मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|द्रोणपर्व ह्माळसेन कथा| अभंग २६ ते ५० द्रोणपर्व ह्माळसेन कथा अभंग १ ते २५ अभंग २६ ते ५० अभंग ५१ ते ७५ अभंग ७६ ते १०० अभंग १०१ ते १२५ अभंग १२६ ते १५० अभंग १५१ ते १७५ अभंग १७६ ते २०० अभंग २०१ ते २२५ अभंग २२६ ते २५० अभंग २५१ ते २८२ ह्याळसेन कथा - अभंग २६ ते ५० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग २६ ते ५० Translation - भाषांतर भाट जाऊनि वेगेसि । सांगती ह्याळसेनासी । कौख प्रवर्तले युद्धासी । आले वेगीं ॥२६॥मग चालिले दळभार । चा-लिले पायाचे मोगर । तेथें तुंबळ झालें थोर । दोहीं दळीं ॥२७॥महींद्र मंथनीचे हल्लाळ । तैसें उसळलें पायदळ । अशुद्धाचें खल्लाळ । रणामाजी ॥२८॥मग उठावलें असिवार । तेंही भंगविलें पायाचे मोगर । रणकंदन केलें थोर । समरंगणीं ॥२९॥मग कुंजर भार उठावले । तेही असिवारां भंगिले । रक्तमांस कालविलें । चिखलु झाला ॥३०॥मग उठावले रहंवर । तेही पळविले कुंजर भार । शस्त्रीं न दिसे दिनकर । अभ्रामाजी ॥३१॥तेथें सुटले शरजाळ । बाणीं व्यापिलें अंतराळ । उठती अग्नीचे कल्लोळ । दही दिशा ॥३२॥तंव कर्णू उठावला । तेणें सबळ वाहानु पाचारिला । ह्मणे साहें साहें वहिला । जासी झणीं ॥३३॥ह्मणे साहें साहें गा वीरा । झणीं सरसील माघारा । माझिया घायाचा दरारा । लागला तुज ॥३४॥हें परिसोनियां उत्तर । कोपें खवळला महावीर । मग चा-लिला समोर । कर्णाउजु ॥३५॥ह्मणे एक वेळां पडिलासी । रण-भूमि सांडूनि पळसी । मुख दाखवितां न लाजसी । निर्लज्जा तूं ॥३६॥रणभूमि सांडूनि पळिजे । तेणें मुख केंवि दाखविजे । ह्लदय फुटोनि मरिजे । तरीचे भलें ॥३७॥अपकीर्तीसी जिणें । तें अप्रयोजक मी म्हणें । मुख दाखवितां लजिरवाणें । वीरांमाजी ॥३८॥ऐसें ह्मणोनियां गुणीं । विंधिला खडतर बाणीं । जैसा कोपला शूल-पाणी । महाभूतीं ॥३९॥कर्णू तोडी वरिच्यावरी । परी कासावीस केला भारी । सारथी आणि वारू चारी । पाडिले भूमीं ॥४०॥बाण घातीं विकळ केला । मूर्च्छागत भूमीं पडला । तंव अश्वत्थामा पावला । सांवरी वीरा ॥४१॥मग संधानाच्या शरीं । अश्वत्थामा येतां दुरी । तो भेदिला शरधारीं । विकळ केला ॥४२॥तंव पा-वला दु:शासन । तेणें खडतर घातले बाण । झाकुळले रविकिरण । आच्चदिलें दिसे ॥४३॥तयाचे शर तोडुनी । मग विंधिला अनि-वार बाणीं । दु:शासन पळविला रणीं । रथेंसहित ॥४४॥भूरि-श्रवा सोमदत्तु । तेही पाचारिला वीरनाथु । तुझा थोर पुरुषार्थु । देखिला आम्हीं ॥४५॥कृतवर्मा आणि पौंडरिकू । भगदत्तू पिंगाक्षू । अनंत विजयो बाहाळिकू । उठावले ॥४६॥तये वेळीं सबळ वाहानु । विरक्षत्रिया पंचाननु । तेणें तोडिलें बाणें बाणु । पाडिलें भूमीं ॥४७॥मग तेही सकळ वीरीं । रघु घातला माझारीं । वर्षताती शरधारीं । मेघ जैसें ॥४८॥प्रळयकाळीं जळधार । वर्षती अखंड धार । जैसा झाकोळला दिनकर । अभ्रामाजी ॥४९॥बापु येकला वीर राणा । सावरिपु असे त्याचिया बाणा । ते न साहवेचि म्हाळसेना । महावीरा ॥५०॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP