तत्वविवेक - श्लोक १ ते ३

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.


नम: श्रीशंकरानंदगुरुपादांबुजन्मने ॥
सविलासमहामोहग्राहग्रसैककर्मणे ॥१॥
तत्पादांबुरुहद्वंद्वसेवानिर्मलचेतसाम् ॥
सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते ॥२॥

निरतीशय प्रेम  ॥ तया आनंद ऐसें नाम ॥
तोची प्रत्यगात्मा परम ॥ श्रीशंकरु ॥१२॥
तोचि होतां स्वयें गुरु ॥ कैचा आधेय आधारु ॥
निरसिला द्वैत अंधारु ॥ स्वात्मतेजं ॥१३॥
हाचि जयाचा विलासु ॥ नाना कल्पित पदाब्ज भासु ॥
महामोहाचा ग्रासु ॥ करावया ॥१४॥
उठिला तरंगाकारु ॥ तया पाणी होय आधारु ॥
गुरु म्हणोनी नमस्कारु ॥ तोयें तोय जैसें ॥१५॥
तैसेंचि श्लोकीं इयापरी  ॥ दाउनी विलास कुसरी ॥
नमन केलें ठेउनी दूरी ॥ त्रिपुटीशीं ॥१६॥
स्वप्नीं केलें न केलें ॥ प्रबोधीं एकची बोले ॥
स्मृतिरूपेंही आठवलें ॥ तरि ही मिथ्या ॥१७॥
असो ऐशिया गुरुरूपा ॥ जाणें तेचि सेवा उमपा ॥
निर्मल अंत:करण दीपा ॥ प्रकाशली ॥१८॥
किंवा भाविलें द्वैव ॥ तरि स्वामीचें मनोगत ॥
जाणें तेचि सेवा निश्चित ॥ एकरूपी ॥१९॥
तया निर्मल अंत:करणा ॥ तत्वबोध होवावया जाणा ॥
सुगम केला पंथराणा ॥ हरिगीता ॥२०॥
किंवा सत्कर्में चित्तशुद्धि ॥ झाली उपासना परमावधी  ॥
तयालागीं सुगम बोधी ॥ राजपथहा ॥२१॥
नाना परम श्रद्धाळु जना ॥ ज्जया विश्वास वेद गुरुवचना ॥
तयालागीं ही रचना ॥ सुगम केली ॥२२॥
सारांष येथील अधिकारी ॥ हेंचि जाणावें चतुरी ॥
इतरां बाकचातुरीं ॥ सिद्धी होय ॥२३॥
आतां होऊनि सावधान ॥ श्रोतीं कर्णचि करावें मन ॥
शब्दार्थाची साठवण ॥ होवावया जोगें ॥२४॥

शब्दस्पर्शादयो वेद्या वैचित्र्याज्जागरे पृथक् ॥
ततो विभक्ता तत्संविदैकरूप्यान्नभिद्यते ॥३॥

शद्बस्पर्शरुपरसगंध ॥ पंचविषय नानाविघ ॥
परि सर्वांठाई अभेद संवित वर्ते ॥२५॥
संवित म्हणजे ज्ञान ॥ तें इंद्रियद्वारीं रिघोन ॥
करी विषयांची कडसण ॥ आवडीनिवडी ॥२६॥
कर्णीं रिघोनी शद्बाऐक ॥ रसनीं रसातें चाखे ॥
नेत्रीं रूपातें देखे ॥ त्वचीं स्पर्शे ॥२७॥
व्राणी गंधातें घेऊन ॥ शिस्नीं भोगातें भोगून ॥
गुदीं करी विसर्जन एकलेचि ॥२८॥
पायीं रिघोनी मार्ग क्रमी ॥ हस्तीं दावी पराक्रमी ॥
जिव्हाईं नाना उपरमी ॥ वाग्विलासु ॥२९॥
नाना विषय नाना भेद ॥ नाहीं एकमेकांचा संबंध ॥
परि ज्ञान वर्ते अभेद ॥ सर्वां ठायीं ॥३०॥
जागृती जागृतीं सारखें ॥ विषयीं विषयाकार देखे ॥
परि  तें कोणाही न लेखे ॥ आपलेरूपीं ॥३१॥
ज्या ज्ञनें देखे माता ॥ तेंचि ज्ञान भोगी कांता ॥
आकाश पाषाण सविता ॥ तेंचि देखे ॥३२॥
परि न होय जड मूढ ॥ मुग्ध बोलकें न गूढ ॥
बालाग्रीं ही आरूढ ॥ होऊनी नाचे ॥३३॥
समज ज्ञान संवित् ज्ञप्ति ॥ चित् कला माया आदिशक्ति ॥
नेणो नामें आहे किती ॥ एका इया ॥३४॥
पाप करी पुण्य करी ॥ परि न भेदे अंतरी ॥
एकलेंचि चराचरीं ॥ अभेदें वर्ते ॥३५॥
इया ज्ञाना वांचून ॥ अणूही न होय निर्माण ॥
सकळां हेंचि कारण ॥ भौमरूपें ॥३६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP