मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीनामदेव चरित्र| अभंग ९१ ते १०० श्रीनामदेव चरित्र अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० श्रीनामदेव चरित्र - अभंग ९१ ते १०० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तक अभंग ९१ ते १०० Translation - भाषांतर ९१निवृत्तिदेव म्हणे ऐसें म्हणों नये । धन्य भाग्यें पाहे संत आले ॥१॥आपुलेंज स्वहित करावें आपण । संतांच्या सन्माना चुकों नये ॥२॥धन्य हो ते नर राहाती पंढरीं । श्वान त्यांचे घरीं सुखें व्हावें ॥३॥नामदेवा संगें देवाचा हो वोढा । प्रेमें केला वेडा पांडुरंग ॥४॥निवृत्ति म्हणे त्यासी न म्हणे आरे तुरे । बाई ठेवितां बरें डोई माते ॥५॥म्हणे मुक्ताबाई घाला लोटांगण । आपणां दर्शन नलगे त्याचें ॥६॥९२कुलालाचे कुंभ भाजल्याविण माती । काय आहे संगतीं पाणियाची ॥१॥मेणाची पुतळी घेतां करीं बरी । अग्निचे शेजारीं राहे कैशी ॥२॥तैसा अधिरासी काय संतसंग । मृगजळा तरंग येतील कैसे ॥३॥तें आजि नवल देखियेलें डोळां । दगड जैसा जळां वेगळेपण ॥४॥म्हणे मुक्ताबाई जाऊं देऊं नये । ऐसें सरिसें काय भांडें करा ॥५॥९३कुलाल आपल्या घरीं भाजवी भाचरी । म्हणे जैं होईल हरि कृपावंत ॥१॥हरीसि वरदळ लावितो निशिदिनीं । धाडिला म्हणोनि तुम्हांपाशीं ॥२॥तुम्ही संतजन उद्धराल तत्काळ । नामा लडिवाळ विठोबाचा ॥३॥राखावें तें ब्रीद करावें पावन । धान बोलावणें गोरोबाला ॥४॥म्हणे मुक्ताबाई भाजलें कीं कोरें । काकाचें उत्तर सत्य मानूं ॥५॥९४गोरा जुनाट पैं जुनें । हातीं थापटणें अनुभवाचें ॥१॥परब्रह्म म्हातारा निवाला अंतरीं । वैराग्याचे वरी पाल्हाळला ॥२॥सोहं शब्द विरक्ति डवरली आंतरीं । पाहातां आंबरी अनुभव ॥३॥म्हणे मुक्ताबाई घालूं द्या लोटांगण । जाऊं द्या शरण अव्यक्तासी ॥४॥९५मोतियांचा चुरा फेंकिला अंबरीं । विजुचिया परी कीळ जालें ॥१॥जरी पितांबरें नेसविलीं नभा । चैतन्याचा गाभा नीलबिंदू ॥२॥तळीपरि पसरली शून्याकार जाली । सर्पाचिये पिली नाचूं लागे ॥३॥कडकडोनि वीज निमाली ठायिंचे ठायीं । भेटली मुक्ताबाई गोरोबाला ॥४॥ज्ञानदेव म्हणे कैसी जाली भेट । ओळखिलें अविट आपुलेंपण ॥५॥९६निवृत्तिदेव म्हणे चला गुंफेमधीं । अचळ हे आदि समाधी असे ॥१॥सद्गुरुप्रसादें बोधिली नेटकी । गुहे गौप्य ताटी आड केलीं ॥२॥दंड चक्राकार बांधिली चौकुन । आंत संतजन करिती वासा ॥३॥ऐसे गुंफेमध्यें नाहीं नामदेव । म्हणुनि माझा जीव थोडा होतो ॥४॥गैनीची मिरास घेतला प्रमाण । पूर्वभूमि जतन करित आस ॥५॥निवृत्तिदेव म्हणे मुक्ताईच्या उत्तरें । भाजलें कीं कोरें कळों येईल ॥६॥९७परस्परें गुह्य करिती भाषण । म्हणती महाधन गांवा आला ॥१॥रक्त श्वेत पीत नीळ वर्णाकार । नक्षत्रांची वर पूजा केली ॥२॥प्रकाशमय तत्त्व ज्योतिर्मय पहाणें । दीप त्रिभुवनीं एक जाला ॥३॥निवृत्तिदेव म्हणे कुलालाचें चक्र । अंतर बाहेर एक ऐसें जालें ॥४॥९८हांसोनि सोपानें खुणाविल्या खुणा । नामदेवा पाहुणा आला असे ॥१॥तयासी हो पाक पाहिजे पवित्र । भाजलें कीं कोरें कळों नेदी ॥२॥मुक्तिकेचे पाराखी तुम्ही आहां देवा । भाजुनि जीवा शिवा ब्रह्म करा ॥३॥आनंदें डुल्लती करावरी कर । नेणों राहिलें कोरें कोण्या गुणें ॥४॥निर्गुणापासोनी सगुणाची संगती । नाहीं स्वरूपस्थिति अंगा आली ॥५॥म्हणे मुक्ताबाई हेरोनियां हेरा । हिरा किंवा गारा नेणों बापा ॥६॥९९जोहारियाचे पुढें मांडियेलें रत्न । आतां मोला उणें येईल कैसें ॥१॥तैसें थापटणें पारखियाचा हात । वाफ जाल्या घात वायां जाती ॥२॥प्रथम थापटणें निवृत्तीच्या माथा । डेरा जाला निका परब्रह्म ॥३॥तेंचि थापटणें ज्ञानेश्वरावर । आतां कैंचें कोरें उरे येथें ॥४॥तेंचि थापटणें सोपानाचे डोईं । यांत लेश नाहीं कोरें कोठें ॥५॥तेंचि थापटणें मुक्ताबाईला हाणी । अमृत संजिवनी उतूं आली ॥६॥तेंचि थापटणें नामदेवावर । डोई चोळूं मोहरे रडों लागे ॥७॥गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई । सुन्नेभरि नाहीं भाजियेला ॥८॥१००संतसमागम फळला रे मला । सन्मानाचा जाला लाभ मोठा ॥१॥अतीथि आदर केला मुक्ताबाई । लांकडानें डोई फोडिली माझी ॥२॥देवानें गोंधळ घातला गरुडपारीं । भिजली पितांबरी अश्रुपातीं ॥३॥माझें माझें म्हणोनि गाईलेंज गार्हाणें । कळलें संतपण हेंचि तुमचें ॥भरी भरोनियां आलों तुम्हांज जवळी । कैकाड मंडळी ठावी नोव्हे ॥५॥नामा म्हणे सन्मान पावलों भरून । करितां गमन बरें दिसे ॥६॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP