तत्वविवेक - श्लोक ३७ ते ४२

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.


अन्वयव्यतिरेकाभ्यां पंचकोशविवेकत: ॥
स्वात्मानं तत उद्धृत्य परं ब्रम्हा प्रपद्यते ॥३७॥
अभाने स्थूलदेहस्य स्वप्ने यद्भानपात्मन: ॥
सोऽन्वयो व्यतिरेकस्तद्भानेऽन्यानवभासनम् ॥३८॥
लिंगाभाने सुषुप्तौ स्यादात्मनो भानमन्वये ॥
व्यतिरेकस्तु तद्भाने लिंगस्या भानमुच्यते ॥३९॥
तद्विवेकाद्विविक्ता: स्यु: कोशा: प्राणमनोधिय: ॥
ते हि तत्र गुणावस्थाभेदमात्रात्पृथक्कृता ॥४०॥
सुषुत्त्यभाने भानं तु समाधावात्मनोऽन्वय: ॥
व्यतिरेकस्त्वात्म भाने सुषुत्त्यनवभासनम् ॥४१॥
यथा मुंजादिषीकैवमात्मा युक्त्या समुद्धृत: ॥
शरीरत्रितयाद्धीरै: परं ब्रम्हौव जायते ॥४२॥

तया पंच कोशातें ॥ करूनी अन्वय व्यतिरेकातें ॥
विचारें पावावें परतें  ॥ परब्रम्हा ॥१४४॥
स्थूल देहीं जो आपण ॥ तयाचें स्वप्नीं ही असें भान ॥
परी अन्नमय कोश जाण ॥ न स्मरे तेथें ॥१४५॥
तिन्हीही अवस्था पचंकोश ॥ यांचा वारंवार होतसे नाश ॥
परि आत्मा अविनाश ॥ सर्व काळीं ॥१४६॥
जैसा पुष्पमाळेचा दोरा ॥ सर्व पुष्पीं एक सरा ॥
तैसा स्वात्मा वसे खरा ॥ पंच कोशीं ॥१४७॥
भोमी जैसी सर्व भरित ॥ भूतें तिये ठायीं वर्तत ॥
तैसा आत्मा अनुस्यूत ॥ सर्वांठायीं ॥१४८॥
इया सकळाचें नास्तित्व ॥ आत्मा स्मरे सदोदीत ॥
अन्वय व्यतिरेकें जो पाहात ॥ तयाशी हें कळें ॥१४९॥
जैसा मुंजा तृण कोमलांकुरु ॥ निवडती विचारेंची धीरु ॥
तैसाच जीवें स्वविचारु ॥ परब्रम्हा व्हावें ॥१५०॥
आपणाशीं आपण व्हावया ॥ विचारू तरी कासया ॥
अन्य विषय त्यागलिया ॥ उरे तो स्वत: ॥१५१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP