मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|श्रीहरिगीता|तत्वविवेक प्रकरणम्| श्लोक ६१ ते ६४ तत्वविवेक प्रकरणम् प्रारंभ श्लोक १ ते ३ श्लोक ४ ते ७ श्लोक ८ ते ९ श्लोक १० ते ११ श्लोक १२ ते १४ श्लोक १५ ते १७ श्लोक १८ ते २२ श्लोक २३ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ३६ श्लोक ३७ ते ४२ श्लोक ४३ ते ४८ श्लोक ४९ ते ५२ श्लोक ५३ ते ५६ श्लोक ५७ ते ६० श्लोक ६१ ते ६४ श्लोक ६५ तत्वविवेक - श्लोक ६१ ते ६४ वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते. Tags : poempoetvaman panditwamanकविताकवीपुस्तकवामनवामन पंडित श्लोक ६१ ते ६४ Translation - भाषांतर अमुना वासनाजाले नि:शेषं प्रविलापिते ॥समूलोन्मूलिते पुण्यपापाख्ये कर्मसंचये ॥६१॥आणिक ही येणें साधे ॥ अहंकर्तृत्वाभिमान न बाधे ॥ज्ञाना ज्ञानादि द्वंद्वें ॥ जाती लया ॥१९०॥पुण्य पाप कर्में उन्मळूनी ॥ मूळाविद्यासहित नाश होऊनी ॥आपण राहे सहजासनी ॥ सहजी सहज ॥१९१॥वाक्यमप्रतिबद्धं सत्प्राकपरोक्षावभासिते ॥करामलकवद्बोधमपरोक्षं प्रसूयते ॥६२॥महावाक्यें जागा झाला ॥ तेथ कैचा स्वप्न घोंटाळा ॥वाझ पुत्राचा सोहळा ॥ जगा मानी ॥१९२॥आपण आमुक ऐसी सय ॥ हाचि मायेचा प्रत्यय ॥हेही झाले जेथें लय ॥ आपेआप ॥१९३॥तयाचें करावया वर्णन ॥ वेद झाला असे निर्माण ॥नेती नेती शब्दें करून ॥ भांबावला ॥१९४॥परोक्षं ब्रम्हा विज्ञानं शाब्दं देशिकपूर्वकम् ॥बुद्धीपूर्वकृतं पापं कृत्स्नं दहति वन्हिवत् ॥६३॥अपरोक्षात्मविज्ञानं शाब्दं देशिकपूर्वकम् ॥संसारकारणाज्ञानतमसश्वंडभास्कर: ॥६४॥ऐसें श्री सद्नुरुवाक्यासरसें ॥ जयाचें अंत:करण विलसे ॥तया स्मरतांचि निरासे ॥ सकल पाप ॥१९५॥पाप म्हणजे पतन ॥ स्वात्मरूपाचें विस्मरण ॥ कर्पूर अग्रीवत दहन ॥ दग्धझालें ॥१९६॥तमरूपीं जो संसार ॥ तया लागीं हा चंडभास्कर ॥ऐसा बोध प्रखर ॥ झाला जया ॥१९७॥ N/A References : N/A Last Updated : November 29, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP