
कुठे मग कसाहि असलों तरी त्याची खन्त न मज अन्तरीं ! १

लाडकी बहिण तू मम,
स्मृति तुझी हरी मम श्रम
मज नसे कुणी तुजसम -
जगामधि लबाड भेटे मला, ताऊ ! एकच तू प्रेमला ! २

सण तुझा आज पातला,
तव बन्धु दुरी राहिला,
परि तुझिया हृदयातला
तुझ्यास्तव सन्निघ तुझिया असे - चिन्ता कसली तुज राजसे ! ३

स्मृति परस्परांची जरी
हो परम्परांना खरी
प्रतिदिनीं होय मग तरी
अदेली भाऊबीज ती शुभा, जी दे नव तव वदना प्रभा ४

९ ऑक्टोबर

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP