मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|नाममहिमा| अभंग ७१ ते ८० नाममहिमा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० अभंग १५१ ते १६३ नाममहिमा - अभंग ७१ ते ८० संत नामदेवांनी गंगा नदीचे माहात्म्य इतके छान वर्णन केले आहे की, जणू प्रत्यक्ष गंगास्नानाचा भास होतो. Tags : abhangbooknamdevअभंगगंगामाहात्म्यनामदेवपुस्तक अभंग ७१ ते ८० Translation - भाषांतर ७१नामाचा धारक विष्णुरुप देख । वैकुंठीचें सुख रुळे पायीं ॥१॥निराकार देव आकारासी आला । भक्तीं पैं स्थापिला नामरुपा ॥२॥नाममंत्र बीज जोंवरी नाहीं जया । तोंवरी केशवदया नाहीं प्राप्त ॥३॥नामा म्हणे नाम केशव केवळ । जाणती प्रेमळ हरीभक्त ॥४॥७२सदा पैं परिपूर्ण जयाचें रुपडें । तेथेंचि माजीवडे मन करी ॥१॥होईल उद्धार सुटेल संसार । सर्व मायापूर दुरी होय ॥२॥कांठाळा कायेचा दुरावा मायेचा । हेंचि जप वाचा स्मरे नाम ॥३॥नामा म्हणे करी सर्व हरी हरी । राम हें उत्तरीं वाखाणी पां ॥४॥७३रकार मकार बांधी कां रे तुळीं । तापत्रय होळी होऊनि जाय ॥१॥गोविंद मुकुंद हरि परमानंद । कृष्ण केशव छंद नित्य वाचे ॥२॥जपे जग्दबंधु हरिकथा छंदू । बिघडे भवबंधु येणें मात्रें ॥३॥नामा म्हणे केशवा न करी निर्वाण । माझा अभिमान आहे त्यासी ॥४॥७४शंभु उपदेशी भवानीसी । रामनाम जपे मानसीं ॥१॥दोन्हीं अक्षरें रसाळें । महा पातकां करी निराळें ॥२॥वीजमंत्र राजनाम । फळ शतकोटी रामायण ॥३॥नामा विनवितो रघुनंदना । विनती परिसा दशरथनंदना ॥४॥७५संसार पाल्हाळ सांगसी परिकर । नाम तें श्रीधर न म्हणसी ॥१॥कैसें तुज उद्धरण होईल गव्हारा । भजन त्या हरीहरी करी वेगीं ॥२॥योनी नानाविद्या पावसी आपदा । हाचि खेळ सदा स्मरतोसि ॥३॥नामा म्हणे लटिकें प्रपंचासी मुके । राम हेंचि मुखें जप करी ॥४॥७६गाणें गाती रे सुगडें । तया हांसति दुधडें ॥१॥नाम गोड नाम गोड । होय जन्माचा निवाड ॥२॥हांसे त्यासी हांसूं द्यावें । गात आपण असावें ॥३॥नामा म्हणे जे हांसती । त्यांचीं कुळें नरका जाती ॥४॥७७नाम एकचि तारक । रामनामें शुद्ध मुख ।येणें उद्धरती तिन्ही लोक । कुळांसहित वैकुंठ ॥१॥धन्य धन्य तें कुळ । रामनामें नित्य निर्मळ ।जो उच्चारी सर्वकाळ । धन्य जन्म तयाचा ॥२॥एक हरी एक तत्त्व । तेथें धनोनियां शुद्ध सत्त्व ।नाना काय करिसी कवित्व । राम नाम उच्चारी ॥३॥नामा जपे नाम मंत्र । हातीं न घे आणिक शस्त्र ।रामकृष्ण हें वक्त्र । उच्चार इतुकेचि पुरे आम्हां ॥४॥७८न लगती कथा व्युत्पत्ति उलथा । वाउग्या चळथा ग्रंथाचिया ॥१॥हरि हरि भजन जनीं जनार्दन । सर्वत्रीम समान भूतदया ॥२॥भावेंचि भजावें हरीतें पूजावें । नित्य हें सेवावें रामनाम ॥३॥नामा म्हणे गोड नको तें हे वाड । विठठलाचें वेड इतुकें पुरे ॥४॥७९मंत्राचा पैं मंत्र हरी हरी उच्चार । न लागे तो विचार करणें कांहीं ॥१॥सुफळ नाम गाढें वाचेसि उच्चारुं । केशव हाचि करुं सर्वांभूतीं ॥२॥नाहीं यासी पतन न होईल बंधन । नित्य हेंचि स्नान रामनामें ॥३॥नामा म्हणे भाव सर्वांभूतीं करा । आणिक पसारा घालूं नका ॥४॥८०नाचताम उडतां रडताम पडतां । नाम्या अवचितां हातां आला ॥१॥येतां जातां हरि हरि हरि वाटे । नाम तें चोखटें स्मरा मुखीं ॥२॥हंसतां खेळताम घरीं दारीं पारीं । मुखीं हरि हरि म्हणे कां रे ॥३॥खाताम जेवितां अन्नतृप्ति सारी । सांडी मांडी हरी सर्व काळ ॥४॥नामा म्हणे नामीं आस्ति नास्ति ठसा । केशव हरि सन्मुख तुम्हां दिसे ॥५॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP