मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|श्रीहरिगीता|तत्वविवेक प्रकरणम्| श्लोक ४३ ते ४८ तत्वविवेक प्रकरणम् प्रारंभ श्लोक १ ते ३ श्लोक ४ ते ७ श्लोक ८ ते ९ श्लोक १० ते ११ श्लोक १२ ते १४ श्लोक १५ ते १७ श्लोक १८ ते २२ श्लोक २३ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ३६ श्लोक ३७ ते ४२ श्लोक ४३ ते ४८ श्लोक ४९ ते ५२ श्लोक ५३ ते ५६ श्लोक ५७ ते ६० श्लोक ६१ ते ६४ श्लोक ६५ तत्वविवेक - श्लोक ४३ ते ४८ वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते. Tags : poempoetvaman panditwamanकविताकवीपुस्तकवामनवामन पंडित श्लोक ४३ ते ४८ Translation - भाषांतर परापरात्मनोरेवं युक्त्या संभावितैकता ॥ तत्त्वमस्यादिवाक्यै: सा भागत्यागेन लक्ष्यते ॥४३॥तेंचि करावया विवरणा ॥ भाग त्याग लक्षण ॥तत्वमस्यादि वाक्यें करुन ॥ करूं पुढें ॥१५२॥एवं उक्त प्रकार करून ॥ जीवात्मा न होऊनि भिन्न ॥युक्त्या साम्य लक्षण ॥ प्रदर्शिलें ॥१५३॥जगतो यदुपादानं मायामादाय तामसीम् ॥निमित्तं शुद्धसत्वां तामुच्यते ब्रम्हा तद्निरा ॥४४॥यदा मलिनसत्त्वां तां कामकर्मादिदॄषिताम् ॥आदत्ते तत्परं ब्रम्हा त्वंपदेन तदोच्यते ॥४५॥त्रितयीमपि तां मुक्त्वा परस्परविरोधिनीम् ॥अखंडं सच्चिदानंदं महावाक्येन लक्ष्यते ॥४६॥यतजे सच्चिदानंद लक्षण ब्रम्हा ॥ तेंची तामसी स्वीकारी मायाधर्म ॥उपाधीयोगें गुण कर्म ॥ करी ऐसें वाटे ॥१५४॥शुद्ध सत्वप्रधान ॥ मायानिर्मीतां झाले जाण ॥तया निमित्त उपादान ॥ तत् ऐसें बोल ती ॥१५५॥मलीन तत्त्वीं मायेंत ॥ जें प्रतिबिंबत होत ॥तया त्वं ऐसे उच्चारित ॥ ब्रम्हातद्निरा ॥१५६॥एवं त्रय प्रकारीं ॥ एकची वसे निर्विकारी ॥ माया त्यागूनी निर्धारी ॥ हेंचि लक्षावें ॥१५७॥“तत्वमसी” महावाक्यें ॥ जीव ब्रम्हा आलें ऐक्यें ॥मायादि उपाधी पडले फिक्के ॥ वेदोपदेशें ॥१५८॥सोऽयमित्यादिवाक्येषु विरोधात्तदिदंतयो: ॥त्यागेन भागयोरेक आश्रयो लक्ष्यते यथा ॥४७॥मायाविद्ये विहायैवमुपाधी परजीवयो: ॥अखंडं सच्चिदानदं परं ब्रम्हौव लक्ष्यते ॥४८॥होहो तोचि मी देवदत्त ॥ येणें विरुद्ध धर्म त्याग होत ॥अन्य देश काळ लक्षण न स्मरत ॥ त्याचेची स्मरे ॥१५९॥तैसाचि मायोपाधी गत ॥ जीव ब्रम्हाता जैं स्मरत ॥ तैं अखंड भेद रहित ॥ ब्रम्हाची असे ॥१६०॥ऐसें भागत्याग लक्षणें ॥ माया ब्रम्हा ओळखणें ॥आप आपणातें जाणणें ॥ महावाक्यें ॥१६१॥ N/A References : N/A Last Updated : November 29, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP