मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|द्रोणपर्व ह्माळसेन कथा| अभंग १०१ ते १२५ द्रोणपर्व ह्माळसेन कथा अभंग १ ते २५ अभंग २६ ते ५० अभंग ५१ ते ७५ अभंग ७६ ते १०० अभंग १०१ ते १२५ अभंग १२६ ते १५० अभंग १५१ ते १७५ अभंग १७६ ते २०० अभंग २०१ ते २२५ अभंग २२६ ते २५० अभंग २५१ ते २८२ ह्याळसेन कथा - अभंग १०१ ते १२५ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग १०१ ते १२५ Translation - भाषांतर मना पवना वेगु नाहीं । तैसा धांवसु तसे पाहीं । संहारितु गदाघांई । कौरवांसी ॥१०१॥अश्वत्थामा केला विरथू । कृपाचार्य सांडी रथू । सबळु पळाला जी-वंतू । देखोनियां ॥१०२॥मग पाचारिला दुर्योधनू । आतां राखें आपुला प्राणू । नातरी रिघाणें शरणू । युधिष्ठिरा ॥१०३॥तंव पावला दुर्मदू । एकवटले दोघे बंधू । करूनि सिंव्हनादू । मिसळले घांई ॥१०४॥दुर्मदु ह्मणे म्हाळसेनासी । बहु बोलतां पार जासी । आपणा-कडे न पाहसी । मी कवणु ऐसें म्हणोनि ॥१०५॥सुखें असतं आ-पुले ठासीं । नेणसी सुखदु:खा कांहीं । तो तूं मराया आपल्या पायीं । आलासी येथें ॥१०६॥पुरे आयुष्याची विधी । जेविं सर्पु लागे पानधी । तुज कवणें शिकविली बुद्धी । मतिहीनें ॥१०७॥जरी चिर-काळ असे जिणें । तरी जाय नगर टाकून । वृथा वेंचूनि प्राण । कासया जासी ॥१०८॥आम्हीं तरी आपुले तरी आपुले गांठीं । बांधली मरणाची खुंटी । विधि पुरलिया शेवटीं । वांचुन तेणें ॥१०९॥पाहें पां कालचे दिवसीं । जे परी झाली बा अभिमन्यासी । तरी ओकूनियां कां प्राण देसी । वृक्षा काजें ॥११०॥तंव बोलिला ह्माळसेनू । हें जाणें भेडसावणें । आधीं गाठीं बांधोन मरण । आलों येथें ॥१११॥परी देख तुझें अंतरंग तूं । या अकरा क्षोणि स- हितू । तुह्मी पावाल मृत्यू । एकेएकु ॥११२॥तुमचे निर्वंश होती । हें देखतसे अंतर्गती । पांडव राज्य करिती क्षिती । निश्चयेंसी ॥११३॥धन्य धन्य अभिमन्य । तेणें रणीं वेंचिले प्राण । अंतीं तुष्टला नारायण । मुक्तिदाता ॥११४॥आजी पितयाचे कारणीं । माझे प्राण वेंचले रणीं । परी सदैव मजहुनी । दुजा नाहीं ॥११५॥असो तुह्मासी काय नीती । तुह्मी असा पापमूर्ती । तुम्हांसी कैंची मती । भूमिभार ॥११६॥ऐसें बोलोनी खडतरी । दुर्मदु विंधिला दाही शरीं । ते बाण नहेती मलार्ही । यमदंड ॥११७॥तंव दुर्मदें केलें संधान । चारी सांडुनी तोडून । सहा बाण तिष्टपणें । पावले वेगीं ॥११८॥चारी चहूं वारुयांसी । एकु भेदला सारथीयासी । एंकु भेदला दुर्मदासी । एकु पडला रणीं ॥११९॥तें देखोन दुर्योधन । पळाला रथ मुरडुन । हासिन्नला म्हाळसेन । म्हणे परतोन पाहें ॥१२०॥तंव द्रोणु सावधु झाला । दळभारु एकवटला । तेथें संग्रामु झाला । अति दारुण ॥१२१॥कृपाचार्य आणि द्रोणू । अश्वत्थामा आणि सूर्यनंदनू । भूरिश्रवा विकर्णू । सोमदंतु ॥१२२॥सोरट आणि पढीवारू । चीन चीनभोठ आणि बर्बरू । परी एकला न सावरू । बागड राये ॥१२३॥अतिबळ आणि सबल । कळाईत निकुंभ अनिळ । ऐसें एकवटलें दळ । कारैवांचें ॥१२४॥सैन्या कुंचा भवंडिला । शंखनादें कोंदाटला । येथें सवेंचि पावला । दुर्योधनू ॥१२५॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP