मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|द्रोणपर्व ह्माळसेन कथा| अभंग २२६ ते २५० द्रोणपर्व ह्माळसेन कथा अभंग १ ते २५ अभंग २६ ते ५० अभंग ५१ ते ७५ अभंग ७६ ते १०० अभंग १०१ ते १२५ अभंग १२६ ते १५० अभंग १५१ ते १७५ अभंग १७६ ते २०० अभंग २०१ ते २२५ अभंग २२६ ते २५० अभंग २५१ ते २८२ ह्याळसेन कथा - अभंग २२६ ते २५० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग २२६ ते २५० Translation - भाषांतर तो खवळला महाबाहो । रथ घोडिया एक चि घावो । फेडीतु वैरियाचा ठावो । महावीरू ॥२२६॥मागें म्हाळसेनाचे वीर । तेहि भंगिले कौरवांचे भार । थोर होताहे हल-कल्लोळ । रणामाजी ॥२७॥पुढें पळे कौरवसैन्य । पाठीं धांवे ह्माळ-सेन । थोर होताहे कंदन । कौरवांचें ॥२२८॥तंव दुर्योधनु बोले । गुरु तुह्मीं विचारिलेम । कीं हा मेलिया भलें जालें । सकळिकांचें ॥२२९॥।दुर्यो-धनाचे नांवें । तेचि पांडव जाणावे । जरी हा न वांचला जिवें । रणामाजी ॥२३०॥मज घातु जालियावरी । तुह्मी वोळंगावें माझे वैरी । ऐसें खडतर उत्तरीं । खोंचला द्रोणु ॥२३१॥ह्मणे तूं होसी कुळहीनू । म्हणोनि बोलतोसी उणें । तुझें तुज साजे बोलणें । बोलतो मज ॥२३२॥गांधारीया सहजा सांगितलें । तेंचि आजी आठवलें । तुझे प्रसूतसमयीं शब्द झाले । जंबुकाचे ॥२३३॥तैंच म्यां वर्तिलें वर्तन । कुळक्षयो याचेन गुण । तेंचि आलें वचन । पुढें देखा ॥२३४॥अरे तुझीये कारनीं । येथें अनाथें पाडिलीं रणीं । शेवटीं पुढें निरवाणीं । तूंहि जासील प्राणा ॥२३५॥हा सर्वगतु श्रीहरी । सर्वत्र सर्वांच्या उदरीं । एकमेकां करूनि वैरी । संहारावो ॥२३६॥आमुचे सहजी वृद्धपणें । यावरी कीर्ति जिणें । तरी तुमचा कां जी प्राण वेंचणें । सत्य जाण ॥२३७॥इतकें बोलेनि वचन । गुणीं लविलां रुद्रबाण । पाचारिला ह्याळसेन । तये वेळीं ॥२३८॥राख राख आपलिया प्राणा । म्हणोनी सोडिलें रुद्रबाणा । तेणें तेजें गगना । उजेडु जाला ॥२३९॥तें ह्माळ-सेनें देखोनी नयनीं । वैष्णवास्त्र लविलें गुणीं । तेणें नेलें पिटोनी । रुद्रशस्त्रातें ॥२४०॥तेजें तेज हरपलें । शस्त्रें शस्त्र विलया गेलें । तंव ह्माळसेनें पाचारिलें । द्रोणाचार्यासी ॥२४१॥मग हाणितला पांच बाणीं । चारी वारू पाडिले रणीं । सारथी बाणें खडतरोनी । पडला देखा ॥२४२॥ते वेळीं द्रोणु विरथू जाला । आणिका रथावरी गेला । गदाघातें चूर्ण केला । तोही रथू ॥२४३॥मग पळतसे चर-णचाली । थोर होताहे मारी । मग द्नोणु विचारी । मनामाजी ॥२४४॥आतां करावें निर्वाण । नाहीं तरी नाहीं जिणें । मग काढिला बाण । निर्वाणींचा ॥२४५॥ब्रह्मअस्त्र लविलें गुणीं । तयासी प्रार्थना करुनी । वैरियासी संहारुनी रणीं । क्षणामाजी ॥२४६॥पळत पळतां सोडिला बाणू । तेणें व्यापिलें गगन । तें ह्माळसेनाचें सैन्य । देखतें जालें ॥२४७॥वरुषती शस्स्त्रधारी । शर पडती धरणीवरी । परी ह्माळ-सेनाचे शरीरीं । धाकु नाहीं ॥२४८॥गदाघातु जेथ देत । वारु मारी मोडी रथ । उलंडले मदोन्मत । गिरी जैसे ॥२४९॥कोटि सूर्यांचा प्रकाशू । तैसा गगनीं आयासू । करावया प्राणनाश । वैरि-यांचा ॥२५०॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP