मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|नाममहिमा| अभंग ११ ते २० नाममहिमा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० अभंग १५१ ते १६३ नाममहिमा - अभंग ११ ते २० संत नामदेवांनी गंगा नदीचे माहात्म्य इतके छान वर्णन केले आहे की, जणू प्रत्यक्ष गंगास्नानाचा भास होतो. Tags : abhangbooknamdevअभंगगंगामाहात्म्यनामदेवपुस्तक अभंग ११ ते २० Translation - भाषांतर (११)भक्ति करुनियां कोण वायां गेला । सांगा हो विठ्ठला निवडुनि ॥१॥द्वापाराचे अंती नामची सुकृत । अद्यापि निश्चित चालतसे ॥२॥नाम ऐकतां तरती निर्धारीं । व्याख्यान श्रीधरी टीकाकार ॥३॥नामा म्हणे राम व्यापीं त्रिभुवन । नाम तें निधान कलियुगीं ॥४॥(१२)देवाचें हें गुज सकळ मंत्रमय । जें कां नित्य ध्येय शंकराचें ॥१॥तें हें रामनाम सेवितां सर्वभावेम । रामरुप व्हावें निश्चयेंसी ॥२॥नष्ट अजामेळाचें पतितत्व गेलें । दिव्य देह जालें वालिमिकाचें ॥३॥शरीरसंपत्ति बळीनें देऊनि सकळ । केला द्वारपाळ नारायण ॥४॥कृष्णाविण दुजें नेणती कायावाचा । जाला पांडवांचा साहाकारी ॥५॥नामा म्हणे केशव भावाचा लंपट । भक्ताशीं निकट रतलासे ॥६॥(१३)नामाचें सामर्थ्य नेणें वेदशास्त्र । शेषाचीं वक्त्रें मौनावलीं ॥१॥गंगा गणपति चंद्र सूर्य श्रेष्ठ । शंकर वरिष्ठ मौनावले ॥२॥भीष्म पराशर उद्धव अंगद । ब्रह्मा मुचकुंद मौनावले ॥३॥नामा म्हणे येरे जाणे स्तुति । दाटोनि श्रीपती उभा केला ॥४॥(१४)करीं घेऊनि ब्रह्मविणा । नारद वोळगे नारायणा ॥१॥हेंचि हेंचि तत्त्वसार । नाम म्हणे निरंतर ॥२॥आपण शिव आणि शक्ति । रामनाम ते जपती ॥३॥गात नाचत प्रल्हाद वीर । खांबी केलासे अवतार ॥४॥कुंटिणी पक्षिया म्हणे रामा । तिसी नेलें निजधामा ॥५॥अहल्येसी लागतां चरण । तिसीं आलें मनुष्यपण ॥६॥अजामेळ पातकी अपार । नामें पावला पैलपार ॥७॥गजेंद्रें केलेम स्मरण । त्याचें तोडिले बंधन ॥८॥द्रौपदी स्मरे ह्रषिकेसी । वस्त्रें पुरविलीं तियेसी ॥९॥परीक्षितासी घडलें स्मरण । त्यासी जाले सुलभ चरण ॥१०॥नामा म्हणे निरंतरु । गगनीं अढळ केला धुरु ॥११॥(१५)अग्नी जाळी तरी न जळती पांडव । ह्रदयीं माधव म्हणोनियां ॥१॥अग्नी जाळी तरी न जळती गोपाळ । ह्रदयीं देवकीबाळ म्हणोनियां ॥२॥अग्नी जाळी तरी न जळे हनुमंत । ह्रदयीं सीताकांत म्हणोनियां ॥३॥अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद । ह्रदयीं गोविंद म्हणोनियां ॥४॥अग्नी जाळी तरी न जळे पैं सीता । ह्रदयीं रघुनाथ म्हणोनियां ॥५॥लंकेसी उरलें बिभीषणाचें घर । ह्रदयीं सीतावर धरिला म्हणोनिया ॥६॥नामा म्हणे तुम्ही स्मरावें गोविंदा । चूके भवबाधा संसाराची ॥७॥(१६)नामाचा प्रताप जाणवेना कोणा । समुद्रीं पाषाण तारियले ॥१॥आवडीनें कोणी चिंतितां उल्हास । काय तो तयास उपेक्षील ॥२॥कुंटिणी ते नीच राव्यासाठीं नेली । वैकुंठीं ठेविली सन्निधची ॥३॥अजामिळ खळ पुत्राचिया मिषें । उद्धरिलें त्यास दीनानाथें ॥४॥नामा म्हणे ऐसें सांगों आतां किती । नामापाशीं मुक्ति उभी असे ॥५॥(१७)आणीक ही मंत्र मोक्षदानी खरे । अशौचाचा थार असूं नये ॥१॥नाममंत्र कांहीं बाधेना कोणासी । जया अहर्निशीं रामकृष्ण ॥२॥तपाची मांडणी आकाशाचें खेव । इंद्रियांची हांव राहे तरी ॥३॥यज्ञ तो आचार धनाचें सांकडें । तरी जाण द्वाड स्वर्गमुख ॥४॥नामा म्हणे नाम साधकाची माता । जैसें तैसें घेताम भक्ति जोडे ॥५॥(१८)नामचि तो जाणे आन कांहीं नेणें । संसार नामाविणें जाईजेना ॥१॥नाम स्मरे त्यांसी संसारचि नाहीं । खुंटली ते पाही वेरझार ॥२॥नामा म्हणे त्याचें जळो जालेंपण । आळसी वायांविण संसाराची ॥३॥नामा म्हणे मज नामींच सौरसु । नाम स्मरे ह्रषिकेशु त्यासी पावे ॥४॥(१९)साराचेंहि सार भक्तीचें भांडार । नाम निरंतर गातां वाचे ॥१॥कासया करावें आणिक साधन । नामविण क्षण जाऊं नेदी ॥२॥दया शांति हेंचि पै भूषण । नामसंकीर्तन अहर्निशीं ॥३॥नामा म्हणे जप अखंड नामाचा । काळ हा सुखाचा सदोदित ॥४॥(२०)दग्धही होतसे आलें जें आकारा । असोनि निर्धारा नाम नाहीं ॥१॥नाम अनुभवे प्रपंचि हो ब्रह्म । जाहला सर्वोत्तम संत कृपें ॥२॥म्हणोनियां संतां जाऊनि शरण । साधावें निधान नाम ब्रह्म ॥३॥नामदेव म्हणे संताचिया कृपं । माजीं नाम सोपें नांदतसे ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP