मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|नाममहिमा| अभंग ३१ ते ४० नाममहिमा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० अभंग १५१ ते १६३ नाममहिमा - अभंग ३१ ते ४० संत नामदेवांनी गंगा नदीचे माहात्म्य इतके छान वर्णन केले आहे की, जणू प्रत्यक्ष गंगास्नानाचा भास होतो. Tags : abhangbooknamdevअभंगगंगामाहात्म्यनामदेवपुस्तक अभंग ३१ ते ४० Translation - भाषांतर ३१जप तप अनुष्ठान हरी । एकचि तो नमस्कारी ।भूतद्वेष कदा न करी । तप सामुग्री हेचि तुझी ॥१॥हरी माधव यादवा । कृष्णा गोविंद केशवा ।येणें करोनियां जीवा । सर्वकाळ रंजवी ॥२॥स्मरतां हरीचें नाम । पळोनी जाति काळयम ।तुटता नाना योनी जन्म । गर्भवासा मग नये ॥३॥नामा जपे नामावळी । अखंड तप हेंचि सदाकाळीं ।हरीनामें पिटोनि टाळी । हाचि तरणोपाय सकळांचा ॥४॥३२सर्वकाळ हरी जप । हेंचि तपामाजीं तप ।न लागती घालावे संकल्प । नाना मंत्राचे परियेसी ॥१॥मंत्रामाजीं मंत्रसार । रामकृष्ण हाचि उच्चार ।नित्यानित्य निर्विकार । हाचि जोडेल साचा रे ॥२॥मागें कृतायुगीं सांगों । त्रेतायुगीं काय ओळगों ।द्वापारीं कृष्णरंगे रंगो । परी कलीमाजी नामतारक ॥३॥नामा म्हणे ग्रंथीं । पाहे पा यथा निगुती ।नाम जपतांची तरती । हें व्यासाचें वचन ऐसें ॥४॥३३नाम वाचे उच्चारितां । हरे संसाराची व्यथा ।जाती दोषाचिया चळथा । रामकृष्ण उच्चारणीं ॥१॥हरी माधव गोविंद । याची नामाचा जया छंद ।तोचि पावेल परमपद । निजभुवन वैकुंठीं ॥२॥जन्मजन्माची तपरासी । तेणें नाम आलें मुखासी ।स्मरतां हरी ह्रषिकेशी । सकळ पूर्वजां उद्धार ॥३॥नामा जपे ध्यानीं मनीं । अखंड विठ्ठल हरी कीर्तनीं ।तेणें जपें ये मेदिनी । कोटी यज्ञ घडले ॥४॥३४रुपाचें रुपस नाम ह्रषिकेश । पंढरी निवास जप करी ॥१॥विठ्ठल श्रीहरी मुकुंद श्रीहरी । नामेंचि बोहरी प्रपंचाची ॥२॥विठठल नामामृत हेंचि जीवन होत । नाम हें मुखांत केशवाचें ॥३॥नामा म्हणजे देव अमृताचा लाठा । मुखामाजी पेठा होत नामें ॥४॥३५सर्वांग साजिरीं आहेती इंद्रियें । तंव सावध होय हरीकथे ॥१॥कीर्तन नर्तन वाचे जनार्दन । न पावसी पतन येरझारीं ॥२॥पूर्ण मनोरथ घडती एका नामें । दाटले सप्रेमें जीवन हेतु ॥३॥नामा म्हणे विलास न करी तूं आणिक । सर्वीं सर्वां येक नाम असे ॥४॥३६ऐकतां कीर्तन जीवन्मुक्त । दाविसी अनंत नाममात्रें ॥१॥मृत्युलोकीं जो जन्म इच्छी नर । त्याच्या पुण्या पार कोण वाणी ॥२॥भक्तिसारामृत श्रेष्ठ कलियुगीं । उद्धरिले योगी ब्रह्मादिक ॥३॥नामा म्हणे मज नाहीं चिंता भय । ह्रदयीं तुमचे पाय पुरे आतां ॥४॥३७कीर्तनाच्या सुर्खे होतो देव । कोण तें वैभव वाणी आतां ॥१॥अंत्यज आणि जातिवंता । मुखीं नाम घेतां उडी घाली ॥२॥बैसोनी आसनीं आळवितां नाम । उभा सर्वोत्तम तयापुढें ॥३॥प्रेमाचिया भरें उभ्यानें गर्जत । नाचे हा अनंत तयासवें ॥४॥नामा म्हणे तया कीर्तनाची गोडी । घालीतसे उडी नेटेपाटें ॥५॥३८काळवेळ नसे नामसंकीर्तनी । उंच नीच योनी हेंहि नसे ॥१॥धरा नाम कंठी सदा सर्वकाळ । मग तो गोपाळ सांभाळील ॥२॥कृपाळू कोंवसा सुखाचा सागर । करील उद्धार भाविकांसी ॥३॥नामा म्हणे फार सोपें हें साधन । वाचे नाम घेणें इतुकेंचि ॥४॥३९गीता हेचि गंगा गुह्यभाव पैं गा । नाम हेचि वेगा सोडवण ॥१॥सर्व ब्रह्म हरी सांगतसे मुरारी । विश्वरुप श्रीहरी आपण जाला ॥२॥उपदेश अर्जुना जनीं जनार्दना । अखंड भावना भूतदया ॥३॥नामा म्हणे सर्व आहे हाचि देव । उदार माधव सर्वांभूतीं ॥४॥४०नामाचें चरित्र सदा अति गोड । तीर्थें काय चाड नाममात्रें ॥१॥ऐसा दृढ मनीं करावा विचार । नाम परिकर कलियुगीं ॥२॥नामा म्हणे नाम अनादि अक्षर । उभा कटीं कर भक्तांसाठी ॥३॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP