तत्वविवेक - श्लोक ५३ ते ५६

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.


इत्थं वाक्यैस्तदर्थानुसंधानं श्रवणं भवेत् ॥
युक्त्या संभावितावनुत्संधानं मननं तु तत् ॥५३॥
ताभ्यां निर्विचिकित्सेऽर्थें चेतस: स्थापितस्य यत् ॥
एकतानत्वमेतद्धि निदिध्यासनमुच्यते ॥५४॥

हेंचि करावें सतत श्रवण ॥ देउनी एकाग्र अंत:करण ॥
तयाचें हो करावें मनन ॥ वरचे वरी ॥१७३॥
श्रवण मननाचे पाठी ॥ विचारें निदिध्यास धरावा पोटीं ॥
तेणें साक्षात्कार प्रगटी ॥ आपोआप ॥१७४॥

घ्यातृध्याने परित्यज्य क्रमाद्धेयैकगोचरम् ॥
निवातदीपवच्चित्तं समाधिरभिदीयते ॥५५॥

ध्येय ध्यान ध्याता ॥ त्रिपुटी रहित होता ॥
समाधी सुखें तत्वता ॥ निश्चला होशी ॥१७५॥
जैसा निवांत असे दीप ॥ तैसा राहशी निष्कंप ॥
हेंही बोलणें अल्प ॥ ऐसा होशी ॥१७६॥

वृत्तयस्तु तदानीमज्ञाता अप्यात्मगोचरा: ॥
स्मरणादनुमीयंते व्युत्थितस्य समुत्थिता‍न् ॥५६॥

शंक - ध्येयैककार वृत्ती ॥ कैशी सुखाची करी निश्चिती ॥
ज्ञेयज्ञाता विरहीत स्थिती ॥ असे जेथ ॥१७७॥
स० - आत्मगोचरा वृत्ती ॥ समाधी कालीं अज्ञ जरि भासती ॥
तरी उत्थित होतां  स्मरती ॥ समाधी सुख ॥१७८॥
अनुभवाविण स्मरण ॥ हें लोकीं विपरीत असें जाण ॥
म्हणोनी सुख निश्चयें करून ॥ अनुभवी ॥१७९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP