मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीविठ्ठलमाहात्म्य| अभंग ७१ ते ७५ श्रीविठ्ठलमाहात्म्य अभंग १ ते ३ अभंग ४ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ५० अभंग ५१ ते ५५ अभंग ५६ ते ६० अभंग ६१ ते ६५ अभंग ६६ ते ७० अभंग ७१ ते ७५ अभंग ७६ ते ८० अभंग ८१ ते ८६ अभंग ८७ श्रीविठ्ठलमाहात्म्य - अभंग ७१ ते ७५ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग ७१ ते ७५ Translation - भाषांतर ७१. भला भला पुंडलिका । तुझ्या भावार्थाचा शिक्का ॥१॥भलें घालूनियां कोडें । परब्रम्हा दारापुढें ॥२॥घाव घातला निशाणीं । ख्याति केली त्रिभुवनीं ॥३॥जनी म्हणे पुंडलिका । धन्य तूंचि तिहीं लोकां ॥४॥७२. पंढरीचें सुख पुंडलिकासी आलें । तेणें हें वाढिलें भक्तालागीं ॥१॥भुक्ति मुक्ति वरदान दिधलें । तेंहि नाहीं ठेविलें आपणापाशीं ॥२॥उदार चक्रवर्ती बाप पंडलिक । नामें विश्वलोक उद्धरिले ॥३॥७३. अरे विठया विठया । मूळ मायेच्या कारटया ॥१॥तुझी रांड रंडकी झाली । जन्मसावित्री चुडा ल्याली ॥२॥तुझें गेलें मढें । तुला पाहून काळ रडे ॥३॥उभी राहूनि आंगणीं । शिव्या देत दासी जनी ॥४॥७४. जन्म खातां उष्टावळी । सदा राखी चंदावळी ॥१॥राहीरुक्मिणीचा कांत । भक्तिसाठीं कण्या खात ॥२॥देव भुलले पांडुरंग । ऐसा जाणावा श्रीरंग ॥३॥जनी म्हणे देवराज । करी भक्ताचें हो काज ॥४॥७५. ऐसा आहे पांडुरंग । भोग भोगूनि निसग ॥१॥अविद्येनें नवल केलें । मिथ्या सत्यत्व दाविलें ॥२॥जैसी वांझेची संपत्ति । तैसी संसार उत्पत्ति ॥३॥तेथें कैचि बा धरिसी । ब्रम्हीं पूर्ण जनी दासी ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 15, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP