तत्वविवेक - श्लोक ८ ते ९

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.


इयमात्मा परानंद: परप्रेमास्पदं यत: ॥
मा न भूवंहिभूयास मिति प्रेमाऽऽत्मनीक्ष्यते ॥८॥

एवं हेचि आत्मा जाण ॥ परानंद परिपूर्ण ॥
श्रुति बोलियली खूण ॥ “प्रज्ञानं ब्रम्हा” ॥५५॥
नित्य तेंचि असे सत्य ॥ सत्य तेंचि असे नित्य ॥
म्हणॊनि आत्मा सदोदीत ॥ नित्य सत्य ॥५६॥
इतर विषयीं गोडी ॥ परि ती आत्म्याहुनी थोडी ॥
आपणा आपुली आवडी ॥ निरतीशय ॥५७॥
आपण कधीं नसावें ॥ हें कोणाही न मानवे ॥
सदोदीत असावें ॥ हेंचि वाटे ॥५८॥
कालें सकल विषयीं येतो वीट ॥ परि आत्मा सदोदित अवीट ॥
आपुली आपणा कटकट ॥ कधींही न होय ॥५९॥
शंका - येतंचि कठिण प्रसंग ॥ जळत काष्ठीं टाकिती अंग ॥
मग तेथ कैचें प्रेम चांग ॥ वसे आत्मयाचें ॥६०॥
समाधान - दु:खातिशय निरसन ॥ हौनी व्हावें सुखी आपण ॥
हेंचि मनोगत धरून ॥ टाकिती देहा ॥६१॥
आपणा व्हावें दु:ख ॥ हें कोणीही न चिंत्ती देख ॥
सदां सर्वदां असावें सुख ॥ हेंचि वाटे ॥६२॥

तत्प्रेमात्मार्थमन्यत्र नैवमन्यार्थमात्मनि ॥
अतस्तत्परमं तेन परमानंदताऽऽत्मन: ॥९॥

कांतापुत्रादि आवडती ॥ परि ती आपुले सठीं करी प्रीती ॥
परम आवडी आपणा वरती ॥ आपुली असे ॥६३॥
सतीला पतीचा प्रेम ॥ पतीला सतीचा संभ्रम ॥
परि दोन्ही निमित्तीं काम ॥ आपुलाची ॥६४॥
आपुलेची आवडी ॥ धरी इतरांची गोडी ॥
नाहीं तरी परवडी ॥ कोण करी ॥६५॥
म्हणोनी परमानंद परिपूर्ण ॥ आत्मा सदोदित असे जाण ॥
नित्य सत्य हेंही लक्षण ॥ वसे जेथ ॥६६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP