मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|द्रोणपर्व ह्माळसेन कथा| अभंग २०१ ते २२५ द्रोणपर्व ह्माळसेन कथा अभंग १ ते २५ अभंग २६ ते ५० अभंग ५१ ते ७५ अभंग ७६ ते १०० अभंग १०१ ते १२५ अभंग १२६ ते १५० अभंग १५१ ते १७५ अभंग १७६ ते २०० अभंग २०१ ते २२५ अभंग २२६ ते २५० अभंग २५१ ते २८२ ह्याळसेन कथा - अभंग २०१ ते २२५ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग २०१ ते २२५ Translation - भाषांतर तरी तुम्ही कालच्या दिवशीं । रणीं वधिलें अभिमन्यूसी । तें मूळ आहे तुह्मांसी । यमयातना ॥२०१॥असो तुम्हासी काय सांगणें । तुह्मी ठाईंहूनि कपट करणें । तैसेंच भोगाल पतनें । सत्य जाणा ॥२०२॥ऐसें बोलोनी घेतले बाण । तोडिलें तयाचें संधान । तंव आणिक आलें तीव्रपणें । तेंहि तोडिलें ॥२०३॥तितकीया वीरांचें संधान । एकलचि सांवरी त्राण । जैसें नपूंसकाचें जिणें । निरर्थक ॥२०४॥मग एक वेळा करुनी । रथा-भोंवता वेढा घालुनी । मग वरुषताती बाणीं । जलधारा जैसे ॥२०५॥कर्णु ह्मणे देख देख । हें सांवरी माझें लक्ष । म्हणोनि विंधिलें धनुष्य । तुटलें शीत ॥२०६॥तंव ते वज्रापासाव कठारे । काय करी कर्णाचा शर । मांडी देउनी महावीर । चढविलें सीत ॥२०७॥मग घेउनी गदेतें । कर्ण हाणितला अव्हाटे । कूट करूनि रथांत । पाडि-ला भूमी ॥२०८॥अश्वत्थामा तये क्षणीं । चारी वारु खिळले बाणीं । तें देखोनियां नयनीं । तोडिलें वीरें ॥२०९॥तयाच्या संधाना आंत लखलखीत बाण सात । अश्वत्थामा करूनि विरथ । पाडिला रणीं ॥२१०॥तयेच वेळीं कृपाचारी । आखु छेदावया दाखवी दाही शरीं । येतां देखिलें दुरी । म्हाळसेंनें ॥२११॥ते बाणें बाण तोडिले । मग कृपाचारी तें लक्षिलें । मूर्च्छित पाडिले । मोडिला रथू ॥२१२॥तंव दु:शासनु पातला । तेणें ध्वजास्थ देखिला । तो वज्रापासावो घडि-ला । केवीं तुटे ॥२१३॥मग सोडिला बाण । ह्लदयीं विंधिला दु:शा-सन। पडला मुरकुंडी येऊन । तये वेळीं ॥२१४॥मग ह्मणे जी जी श्रीगुरू । तुह्मी कां न करा हाती येरू । एवढा वाटीवेचा बडिवारू । वृथा जातु ॥२१५॥आवेशोनी द्रोणाचारी । म्हाळसेनु विंधिला दाही शरीं । तंव दृम दुहाकारी । साहे माते ॥२१६॥तंव पावला सबळू । झणें होसी बरळू । आतां करीन हलकल्लोळू । वीरा तुज ॥२१७॥कर्णू अश्वत्थामा पावला । कृपाचारी विकर्ण आला । शैल्य सोमदंतु धाविन्नला । थोर क्रोधें ॥२१८॥ते देखोनियां वैरी । जैसा सिंह गजावरी । मग गदा घेऊनियां करीं । उतरे चरणीं ॥२१९॥वीर-वाहो सबळ वाहानू । वीरसेनू दळभंजनू । अग्निकेतु रण मर्दनू । पावले वेगीं ॥२२०॥शरधारी वरुषती । तयाचीं संधानें तोडिती । म्हाळसेनु करील ख्याती । महा वीरेसी ॥२२१॥कर्णु गदे करून हाणि-तला । विकर्णु क्षितीवरी पाडिला । अश्वत्थामा पावला । चरण चाली ॥२२२॥पुढा देखोनी कृपाचारी । तयातें घावो देवोनी शिरीं । सबळासी केला परी । तें सांगवेना ॥२२३॥द्रुपदासी धरुनी चरणीं । तयासी भवंडिलें गगनींरिथेसी दिधला टाकोनी । शैल्यावरी ॥२२४॥तंव पुढा देखिला सोमदंतू । तयाचा मोडूनियां रथू । भूरिश्रवाचा पुरुषार्थू । भंगिला तेणें ॥२२५॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP