स्फुट श्लोक - अंजनीसुत

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


अंजनीसुत प्रचंड । वज्रपुछ कालदंड । शक्ती पाहातां वितंद । दैत्य मारिले उदंड ॥१॥
धग्गधगीतसी कळा । वितंड शक्ति चंचळा । चळ्ळचळीतसी लिळा । प्रचंड भीम आगळा ॥२॥
उदंड वाढला असे । विराट धाकुटा दिसे । तजूनि सुन्य मंडळा । नभांत पिंड आगळा ॥३॥
लुळीत बाळकी लिळा । गिळील सूर्यमंडळा । बहुत पोळत क्षणीं । थुंकिला ततक्षणीं ॥४॥
धगधगीत ब्बुबळे । प्रतक्ष सूर्यमंडळें । कराळ काळ मुख तें । रिपुकुळांसि दुख तें ॥५॥
रुपें कपी आचाट हा । करील आट घाट हा । सुवर्णकट्ट कास तो । फिरे उदास दास तो ॥६॥
झळक झक दामिणी । वितंड काळ कामाणी । तयापरी झळझळी । लुळितं रोमजावळी ॥७॥
समस्त प्राणनाथ रे । करी जना सनाथ रे । अतुळ तुळणा नसे । अतुळ शक्ति वीलसे ॥८॥
रुपें रसाळ बाळकु । समस्त चीत्तचाळकु । कपी परंतु ईश्वरु । विशेष लाधला वरु ॥९॥
स्वरुद्र क्षोभल्यावरी । तयास कोण सांवरी । गुणागळा परोपरीं । सतेज रूप ईश्वरी ॥१०॥
समर्थदास हा भला । कपीकुळांत शोभला । सुरारिकाळ क्षोभला । त्रिकूट जिंकिला भला॥११॥

चुके बहू घडी घडी । असी कसी महंतडी । प्रसंग मान जातसे । मयूरनृत्य होतसे ॥१॥

॥ स्फुट श्लोक संपूर्ण ॥ श्लोकसंख्या ॥ ७०० ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP