मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीनामदेव चरित्र| अभंग १४१ ते १५० श्रीनामदेव चरित्र अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० श्रीनामदेव चरित्र - अभंग १४१ ते १५० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तक अभंग १४१ ते १५० Translation - भाषांतर १४१वेदांसी न कळे शास्त्रें पैं भांडती । श्रुति विवादती ब्रह्मालागीं ॥१॥आवघेचि कर्मामुक्त उपदेश धर्म । हारपती पैं कर्में गुरुसेवा ॥२॥सेवेपरतें साधन नाहीं पैं उपदेश । हरीसि सौरस आपेंआप ॥३॥नामा म्हणे हरि गुरु आज्ञा काम । भजन निष्काम गुरुसेवा ॥४॥१४२उपजोनी सभाग्य तेचि एक जाले । जीहीं विचारिलें आत्महित ॥१॥सांडोनि मीपणास सद्गुरुचरणा । लागलों संपूर्ण भावार्थोंसि ॥२॥तयाचें जें कांहीं सर्व मज वोझें । नाहीं मज दुजें त्यासि कांहीं ॥३॥तयाचे ह्रदयीं संतपण प्रगटे । द्वैतपण तुटे क्षणामाजीं ॥४॥नामा म्हणे आम्हां विठोबाचे बोल । सांपडली वोल तरावया ॥५॥१४३सुखाचा सद्गुरु सुखरूप खेचरू । स्वरूप साक्षात्कारु दाखविला ॥१॥विठ्ठल पहातां मावळलें मन । ध्यानीं भरले नयन तन्मय जालें ॥२॥मी माझें होतें तें मजमाजि निमालें । जळें जळ गिळिलें जयापरी ॥३॥तेथें आनंदीं आनंदु वोळला परमानंदु । नाम्या जाला बोधु विठ्ठलनामें ॥४॥१४४नाशवंत देतां ब्रह्म येईल हातां । ऐसी ज्याची कथा पुराणांत ॥१॥सद्गुरुचे पायीं देहासि अर्पितां । तात्काळ मुक्तता हातां येते ॥२॥माया देऊनियां ब्रह्म घ्यावें हातीं । ऐशा गुरूप्रति कां भजाना ॥३॥नामा म्हणे गुरूपायीं लाभ आहे । मोक्ष तोही पाहे दास होतो ॥४॥१४५चंद्रभागे तीरीं आयकिल्या गोष्टी । वाल्मीकें शतकोटी ग्रंथ केला ॥१॥तेणें माझ्या चित्ता बहु जाले क्लेश । व्यर्थ म्यां आयुष्य गमाविलें ॥२॥जाऊनि राऊळा विठोसी विनविलें । वाल्मिकानें केलें रामायण ॥३॥असेन मी खरा तुझा भक्त देवा । सिद्धीस हा न्यावा पण माझा ॥४॥शतकोटी तुझे करीन अभंग । म्हणे पांडुरंग ऐक नाम्या ॥५॥तये वेळीं होती आयुष्याची वृद्धि । आतांची अवधि थोडी असे ॥६॥नामा म्हणे जरी न होतां संपूर्ण । जिव्हा उतरीन तुज पुढें ॥७॥१४६निश्चय पाहूनि उपजली दया । स्वामी देवराया पांडुरंगा ॥१॥सारजेसी सांगे भीमातीरीं हरी । बैस जिव्हेवरी नामयाच्या ॥२॥लाडकें लडिवाळ नामा माझें तान्हें । तयाला मजविण कोण आहे ॥३॥मजवरी त्याचें बहु असे ऋण । होईन उत्तीर्ण एवढयानें ॥४॥नामा म्हणे हातीं बांधोनियां वह्या । बैसे लिहावया पांडुरंग ॥५॥१४७अभंगाची कळा नाहीं मी नेणत । त्वरा केली प्रीत केशिराजें ॥१॥अक्षरांची संख्या बोलिले उदंड । मेरू सुप्रचंड शर आदि ॥२॥सहा साडेतीन चरण जाणावेअ । अक्षरें मोजावीं चौकचारी ॥३॥पहिल्यापासोनि तिसर्यापर्यंत । अठरा गणित मोज आलें ॥४॥चौकचारी आधीं बोलिलों मातृका । बाविसावी संख्या शेवटील ॥५॥दीड चरणाचें दीर्घ तें अक्षर । मुमुक्षु विचार बोध केला ॥६॥नामा म्हणे मज स्वप्न दिलें हरी । प्रीतीनें खेचरीं आज्ञा केली ॥७॥१४८खवळलों आतां न भिये रे तुज । सांडिली रे लाज लौकिकाची ॥१॥आम्ही दीन सिंपे यातिचे ते हीन । दे माझें ठेवणें केशीराजा ॥२॥साठ लक्ष संख्या चौर्यांसी कोटि । त्यांत मी कवडी सोडूं काय ॥३॥आणिक याहून असेल वेगळें । घेईन तें बळें जाण आतां ॥४॥तुझें थोरपण ऐक हें देवा । दुर्बळाचा ठेवा अभिलाषी ॥५॥म्हणूनि पोरटा नामा खेचराचा । काया मनें वाचा सत्य करी ॥६॥१४९ऐसें ऐकोनियां राजाई ते आली । रोषें येऊनि बोली बोलातसे ॥१॥देवानें हें दिलें तुम्ही कां पाठवा । काशाचा गणोबा बोलतसा ॥२॥ऐसें बोलोनियां हातें लोटी धोंटी धोंडा । तुमचिया वितंडा कोण पुसे ॥३॥देवें मज दिलें तुम्ही कां मागतां । अलंकार आतां घडीन मी ॥४॥नामा म्हणे धन ज्याचें त्यासी द्यावें । आपुलें तें घ्यावें आपणची ॥५॥१५०वाघाचिये गव्हाणीं बांधिलीसे गाये । कैसी तुं वो माये लोभाचारें ॥१॥कां मज संसारीं घालितोसि देवा । कैसी तुझी माया जीवा गोड वाटे ॥२॥विषयाचें गरळ पाजिसी केवळ । ह्रदया कोवळें कैसें तुझें ॥३॥नामा म्हणे मज आदिअंतीं एकु । जननी आणि जनकु पांडुरंग ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP