मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीनामदेव चरित्र| अभंग ११ ते २० श्रीनामदेव चरित्र अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० श्रीनामदेव चरित्र - अभंग ११ ते २० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तक अभंग ११ ते २० Translation - भाषांतर ११ केशवाचें प्रेम नामयाचि जाणें । नाम्या ह्रदयीं असणें केशवातें ॥१॥नामा तो केशव केशव तो नामा । अभिन्नत्व आम्हां केशवासी ॥२॥नामा म्हणे केशवा दुजेपण नाहीं । परि प्रेम तुझ्या ठायीं ठेवियेलें ॥३॥१२ सुख दुःख दोन्ही आम्हासीं सारिखीं । प्रतीति पारखी मना आली ॥१॥अंतर्बाह्म एक ब्रह्मचि कोंदलें । दुजेपण नेलें निपटोनि ॥२॥त्वचा टाकुनियां सर्प गेला बिळीं । मग तो सांभाळी कोण सांगा ॥३॥ओघ सोडूनियां गंगा सिंधू ठाये । विस्तराळीं धाये खळाळाची ॥४॥नामा म्हणे रात्र जैसी कां पाहाळे । धरणीतें जालें तैसें आम्हां ॥५॥१३ भक्ताचिया भावा होऊनि ऋणायितु । उभा असे तिष्ठतु पंढरिये ॥१॥महाद्वारींची हे तळींची पायरी । तो वैकुठावरी कळस केला ॥२॥भूतळींचे वैभव कायसें बापुडें । बोलतां लाज पडे देवराया ॥३॥त्या सुखाची नव्हाळी कैंची रसातळीं । बोलतां बोबडी जिव्हा पडे ॥४॥म्हणोनि पांडुरंग मौनचि राहिला । नाम्यानें धरिला दोन्हीं चरणीं ॥५॥१४ उठोनि प्रातःकाळीं ओढितां काचोळीं । जातो वेळोवेळीं महाद्वारीं ॥१॥अहो जी दातारा विनवी अवधारा । तुम्हीं यावें घरां भोजनासी ॥२॥रखुमाई सांगाते तुम्ही यावें तेथें । सामोग्री सांगातें चालावावी ॥३॥सडा संमार्जन हें माझें करणें । उदका भरणें सुगंधेंसी ॥४॥शेणपत्रावळी काढीन उष्टावळी । नित्य वेळोवेळीं हाचि धंदा ॥५॥नामा म्हणे देवा तुमचें तुम्ही जेवा । प्रसाद तो द्यावा सेवकासी ॥६॥१५ आजि आवतणें संतांचें । भोजन जालें हरिनामाचें ॥१॥आम्ही जेविलोंज जेविलों । नामामृतें पूर्ण धालों ॥२॥बरवी परावडी वैष्णवांची । आवडी पुरली हरिनामाची ॥३॥नामा केशवाचा म्हणे । माझे ह्रदयीं नारायण ॥४॥१६ अगाध महिमा यात्रा कार्तिकिये । आला पंढरीये नामदेव ॥१॥भक्तां शिरोमणी श्रीपंढरिनाथाअ । कृपाळुवा माता बाळकासी ॥२॥धन्य नाचदेव धन्य नामदेव । ह्रदयीं पंढरीराव न विसंबे ॥३॥प्रेमळ भक्त विळोन अपार । करिताती गजर हरिनामाचाअ ॥४॥नटयाटय कीर्तन झळकती गरुडटके । करिती ब्रह्मादिक पुष्पवृष्टी ॥५॥नामघोष श्रवण सकळां समाधान । चुकले जन्म-मरण कल्पकोटी ॥६॥नामा म्हणे जीव निवाला बा तेथें । पाहातां विठोबातें श्रम गेला ॥७॥१७ गरुडपाराजवळी नामदेव आला । सन्मुख देखिला पांडुरंग ॥१॥मेघःशाममूर्ती डोळस सांवळी । तें ध्यान ह्रदयकमळीं धरोनि ठेला ॥२॥धन्य नामदेव भक्त शिरोमणि । ज्याचा चक्रपाणि वेळाइतू ॥३॥पूर्ण सहज स्छिती जाला सुखाचा अनुभव । सकळ देहभाव पारूषले ॥४॥मन पांगुळलें स्वरूपीं गुंतलें । बोलणें खुंटलें प्रीतिमौन ॥५॥सबाह्म अभ्यंतरीं स्वरूप कोंदलें । द्वैत निरसलें दृश्याकार ॥६॥निजरूप निर्धारितां नयन सोज्वळ जाले । रोमांच दाटले खरबरीत ॥७॥आनंदाचा घन वोळला अंबरीं । वृष्टीस चराचेरीं होत असे ॥८॥तें क्षीर सेवितां जालें समाधान । चुकलें जन्ममरण कल्पकोटी ॥९॥सहज सुखें निवाला भवदुःख विसरला । विसावा भेटला पांडुरंग ॥१०॥नामा म्हणे दृष्टी लागेल पां झणीं । धन्य पुंडलिकाचेनि जोडलें सुख ॥११॥१८ दृष्टि उघडुनि नामा भोंवती जंव पाहे । तंव पुढें माय देखियेली ॥१॥म्हणे मजशीं नाम्या वैर कां साधिलें । बहुत दुःख जालें कोणा सांगों ॥२॥भक्तजनवत्सला परियेसी केशवा । भेटवी केधवां पूर्वस्थिती ॥३॥भोजना बैसले जेवीं क्षुधाक्रांत । न कोणाशीं माता न बोले कांहीं ॥४॥तें बळें उठविलें नव्हतां पैं तृप्ती । तैसी दुःखप्राप्ति जाली मज ॥५॥पूर्ण पान्हा धेनु यांतला वोरसे । वत्स थोर हर्षें पान करी ॥६॥तें धनियें देखोनि बळें आसुंडलें । तळमळित ठेले थोर आशा ॥७॥कृपणें संपत्ति जोडिली सायासें । तळमळी ते कैसें नेलियातें ॥८॥तैसी परी मज जाहली गा देवा । परियेसी केशवा मायबापा ॥९॥दुःखाचे सागरी पडिलों गा श्रीहरि । सुखरूप मुरारी निववी मातें ॥१०॥नामा म्हणे विठो कृपेचा सागरु । करावा अंगिकार अनाथाचा ॥११॥१९ माता वाट पाहे नामा अजुनी कां नये । देखोन विठ्ठल काय भुलला तेथें ॥१॥ऐसें मज पाहतां हेंचि घडे साचें । विठ्ठलीं मन त्याचें गुंतलें असे ॥२॥काय सांगों माय जाल देवळासी । जपतो अहर्निशीं विठ्ठ्ल नामाअ ॥३॥तहान भूक कांहीं आथीचना मनीं । विठ्ठल विठ्ठल म्हणोनि हाचि छंद ॥४॥नेणो कवण्या गुणें भुलविलें यातें । विंदान आमुतें न कळे कांहीं ॥५॥दिशा अवलोकितां प्राण नव्हे निश्चित । बहुत क्षुधाक्रांत जाली असे ॥६॥तेथून लवलाहे धांवत निघाली । महाद्वारा आली पहावया ॥७॥तो तंव पांडुरंगा सन्मुख देखिला । चित्रींचा लिहिला पुतळा जैसा ॥८॥नाहीं चळणवळण तटस्थ नयन । केलें निंबलोण योगिजनीं ॥९॥ते देखोनि मातेसी थोर द्वेष आला । क्रोधें आसुंडिला करीं धरुनि ॥१०॥तंव प्रेताचियेपरी पडिला भूमीवरी । देखोनि सुंदरी रुदना करी ॥११॥मग उचलोनि ओसंगा धरिला पोटासी । म्हणे कांरे रुसलासि सांग नाम्या ॥१२॥निढळासी निढळ निळवुनि ते रडे । माझिया कानाडे काय जालें ॥१३॥दृष्टि उघडुनी नामा भोंवतें जंव पाहे । तंअव सन्मुख माय देखियेली ॥१४॥येरी उचलोनि दिधलें आलिंगन । जालें समाधान तयेवेळीं ॥१५॥सुह्रदें सोयरीं सकळिकें मिळोनि । करिती झाडणी नानारपरी ॥१६॥माउली नव्हेसि तूं वैरिणी जाण । माझ्या केशवाची खूण अंतरली ॥१७॥शस्त्रेंविण वध केला अवचिता । जीव तळमळतां जाऊं पाहे ॥१८॥आतांअ परतोनी माझी वाट पाह्सी । साच रिपु होसी तरी जाणा ॥१९॥नामा म्हणे माते जाई हो येथुनी । मज जाई निरवूनि विठोबासी ॥२०॥२० नवमासवारी म्यां वाहिलासि उदरीं । आस केली थोरीं होसी म्हणोनी ॥१॥शेखीं त्यां रे नाम्या ऐसें काय केलें । वनीं मोकलिलें निरंजनीं ॥२॥कांरे नामदेवा जालासी निष्ठुर । न बोलसी उत्तर कांहीं ॥३॥सज्जन सोजरीं सांडियेली लाज । जालासि निर्लज्ज एकसरा ॥४॥प्रेमपिसें तुज लाविलें विठ्ठ्लें । रूप दावुनि केलें तद्रूप तुज ॥५॥यासि सेविलिया कैंची बाप माय । सर्व हाचि होय सर्वांठायीं ॥६॥ऐसियाचा संग धरियला तुवां । परिणामीं अनुभवा जाणशील ॥७॥संत सनकादिकां लावियेलें वेधीं । तींहीं संसार उपाधि सांडियेली ॥८॥विठ्ठल विठ्ठल हेंचि पैं चिंतन । विटेसहित चरण धरियेले ॥९॥ऐसें शिकवितां नाम्याचें न मोहरे चित्त । पाहतसे तटस्थ तन्मय दृष्टी ॥१०॥नामा म्हणे माते वायां कां कष्टसी । विठोबा जीवेंसि जडला जाण ॥११॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP