मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|द्रोणपर्व ह्माळसेन कथा| अभंग २५१ ते २८२ द्रोणपर्व ह्माळसेन कथा अभंग १ ते २५ अभंग २६ ते ५० अभंग ५१ ते ७५ अभंग ७६ ते १०० अभंग १०१ ते १२५ अभंग १२६ ते १५० अभंग १५१ ते १७५ अभंग १७६ ते २०० अभंग २०१ ते २२५ अभंग २२६ ते २५० अभंग २५१ ते २८२ ह्याळसेन कथा - अभंग २५१ ते २८२ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग २५१ ते २८२ Translation - भाषांतर धगधगीत तत्क्षणीं । शस्त्र आलें गगनींहुनी । तें हाणितले गदे करुनी । थोर निघातें ॥२५१॥घायें उसळला बाण । गेला र-विमंडळा भेदून । पुनरपी मावळतां दीन । उतरलें भूमी ॥२५२॥रणीं भीडता महावीरं । द्यावो लागला पाठीमोरा । बाण खडतरल सामोरा । ह्लदयावरी ॥२५३॥बाण ह्लदयीं खडतरला । मूर्च्छागतु भूमीं पडला । जैसा मेरु उलंडला । पृथ्वीवरी ॥२५४॥रामकृष्ण गोविंद ह्मणत । धरणीं झाला मूर्च्छागत । ह्लदयीं आला श्रीअनंत । अविनाश मूर्ती ॥२५५॥काळें सलिला महाकाळू । कीं सागरें दा-हिला वडवानळू । कीं उलथला भूमिगोळू । येरी वाही ॥२५६॥तैसा उलंडला धरणी । हाहा:कारू झाला सैनीं । एकटाळी आ-रणीं । गर्जिन्नलीं ॥२५७॥तंव ह्माळसेनाचे वीर । विधितलें समोर । जैसे वर्षताती जलभर । प्रळयकाळीं ॥२५८॥ब्रह्मशस्त्राचा प्रतापू । वरी द्रोणाचार्याचा कोपू । रणीं मालविला दिपू । अर्जुनाचा ॥२५९॥सूर्योदय होउनी मावळला । त्रैलोक्या अंधार पडिला । तैसा पां-डवकुळीं झाला । अंधकारू ॥२६०॥वीर चालिले थोर रणीं । तेही भंगीलिया आरणी । कौरव गेले पळोनी । मेळीकारा ॥२६१॥मग तेहि सैन्यकीं वीरीं । ह्याळसेनु घातला रथावरी । वेगीं आले मेळीकारीं । पांडवाचे ॥२६२॥आणुनी घातला श्रीकृष्णाचे चरणीं । तो पांडवीं देखिला नयनीं । आंग टाकिलें धरणीं । पांचही जणीं ॥२६३॥तंव ह्माळसेनु सावधु झाला । तेणें । श्रीकृष्ण विनविला । च-रणीं स्थापावें घननीळा । कृपानिधी ॥२६४॥आजी पितयाच्या काजा । प्राणु वेंचला माझा । अंतकाळीं वैकुंठ राजा । भेटला मज ॥२६५॥आजी धन्य मी ये सृष्टीं । मज जोडला जगजेठी । पावन झालों वैकुंठीं । कल्प कोटी ॥२६३॥ऐसें बोलत बोलतां । प्राण गेला अवचिता । तें देखोनी पंडुसुता । दु:ख झालें ॥२६७॥तंव बोले सारड्गधरू । याचा शोक नक करूं । तुह्मीं घ्यावा विचारू । अंतर्गतू ॥२६८॥ब्रह्मशस्त्र दारुन । घेतें पांचा-जणाचे प्राण । तें झालें निर्माण । ह्माळसेनासी ॥२६९॥यासी संस्कारू कीजे । ऐसें बोलोनी गरुडध्वजें । ह्मणे सकळ जनीं निधीजे । भागीरथीसी ॥२७०॥तयासी संस्कारू करूनी । मग तिलांजुली देउगी । मेळीकारासी येउनी । रात्रीमाजी ॥२७१॥पांडवासी दु:ख झालें । अन्न उदक वर्जिलें । पाहा वो कैसें झालें । ह्माळसेनासी ॥२७२॥मग बोलिले नारायण । धन्य या कौर-वांचें जिणें । नित्य होताहे संहारणें । महावीरांचें ॥२७३॥मागुते संग्रामी येती । परी साभिमानु न सांडिती । तुह्मी वांयांविण चित्तीं । दु:ख धरितां ॥२७४॥कर्वतु जातसे सैरा । परी कर्वताती दोन्ही धारा । तैसा संग्रामु अवधारा । परस्परें ॥२७५॥स्मशान वैराग्य धरणें । तरी कायसें राज्याचें कारणें । मागुता वनवासु सेवनें । साही जणीं ॥२७६॥आमुची संगति ऐसी । जें दु:ख न धरावें मा-नसीं । ऐसें बोले ह्लषिकेशी । तयांप्रती ॥२७७॥तंव भीम बोलिला वचनीं । हे सर्व माया तुझी करणी । जें जें असेल तुझ्या मनीं । तैसें वर्तूं आह्मी ॥२७८॥तंव ह्माळसेनाचा वीरीं । तेंहि विनविला श्रीहरी । तूम आव्याप्पु मुरारी । परमपुरुषु ॥२७९॥आतां आह्मां आशिर्वाद देणें । तुवां पांडवाचें साह्य करणें । अनाथांसी रक्षणें । तुझ्या चरणीं ॥२८०॥मग तेहि आज्ञा घेऊनि । पांडवासी पुसोनि । मागा काय करील करणीं । नारायणू ॥२८१॥नाना विष्णुदास विनवितु । तो लाघवी श्रीअनंतु । कौरवां करूनि नि:पातु । जय देणें पांडवां ॥२८२॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP