तत्वविवेक - श्लोक २७ ते ३०

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.


द्विधा विधाय चैकैकं चतुर्धा प्रथमं पुन: ॥
स्वस्वेतरद्वितीयांशैर्योजनात्पंच पंच ते ॥२७॥

द्विधा एकेका केले ॥ तया अर्धां चतुर्था विभागले ॥
मग एकएक मिसळले ॥ एकमेकीं ॥११३॥
म्हणजे आकाशाचा अर्धाभाग ॥ आकाशीं ठेउनी चांग ॥
वाकीचे चारी भाग ॥ चवघां दिले ॥११४॥
येणें प्रकारें पांचही भुतें ॥ मिश्रण केलीं एकमेकातें ॥
तेणें झालीं पंचवीस तत्वें ॥ स्थूल देहीं ॥११५॥

तैरंडस्तत्र भुवनं भोग्यभोगाश्रयोद्भव: ॥
हिरण्यगर्भ: स्थूलेऽस्मिन् देहे वैश्वानरो भवेत् ॥२८॥

ऐशा हया पंचविसाचा ॥ ब्रम्हांड करुनी साचा ॥
सप्तपाताल स्वर्गादिकाचा ॥ डेरा उभारिला ॥११६॥
या डेरिया माझारीं ॥ नाना प्राणी उत्पन्न करी ॥
यथा योग्य चराचरी ॥ भोग्य भोगायतने ॥११७॥
ऐशा स्थूल समेष्टी अभिमाना ॥ धरी वैश्वानर जाणा ॥
व्यष्टी तैजसा म्हणा ॥ विश्व अभिमानी ॥११८॥

तैजसा विश्वतां याता देवतिर्यङनरादय:  ॥
ते पराग्दर्शिन: प्रत्यक तत्वबोधविवर्जिता: ॥२९॥
कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तुं च भुंजते ॥
नद्यां कीटा इवावर्तादावर्तांतरमाशु ते व्रजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निर्वृतिम् ॥३०॥

ऐसा विश्व अभिमानी जीव ॥ प्रत्यक् वस्तूची सोडोनीयां शीव ॥
नरपशुपक्षी आणि देव ॥ नानारूपें धरी ॥११९॥
स्वात्मबोधा विसरला ॥ अभिमानें बळावला ॥
सुखदु:खें जाजावला ॥ निरंतर ॥१२०॥
स्वसुखाची सोडुनी गोडी ॥ विषयीं धरी आवडी ॥
कर्में करुनी धडपडी ॥ भोगासाठीं ॥१२१॥
नदी प्रवाह भोंवरीं ॥ कीटक पडला माझारीं ॥
आतां तयाच्या फेरी ॥ कोणगणी ॥१२२॥
तैसा जीव या संसारीं ॥ जन्म मरणाचे फेरे करी ॥
जाजावला बहुती परी ॥ नाना दु:खें ॥१२३॥
काम क्रोध मद मत्सर ॥ दंभादि नाना विखार ॥
मोहमाया महा सुसर ॥ मिठी न सोडिती ॥१२४॥
कर्में करुनी स्वर्गा जावें ॥ तेथेंही देच असती अवघे ॥
आतां कैसेनी सुटावे ॥ या भवार्णवी ॥१२५॥
हाहा बहु कटकट ॥ किती जाहले वोखट ॥
कोण चुकवील ही वाट ॥ जन्म मृत्युची ॥१२६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP