तत्वविवेक - श्लोक ३१ ते ३३

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.


सत्कर्मपरिपाकांते करुणानिधिनोद्धृता: ॥
प्राप्य तीरतरुच्छायां विश्राम्यंति यथासुखम् ॥३१॥
उपदेशमवाप्यैवमाचार्यात्तत्त्वदर्शिन: ॥
पंचकोशविवेकेन लभंते निर्वृतिं पराम् ॥३२॥

सत्कर्म पूर्वोपार्जित पुण्यें ॥ येउनीयां कृपाळु सज्जनें ॥
जैसा कटिक बाहय देशीं ठेवणें ॥ नदी प्रवाहांतुनी ॥१२७॥
मग तो तीर तरुच्छाई ॥ प्राप्य सुख आनंदें घेई ॥
तैसाची हाही देहीं ॥ स्वसुखातें भोगी ॥१२८॥
अहेतुक सत्कर्में हातवटी ॥ पूर्वोंपार्जित पुण्याचे शेवटीं ॥
पडे दयाळु सद्नुरुची गांठी ॥ उपदेशावया ॥१२९॥
मग ते उपदेश करती ॥ पंचकोश विवरती ॥
महावाक्यें दाखविती ॥ स्वात्मसुख ॥१३०॥
तेथें निवर्तीच्या लाभें ॥ जीव परमानंदी शोभे ॥
अद्वैत सामराज्य वैभवें ॥ डोलूं लागे ॥१३१॥
श्रोता करी विनंती ॥ तीच उपदेश पद्धती ॥
ऐकावया चित्तवृत्ती ॥ एकवटली ॥१३२॥
वक्ता बोल वचन ॥ तुझें करुं समाधान ॥
करी एकाग्र मन ॥ तेची सांगूं ॥१३३॥

अन्नं प्राणो मनो बुद्धिरानंदश्चेति पंच ते ॥
कोशास्तैरावृत: स्वात्मा विस्मृत्या संसृतिं व्रजेत् ॥३३॥

अन्नमय प्राणमय ॥ मनोमय विज्ञानमय ॥
पांचवा आनंदमय ॥ कोश तो ॥१३४॥
एही कोशीं आत्मा आच्छादिला ॥ स्वस्वरुपातें विसरला ॥
संसार प्रवाहीं पडला ॥ दु:खें भोगावया ॥१३५॥
जैसा का कोश किडा ॥ आपणा आपण घाली वेढा ॥
तैसाचि हा जीव वेडां ॥ कोशीं पडला ॥१३६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP