मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|नाममहिमा| अभंग १५१ ते १६३ नाममहिमा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० अभंग १५१ ते १६३ नाममहिमा - अभंग १५१ ते १६३ श्री संत नामदेवांनी गंगा नदीचे माहात्म्य इतके छान वर्णन केले आहे की, जणू प्रत्यक्ष गंगास्नानाचा भास होतो. Tags : abhangbooknamdevअभंगगंगामाहात्म्यनामदेवपुस्तक अभंग १५१ ते १६३ Translation - भाषांतर १५१सुलभ सोपारें नाम केशवाचें । आठविताम वाचे दोष जाती ॥१॥अनाथाचा सखा उभा नामापासीं । ऐसा तो प्रेमासी भुललासे ॥२॥जातिवंत आम्ही वेदाचे पाठक । तरी सर्व फिकें नामाविण ॥३॥नामा म्हणे नामीं रंगलों सतत । म्हणोनि अनंतें दिधली भेटी ॥४॥१५२विसावा विश्वाचा जो प्राण जीवाचा । तोचि नित्य वाचा जपों आम्ही ॥१॥गोविंद वामन भावयुक्त भजन । सर्व जनार्दन हाचि भाव ॥२॥चैतन्य अचिंत्य नाम हेंचि सत्य । नित्यता कृतार्थ विठठलनामें ॥३॥नामा म्हणे उद्धरण आणिक नाठवे । केशवचि सवें पुरे आम्हां ॥४॥१५३राम हेंचि स्नान राम हेंचि ध्यान । रामें घडे यज्ञ कोटी देखा ॥१॥न लगती साधनें नाना मंत्र विवेक । रामनामीं सुख रंगीं कां रे ॥२॥नामा म्हणे नाम हेंचि वचन आम्हां । नित्य ती पौर्णिमा सोळा कळी ॥३॥१५४शास्त्राचेम हें सार वेदाचें गव्हर । उतरावया पार आणिक नाहीं ॥१॥विठठल विठठल म्हणा उघडा मंत्र जाणा । कळिकाळ अंकणा होईल तुम्हां ॥२॥न करावें खंडन खंडन उच्चारण । तप अनुष्ठान न लगे तुम्हां ॥३॥सिद्धीचे हें सार मुक्तीचें माहेर । उतरावया पार दुजें नाहीं ॥४॥विठठलापरतें काय करीसी दैवत । परब्रह्म निरुतें पंढरीये ॥५॥सिद्धीचें सहज भक्तीचे हें बीज । केशवीं दिलें मज म्हणे नामा ॥६॥१५५मुक्तिप्रद आहे एक विठ्ठल नाम । आतां क्रियाकर्म कवणालागीम ॥१॥राहेम राहेम तूं मना निवांत । ध्याई अखंडित नारायणा ॥२॥संतसमागम साधी हें साधन । पावसी निर्वाण नित्य सुख ॥३॥नामा म्हणे भज श्रीगुरुच्या पायीं । तरी वर्म ठायीं पडेल जाण ॥४॥१५६करिताम हे वेदाध्ययन ज्योतिष । नामाचा तो लेश न ये हातां ॥१॥बहुत व्युत्पत्ति सांगति पुराण । व्यर्थ तें स्मरण नाम नव्हे ॥२॥अनंत हें नाम जयांतुनि आलें । त्यांतचि विरालें जळीं जळ ॥३॥तें नाम सद्गुरुकृपेविण कोणा । साधिताम साधेना जपें तपें ॥४॥नामदेव म्हणे स्वतःसिद्ध नाम । गुरुविण वर्म हाताम न ये ॥५॥१५७ज्ञान ध्यान जप तप साधन तें । नाम प्रत्ययातें न ये कोणा ॥१॥गुरुपदीं जावें आधीं हो शरण । मी हें माझें ओळखुन घ्यावें नाम ॥२॥तयाचें तें मूळ पाहोनियां त्यांते । मिळवावें द्वैत अद्वैतातें ॥३॥द्वैत द्वतातीत स्वयंभ संचलें । तेंचि नाम आलें त्रिभुवनीं ॥४॥नामदेव म्हणे परब्रह्म नाम । द्वैत क्रियाकर्म नाहीं तेथें ॥५॥१५८सद्गुरुवांचुनी नाम न ये हातां । साधन साधितां कोटी गुणें ॥१॥जैसा कांतेविण करणें संसार । तैसा हा व्यापार साधनांचा ॥२॥जंव सद्गुरु नाहीं केला भ्रतार । साधनाविचार व्यर्थ गेला ॥३॥नामदेव म्हणे सदगुरुपासोनी । नाम घ्या जाणोनी नाना कांहीं ॥४॥१५९चंद्र्भागतीरीम उभा राहिलासी । भक्तांचे मानसीं भाव मात्र ॥१॥काय पुंडलिकें केल्या तपरासी । जाणोनि मानसीं भावमात्रें ॥२॥भावेंविण देवा सर्वथा नातुडे । नेणती बापुडे बद्धजन ॥३॥नामा म्हणे माझें माहेर पंढरी । भेटती महाद्वारीं संतजन ॥४॥१६०देवाचे हे आत्मे जाणावे संत । त्यांचे पदीं रत सर्वभावें ॥१॥श्रीहरीची भेटी सहजचि होय । श्रम लया जाय जाला आधीं ॥२॥पापाचे पर्वत भस्म नामाग्नीनें । अभक्तासी हाण नामविण ॥३॥नामदेव म्हणे नामाग्नीच्या पोटीं । नाना पाप कोटी दग्ध होती ॥४॥१६१अवघे ते दैवाचे विठठल म्हणती वाचे । अवघे कुळ त्यांचे पुण्यवंत ॥१॥अवघेचि संसारीम जाणावे ते धन्य । ज्यांचे प्रेम पूर्ण पांडुरंगीं ॥२॥अवघा विठठल भोतिती दिनरातीं । वोळगे किंकरवृत्ति नामा त्यांतें ॥३॥१६२म्हणे दीनबंधू तुम्ही सावध व्हावें । संतांशीं नमन नाम वाचें जपावेम ॥१॥नामाविण साधन नाहीं या कलियुगी । व्यर्थ श्रम होती पाहतां मत्तें ॥२॥मताभिमान करोनि तुम्ही जाल आड वाटां । अभिमानें ठकविले नारदादि श्रेष्ठा ॥३॥आलिया जन्मास आतां न करी आळस । नामदेवालागीम सांगे जगन्निवास ॥४॥१६३सकळ संतजन देखोनि नयनीं । टाळिया पिटोनी गाता नाम ॥१॥म्हणती धन्य भक्त निधडा वैष्णव । ब्रह्मादिकां माव न कळे याची ॥२॥कैसा ऋणिया केला पंढरीनाथ । आहे सदोदित याचेजवळी ॥३॥पूर्वी तो प्रल्हाद श्रवणीं ऐकिला । किंवा हा देखिला संतामधीं ॥४॥नामा येऊनियां चरणासी लागला । ह्रदयीं आलिंगिला भक्तराज ॥५॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP