मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीविठ्ठलमाहात्म्य| अभंग ४१ ते ४५ श्रीविठ्ठलमाहात्म्य अभंग १ ते ३ अभंग ४ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ५० अभंग ५१ ते ५५ अभंग ५६ ते ६० अभंग ६१ ते ६५ अभंग ६६ ते ७० अभंग ७१ ते ७५ अभंग ७६ ते ८० अभंग ८१ ते ८६ अभंग ८७ श्रीविठ्ठलमाहात्म्य - अभंग ४१ ते ४५ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग ४१ ते ४५ Translation - भाषांतर ४१.चाळक माझें मन पांगुळ पैं झालें । साक्षात्कारें मन हारपोनी गेलें ॥१॥मन हारपलें करूं आतां काय । पहावया गेलें तंव परतोनी कांही नये ॥२॥भक्ति ज्ञान वैराग्य नोहे । अवघेंचि आहे अवघें तो आहे ॥३॥नामा ह्मणे जनाबाई आहे बो कैसा । बाबा उदकीं घट बुडोनी ठेला जैसा ॥४॥४२.केशवाच्या नामीं लागलेंसे ध्यान । देखिल्या नयन तदाकार ॥१॥जया तया ह्मणे माझा चक्रपाणी । जाय लोटांगणीं सर्व भावें ॥२॥प्रेम बोथरत नामाचेनि छंद्रें । ह्लदय प्रेमानंदें वोसं-डत ॥३॥धांवूनि येऊनि चरणाजवळीं । बंदी पायधुळी सर्वभावेम ॥४॥घन:श्याम मूर्ति सुंदर सांवळी । ध्यान ह्लदयकमळीं नित्य राहे ॥५॥भाग्यवंत नामा भक्तां शिरोमणी । अखंड उन्मनी भोगितसे ॥६॥४३.वेणू वाहूनि चित्त दुहिलें । रूप देऊनि मज मनें मोहि यलें ॥१॥वेधु वेधकू गोपाळ लाघवी । जीवा लवियली आवडी नित्य नवी ॥२॥दृष्टीपुढें माझें ध्यान ठेवियेलें । वृत्तिसहित मन तेथें माझें गोविलें ॥३॥शुद्ध शामकमळदळ लोचनु । पावा वाजवि-तसे देहुडा रुणझुणीं ॥४॥तया प्रभा दिसती दिशा निर्मळ । कृष्ण पाहतां मन झालें व्याकुळ ॥५॥नामया स्वामीचें अनुपम्य रूपडें । पाहतां मन फिरलें माघारें ॥६॥४४.शाममूर्ति डोळस सुंदर सांवळी । तें ध्यान ह्लदय- कमळीं धरूनि ठेला ॥१॥सकळ स्थिति सुखाचा अनुभव झाला । सकळ विसरला देहभाव ॥२॥पांगुळलें मन स्वरूपीं गुंतलें । बोलणें खुंटले प्रपंचाचें ॥३॥सबाह्याभ्यंतरीं स्वरूप कोंदलें । द्वैत निरसिलें चंद्राकारें ॥४॥निजरूप निर्धारितं नयन सोज्वळ झाले । रोमांच दाटले रवरवीत ॥५॥नामामृताचा घन वोळला अंबरीं । वर्षाव सहस्र धारीं होत असे ॥६॥तें क्षीर सेवितां झालें समाधान । चुकलें जन्म-मरण कल्पकोडी ॥७॥सहज सुखें निवाला भवदु:ख विसरला । विसांवा भेटला पांडुरंग ॥८॥नामा ह्मणे देवा दृष्टि लागो झणीं । पुंडलिका धर्में करूनि जोडलासी ॥९॥४५.जीव विठ्ठल आत्मा विठ्ठल । परमात्मा विठठल विठ्ठल ॥१॥जनक विठ्ठल जननी विठ्ठल । सोयरा विठ्ठल सांगाती ॥२॥अहिक्य विठ्ठल परत्र विठ्ठल । निरंतर विठ्ठल तारीता ॥३॥नाम विठ्ठल रूप विठ्ठल । पति पावन विठ्ठल विठ्ठल नामा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP