मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीनामदेव चरित्र| अभंग ६१ ते ७० श्रीनामदेव चरित्र अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० श्रीनामदेव चरित्र - अभंग ६१ ते ७० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तक अभंग ६१ ते ७० Translation - भाषांतर ६१ जावोनियां नामदेव । बोले गणोबासी भाव ॥१॥द्र्व्य द्यावें हो सत्वरीं । आम्हीं जातों आपुल्या घरीं ॥२॥मग म्हणे धोंडोबासी । तुम्ही जामीन ऐवजासी ॥३॥द्र्व्य द्यावें हो लवकरीं । नाहीं तरी चलावें घरीं ॥४॥ऐसें बोलोनि धोंडोबासी । पुढें लोटिलें तयासी ॥५॥नामा पंढरिसी आला । संगें धोंडोबा आणिला ॥६॥६२ कुलुप अर्गळा घालोनि कोठडिसी । घातलें धोंडयाशीं बंदीखानीं ॥१॥गोणाई दामासेठी नव्हती तेव्हां घरीं । गेली भीमातीरीं स्नानालागीं ॥२॥नामदेव गेले राउळा त्वरित । सांगतसे मात केशवासी ॥३॥दामासेठी आले स्नान करूनियां । राजाई त्यां पायां लागुनि बोले ॥४॥ऐका हो मामाजी पुत्राची हे मात । धोंडयाशीं घरांत कोंडियलें ॥५॥दामासेठी बोले नामा कोठें गेला । बोलवा तयाला झडकरी ॥६॥नारा महादा दोघे जाती राऊळासी । बोलाविती नाम्यासी चला घरीं ॥७॥मुखाकडे पाहे केशवाच्या नामा । घरीं जातां दामा मारिल तो ॥८॥देव म्हणे नाम्या भिऊं नको मनीं । नाम हें निर्वाणीं तारिल तुज ॥९॥नामा घरां आला दामासेठीपायीं । नमस्कारूनि त्यांही उभा पुढें ॥१०॥दामासेठी म्हणे नाम्या काय केलें । धोंडयाशीं कोंडिलें घरामध्यें ॥११॥६३ अरे नाम्या काये केलें । कासया धोंडयाशीं कोंडिलें ॥१॥उदीम बरावा फळा आला । हरविलें भांडवला ॥२॥संसारिक चतुर बहु । मातीसमान घेसी गहूं ॥३॥नामा म्हणे दामासेठी । माझी ऐकावी हे गोष्टी ॥४॥६४ ऐका दामासेठी सांगतों तुम्हासी । द्रव्यही कुळासी मागुन घ्यावें ॥१॥मालधनी आलों घेऊनियां घरा । तुम्ही कां दातारा गांजितसां ॥२॥नामदेव म्हणे धोंडोबा नाईका । मिती आणि पैका द्यावा वेगीं ॥३॥६५धोंडोबा नामदेवें काढिला बाहेरी । अंतर्बाह्याक्तारीं सोनें जालें जालें ॥१॥दामासेठी पाहुनी नामयासी बोले । वेर्थ म्यां छळिलें तुज बाळा ॥२॥राजाई गोणाई धांवोनियां आली । विनीत होऊनि बोली बोलताती ॥३॥आम्ही हे कुटुंबी द्र्व्या नाहीं घरीं । म्हणोनि श्रीहरी पावलासी ॥४॥गोणाई दामासेठी सांगे नामदेवा । न बोलावें भावा जनीं बापा ॥५॥जगा मात कळलियावरी । नेतील हिरोनि धोंडोबासी ॥६॥नामदेव म्हणे आपुलें द्र्व्य घ्यावें । उरलें तें धाडावें गणोबासी ॥७॥६६क्षेत्रीं हा वृत्तांत कळला सर्वाशीं । आले पंचक्रोशी सभोंवते ॥१॥धोंडोबा गणोबा होते ज्याचे रानीं । ते आले धांवोनि मागावया ॥२॥आपुलें द्र्व्य घ्यावें धोंडोबशीं द्यावें । नाहीं तरी चलावें पंचाइती ॥३॥नामदेव म्हणे द्र्व्य तुम्ही द्यावें । आपुले घेवोनि जावें धोंडोबासी ॥४॥६७सकळ समुदाव मिळोनियां आले । द्र्व्य देउनि नेलेंज धोंडोबाशीं ॥१॥धोंडोबाशीं सकळिके ग्रामस्थीं आणिले । पूर्ववत जाले दगडची ॥२॥नामा म्हणे विठो पावला निर्वाणीं । भक्तां चक्रपाणि रक्षितसे ॥३॥६८आई जे शिकवी तीतें तुम्ही नाईका । नाहीं भय शंका लौकिकाची ॥१॥लावोनि लंगोटी जालेती गोसावी । आमुची उठाठेवी कोण करी ॥२॥ऐसी तुमची स्थिती विलग देखोनि । पडिलें चिंतवनीं काय करूं ॥३॥धडचि कांटीये घातलें हो कैसें । बळेंचि आपणा पिसें लावियेलें ॥४॥सुखाचा संसार करोनि बारा वाटे । नांव केलें मोठें जगामाजीं ॥५॥तोडियेला मोह सांडियेली माया । भुलविले तुमचिया चित्ता कोणें ॥६॥कवणें पुण्य ऐसी जोडियेली जोडी । केली बिघडाबिघडी आम्हां तुम्हां ॥७॥तुमचि हे गति लेकुरें नेणति । कोण चालविती घराचार ॥८॥म्हणोनि माझें चित्त आपुलेनि उद्वेगें । कवणा जीवींचे सांगे सुखदुःख ॥९॥सर्वस्वें सांडोनि धरिला तुम्ही देव । येणें पुसिला ठाव संसारींचा ॥१०॥आमची कणव न वाटेचि कांहीं । विनविते राजाई नामदेवा ॥११॥६९घरधनि याणीं केला गुरु । बाई मी आतां काय करूं ।असोनि नाहींसा संसारू । चमत्कार कृपेचा ॥१॥धांवे पावे गे मेसाई । येथें कोणाचें न चाले कांहीं ।सत्यपण तुझे ठायीं । तरी हें नाहिसें करी गे ॥२॥मंत्र घेतला जैसा । घरीं संताचा वोळसा ।वोस पडो हरिदासा । गेले नमत मागुते ॥३॥काय सांगों याची रीती । सोसे सोसे पाये चरणाप्रती ।अवघे भांबडभूत होती । नाचताती आनंद ॥४॥लौकिकांत गेलीं वायां । एकाच्या एक पडती पायां ।म्हणती ये गा पंढरिराया । ब्रह्मानंदें डुल्लतां ॥५॥भोळी सासू गोणाबाई । पांढरा स्फटिक व्याली पाही ।त्यानें जोडिल शेषशायी । काय राजाई करूं म्हणे ॥६॥७०दोन प्रहर रात्र पाहोनी एकांत । राजाई वृत्तांत सांगे माते ॥१॥अहो रखुमाबाई विठोबासि सांगा । भ्रतारासि कां गा वेडें केलें ॥२॥वस्त्र पात्र नाहीं खाया जेवयासी । नाचे अहर्निशीं निर्लज्जसा ॥३॥चवदा मनुष्यें आहेत माझ्या घरीं । हिंडती दारोदारीं अन्नासाठीं ॥४॥बरा मार्ग तुम्ही उमजोनि सांगा । नामयाची राजा भली नव्हे ॥५॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP