TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

स्फुट श्लोक - श्लोक १९ ते २५

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


श्लोक १९ ते २५
१९
अचाट वाट उगमु । विहंगमु विहंगमु । विवेक येक सुगमु । घडेल उत्तमोत्तमु ॥१॥
उकावतां पळेंपळु । उफाळतां चि वीमळु । मुळींहुनी उठावला । बळेंचि ऊर्ध पावला ॥२॥
विवंचितो विचक्षणु । विशाळ धूर्त तीक्षणु । शरु नभांत संचरे । विवेक निर्गुणीं भरे ॥३॥
भरें भरें बहु भरें । पुरे पुरे सिमा पुरे । नुरे नुरे अनु नुरे । नुरोनि संत वावरे ॥४॥
अनन्य तो अनन्य रे । अनन्य धन्य धन्य रे । अभेद भक्त तो भला । निवेदला निवेदला ॥५॥
२०
बहुत स्वप्रीचे सखे । परंतु कोण वोळखे । विशेष प्रीति संपदा । खरी नव्हे चि ते कदा ॥१॥
कितेक नम्र बोलती । कितेक मृद चालती । कितेक लोक वैभवें । कितेक वोढती जिवें ॥२॥।
कितेक प्रीतिची मनें । कितेक भव्य भोजनें । कितेक वस्र भूषणें । परोपरीं विभूषणें ॥३॥
गुणें विशेष सुंदरा । दिसे बरी वसुंधरा । बहुत वर्तमानसें । मनीं गमे गुमानसें ॥४॥
कितेक सौख्य देखिलें । कितेक सौख्य चाखिलें । कितेक आठवे मना । बरी करा विवंचना ॥५॥
कितेक स्वप्रीच्या धना । मनीं धरूनि वेधना । बहुत लोक लोधले । धरूनि वेध खेदले ॥६॥
प्रपंच हा विसंचरे । तया परीच संचरे । भुलों नका भुलों नका । क्षणीक सर्व वोळखा ॥७॥
विचित्र भास भासतो । विंवचितां उदास तो । मनास बुधि सांगणें । जनास काय सांगणें ॥८॥
उगीच लागली सवे । विचार सारसा नव्हे । बनव्हे नव्हे नव्हे चि रे । सवे सवे सवे चि रे ॥९॥
उदास दास उत्तरें । म्हणे स्वरूप तें खरें । समस्त संग वाव रे । स्वभाव तो स्वभाव रे ॥१०॥
२१
झकाझकी झकों नका । ठकाठकी ठकों नका । नको भरीं भरों नको । विवंचितां उरों नको ॥१॥
धिकारितां धिकारला । विकारितां विकारला । विसंचितां विसंचला । पुन्हां सवेंचि संचला ॥२
बहुत बोलिजे जनें । धरूनि काय तें मनें । जना जना पडेचिना । सुनिश्चयो घडेचिना ॥३॥
विवेक जाणतां मिळे । तरीच ज्ञान नीवळे । जनामधें बहुकची । कितेक लोक लालची ॥४॥
कळेचिना तरी वदे । तयास कोण चीत्त दे । खटखटीत न्याय रे । कळेल तो उपाय रे ॥५॥
२२
विवंचितो क्षणक्षणां । मती बहुत तीक्षणा । कळेल त्या विचक्षणा । अलक्ष लक्ष लक्षणा ॥१॥
घडी घडी पळेपंळु । नव्हे कदापि वीकळु । अखंड सावधान तो । वदे विधी विधान तो ॥२॥
परेश जो परात्परु । गुणी तयास तत्परु । निरूपणीं भरीं भरे । बहुत वीवरे वरे ॥३॥
विचारणा बरी करी । बहुत धारणा धरी । विशेष मानिजे तया । परीक्षवंत श्रोतया ॥४॥
न दीसतें चि पाहाणें । नसोन सर्व राहाणें । वदेचि तो घडी घडी । असार सार नीवडी ॥५॥
२३
भला भला भला भरे । भरे भरे  भरे चरे । चुका चुका चुका  चुका । फुका फुका चुकों नका ॥१॥
२४
नसोन जाणती कळा । कळा समस्त वीकळा । परांतरास नेणवे । तयास काये जाणवे ॥१॥
परांतरासि जाणता । नसेल तो मुळीं रिता । सिकोन काये सीफलें । विकोन काय वीकलें ॥२॥
भला भला विचक्षुण । प्रवीण योग्य तीक्षणु । खुणावितां खुणावला । मनें खुणोसि पावला ॥३॥
बहुत धूर्त तो भला । खुणोसि तूर्त पावला । न सांगतां जया कळे । निरोपितांचि नीवळे ॥४॥
अखंड हेत पालटे । कळेचिना मनु विटे । सुरंग ना विरंगसें । उगोंचि रंग भंगसें ॥५॥
२५
बहुत जाणती कळा । कळाचि होत वीकळा । कळोन ही कळेचिना । वळोन ही वळेचिना ॥१॥
बहुत धूर्त काउळा । परी न ये चि राउळा । वरीष्ट याति पाहिजे । समस्त सौख्य लहिजे ॥२॥
अधीर तें उतावळें । उतावळें चि बावळें । सुचिस्मंत्त काउळें । तयास काय सोवळें ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2014-04-02T06:02:11.7670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सैरभैर

  • वि. अस्वस्थ , चंचल . 
RANDOM WORD

Did you know?

कोणत्याही पूजेसाठी गणपती म्हणून चिकणी सुपारीला महत्व आहे, मग बाकीच्यांना कां नाही?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.