मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|द्रोणपर्व ह्माळसेन कथा| अभंग १७६ ते २०० द्रोणपर्व ह्माळसेन कथा अभंग १ ते २५ अभंग २६ ते ५० अभंग ५१ ते ७५ अभंग ७६ ते १०० अभंग १०१ ते १२५ अभंग १२६ ते १५० अभंग १५१ ते १७५ अभंग १७६ ते २०० अभंग २०१ ते २२५ अभंग २२६ ते २५० अभंग २५१ ते २८२ ह्याळसेन कथा - अभंग १७६ ते २०० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग १७६ ते २०० Translation - भाषांतर ऐसें जाणतं मनीं । पांडवा सारथी चक्रपाणी । तरी कासया निर्वाणीं । येतां तुह्मी ॥१७६॥तया सारथी देवरावो । तो पांडवांसी देईल जयो । कौरवांसी करी क्षयो । हें निभ्रांत जाणा ॥१७७॥धरूनि मच्छाचा वेषू । दैत्य वधिला तो शंखू । कूर्मवेषें भूमि गोळकू । धरिला पृष्टीं ॥१७८॥जैं वराहरूप नटला । तो हिरणाक्षु दैत्य वधिला । हिरण्यकश्यपू वधिला । नरसिंहवेषें ॥१७९॥जें खुजें रूप धरूनि । बळीं पाताळीं घालूनि । पृथ्वी नि:क्षेत्री करुनी । परशरामें ॥१८०॥विरोचनाची होऊनि नारी । मग तो निर्दाळिला वैरी । ऐसा कपटी श्रीहरी । नेणसी राया ॥१८१॥पहिलचि घेतला विचारू । तरी कासया होता संहारू । भीष्म देवासारखा वीरू । कासया पडता ॥१८२॥कासया पडता लक्ष्मण । जयद्रथा होतें कां निर्वाण । ऐसें तुझें मूर्खपण । दुर्योधना ॥१८३॥आतां सांगसी विचारू । तोचि आम्ही करूं । वांयां करितोसी संहारू । महावीरांचा ॥१८४॥पाहें तुझिये कारणीं । वीर पडती रणीं । ऐसी तुझी करणी । दुर्योधना ॥१८५॥ऐसें द्रोणगुरु बोलिला । दुर्योधनु काळवंडला । उगाची तो राहिला । मौनरूपीं ॥१८६॥तंव बोलिला कृपाचारी । गूढा असे याच्या शरीरीं । श्रीगुरु तुमच्या उत्तरीं । न बोले कांहीं ॥१८७॥तंव बोलिला गुरुरावो । तुवां कां धरिला मौनभावो । जो सांगसी उ-पावो । तोचि करूं ॥१८८॥तंव बोलिला दुर्योधनू । या वीरासी संहारून । यामागें जीवूं कीं मरून । भलतेंचि घडो ॥१८९॥तंव द्रोणू बो-लिला रायासी । ब्रह्मशस्त्र आहे मजपाशीं । येणें शस्त्रें अर्जुनाशीं । घातु असे ॥१९०॥हें शस्त्र गा दुर्योधना । घातुक याचिया प्राणा । उदैक पार्थाचिया प्राणा । घेऊं आम्हीं ॥१९१॥तंव दुर्योधन ह्मने गुरूसी । यापुढा जेव्हां वांचसा । मग अर्जुनातें वधिसी । समरांगणीं ॥१९२॥भ्रस्तुत चुकवावें मरणारात्रीं आडतें कायसें विघ्नाहें कार्य अवश्य करून । यासी वधावें ॥१९३॥श्रीगुरु बोले उत्तरीं । अभिमन्यु मारिला जया परी । तैसोंचि करावें वीरीं । आजीं देखा ॥१९४॥मग एकवटले वीर । चालिला कौरवांचा भार । शत्रा अस्त्रीं अंधकार । पडिला तेथें ॥१९५॥तें देखिएलं ह्माळसेनें । तेणें पचारिला द्रोण । तुह्मां लाज नाहीं मी ह्मणे । पळतां रणीं ॥१९६॥वीर ह्मणवितां भारथीचे । थोर पुरुषार्थ तुमचे । महत्त्व न राखा नांवाचें । पळतां रणीं ॥१९७॥क्षेत्रीं झुंजतां रणीं । पाठी देउनी पळे प्राणी । तो पडे यमवदनीं । कोटि वरुषें ॥१९८॥नातरी पळतियासी मारी । कीं नि:शस्त्रिया अव-धारी । कीं शरणागतासी वधारी । तो अप्रयोजकू ॥१९९॥एकवळा कीं करुनी । एकलियासी वधिती रणीं । तयासी होय यमजाचणी । चंद्रार्क वरी ॥२००॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP