मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|द्रोणपर्व ह्माळसेन कथा| अभंग १५१ ते १७५ द्रोणपर्व ह्माळसेन कथा अभंग १ ते २५ अभंग २६ ते ५० अभंग ५१ ते ७५ अभंग ७६ ते १०० अभंग १०१ ते १२५ अभंग १२६ ते १५० अभंग १५१ ते १७५ अभंग १७६ ते २०० अभंग २०१ ते २२५ अभंग २२६ ते २५० अभंग २५१ ते २८२ ह्याळसेन कथा - अभंग १५१ ते १७५ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग १५१ ते १७५ Translation - भाषांतर द्रोणु बानीं नरुषत । ते सर्वांगीं खडतरत । अशुद्धाचे पुर वाहत । तयेवेळीं ॥१५१॥परी न मानी तयाचिया मना । जंव गदाघातु द्याबा द्रोणा । तंव कर्णे केलें संधाना । तयेवेळीं ॥१५२॥तैसाच दिधला अवघातू । मोडिला कर्णाचा रथू । तयेवेलीं तो सूर्यसुतू । चरणीं चाले ॥१५३॥कर्ण द्रोण वरुण चाली । वरुषताती शरधारीं । तेथें खोचे जिव्हारी । महावीरु तो ॥१५४॥कृपाचार्य अश्वत्थामा । थोर पेटले संग्रामा । दु:शासना साउमा । पावला तेथें ॥१५५॥ऐसें कौरवसैन्य मिळालें । शरधारीं वरुषले । जैसे अ-भ्रामाजीं झांकुळलें । रविबिंब ॥१५६॥तेवेळीं तो ह्माळसेनू । करीं घेउनी धनुष्यबाणू । करिता जाला संधानू । वीरराजु ॥१५७॥तेणें शरजाळ तोडुनी । धनुष्य पाडिलें धरणीं । खंड विखंड अरणी । कौरवसैन्य ॥१५८॥मग भुद्नल हातीं घेतला । चरण चाली उतरला । गुरु हाणितला । मस्तकावरी ॥१५९॥घाईघाई आली कळवळी । मूर्च्छा येऊनि पडला भूमंडलीं । तंव पिटिली एक टाळी । कौरवसैन्यीं ॥१६०॥मागुता आला रथावरी । कर्णूं विंधिला दारी शरीं । सा-रथि आणि वारू चारी । पडिले रणीं ॥१६१॥सवेंचि गदा घेऊनि । धावि-त्रला चरणीं । अश्वत्थामा हाणोनि । पाडिला धरणीं ॥१६२॥तयाची परी कृपाचारी । गदाघातें हाणितला शिरीं । पाडिला धरणीयेवरी । मूर्च्छागतु ॥१६३॥तें देखोन दुर्योधनू । पळाला रथ घेऊनि । सबळु आणि दु:शासनू । पळती पुढा ॥१६४॥तंव समसप्तकु पाचारिला । वीरा राहे राहे सैरा । तेथें दोघां संग्रामु झाला । घोर देखा ॥१६५॥उरीं शिरीं कपाळीं । जानु जांग वक्षस्थळीं । दोघे वीर महाबळी । न लोटती एकमेकां ॥१६६॥तंव तेणें ह्माळसेनें । समसप्तकु हाणि-तला त्राणें । थोर मूर्च्छा आली तेणेम । पडला धरणीं ॥१६७॥दे-खोनि सैन्या सुटला पळू । कौरव सैन्यामाजी हलकल्लोळू । तो खव-ळला महाकाळू । अंगवेना ॥१६८॥कौरवसैन्य पुढें पळत । थोर हाहाकार होत । तेथें वर्तले जुगांत । महावीर ॥१६९॥तंव वो-लिला दुर्योधनु । श्रीगुरु कोठवरी पळोन । या पुढें नाहीं जाणें । सर्वथा आह्मी ॥१७०॥हा कपटिया नारायणू । येणें रचिलेंसे नि-र्वाणू । नातरी कैमचा ह्माळसेनू । कोठुनी आला ॥१७१॥न कळती या कृष्णाचें मत । एकएकासी निर्माण करीत । जय देणें पांडवांसा । भलतीयेपरी ॥१७२॥पहाजी सोळा वरुषाचा वीरु । अभिमन्यु धा-कुटें लेंकरूं । तेणें केला संहारूं । महावीरांचा ॥१७३॥तंव बोलले द्रोण गुरु । इतुका जाणसी विचारु । तरी कां करिसी वैराकारु । राज्य नेदिसी त्यांचें ॥१७४॥देवो तयाचा सारथी । ऐसें जाणसी निगुती । तरी कां धरितोसी अनिती । विचारू दुजा ॥१७५॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP