मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|नाममहिमा| अभंग ९१ ते १०० नाममहिमा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० अभंग १५१ ते १६३ नाममहिमा - अभंग ९१ ते १०० संत नामदेवांनी गंगा नदीचे माहात्म्य इतके छान वर्णन केले आहे की, जणू प्रत्यक्ष गंगास्नानाचा भास होतो. Tags : abhangbooknamdevअभंगगंगामाहात्म्यनामदेवपुस्तक अभंग ९१ ते १०० Translation - भाषांतर ९१सदाशिवापुढें कोण अनुष्ठानी । अष्टांग लावूनि नमस्कारी ॥१॥नाम यज्ञ जप ऋषीश्वर ध्याती । शीतळ ते होती काळकूट ॥२॥सर्वांमाजीं श्रेष्ठ नाम कलियुगीं । रामकृष्ण जगीं नामनौका ॥३॥नामा म्हणे नाम अखंडित स्मरा । पांडुरंग भजा वेगीं ॥४॥९२ब्रह्मांडनायक विश्वाचा गोसावी । तो केला पांडवी म्हणियारा ॥१॥भावाचा लंपट भक्ताम पराधीन । सोडोनी अभिमान दास्य करी ॥२॥भाजीचिया पाना संतोषला हरी । जयाचे उदरीं चौदा भुवनें ॥३॥जनक श्रुतिदेवेम धरियेला करीं । दोघांचिये घरीम घेतो पूजा ॥४॥पुंडलिकें वीट बैसावया नीट । तेथें भूवैकुंठ वसतें केलें ॥५॥नामा म्हणे शरण रिघतां एक्याभावें । कैवल्य भोगावें नामामात्रें ॥६॥९३केशव कैवल्य कृपाळ । नारायणें उद्धरिला अजामेळ ।माधव मनीं धरा निश्चळ । गोविंद गोपाळ गोकुळींचा ॥१॥विष्णु विश्वाचा जिव्हाळा । मधुसूदन माउली सकळां ।त्रिविक्रमें रक्षिलें गोवळा । वामनें पाताळीं बळी नेला ॥२॥श्रीधरें धरा धरिली पृष्ठीं । ह्रषिकेश उभा भीवरेतटीं ।पद्मनाभ पुंडलिकासाठी । दामोदरें गोष्टी पांडवांशीं ॥३॥संकर्षणें अर्जुनासी संवाद केला । वासुदेवें अवचितां वाळी वधिला ।प्रद्युम्न समुद्रावरी कोपला । अनिरुद्धे छेदिला सहस्त्रबाहो ॥४॥पुरुषोत्तमें केला पुरुषार्थ । अधोक्षजें हिरण्यकश्यपा मारिली लाथ ।नरहरि प्रल्हादा रक्षित । स्मरावा अच्युत स्वामी माझा ॥५॥जनार्दनें रावणादि वधिले । उपेंद्रें अहिल्येसी उद्धरिलें ।हरि हरि म्हणताम दोष जळाले । कृष्णें तारिलें गणिकेसी ॥६॥या चोवीस नामांचें करितां स्मरण । जन्ममरणांचे होय दहन ।विष्णुदास नामा करी चिंतन । चरण ध्यान मज देई ॥७॥९४येऊनि संसारा । हित वेगीं विचारा ॥१॥स्मरा ह्रषिकेशी । तो नेईल परलोकासी ॥२॥गणिका नाम उच्चारी वाचे । जन्ममरण चुकलें तिचें ॥३॥अजामेळ पापराशी । नामें पावला मोक्षासी ॥४॥दूध मागों गेलें लेकरुं । तया दिधला क्षीरसागरु ॥५॥सापत्नी धुरु दवडिला । तो अढलपदीं बैसविला ॥६॥गजेंद्र स्मरत तांतडी । त्याची चुकविलीं सांकडीं ॥७॥नामा म्हणे नामबळें । उद्धरती कोटी कुळें ॥८॥९५हरीनाम गातां पवित्र । सेविती हरिहर ब्रह्मादिक ॥१॥नाम तारी नाम साहाकारी । नामें उच्चारी रुपें तुझीं ॥२॥ऐसीं अनंत नामें तुझीं न वर्णवती देवा । नामा म्हणे केशवा विनवितसे ॥३॥९६नाम घेताम भगवंताचें । पाश तुटती भवाचे ॥१॥जे जे नामीं रत जाले । ते ते केशवीम तारिले ॥२॥गणिका दुराचारी । नामें तारिली अहिल्या नारी ॥३॥महापापी अजामेळ । तोही तारिला चांडाळ ॥४॥नामें गजेंद्र तारिला । देवें मोक्षपदासी नेला ॥५॥नाम घेतसे पांचाळी । उभा बाप वनमाळी ॥६॥नामा सांगे भाविकंसी । नाम घ्यारे अहर्निशीं ॥७॥९७कुटिल कुबुद्धि कुपात्र कठोरी । अंगिकारी हरी अश्वत्थामा ॥१॥अश्वत्थामा अंबऋषि दुर्योधन । शेवटीं अर्जुन हितकारी ॥२॥मानी भावभक्ति आश्चर्य सकळ । शंकर शीतळ होय नामें ॥३॥नामा म्हणे आधीं नाममंत्र धोका । नाहीं भय धोका किमपिही ॥४॥९८नामाचा प्रताप काय सांगू वाचे । अक्षय सुखाचें स्थान दावी ॥१॥नामाविण कांहीं नाहीं नाहीं सार । साधावें सस्त्वर भले नोहे ॥२॥अजामेळ पाहा आजन्म पातकीं । नामें गेला सेखीं वैकुंठासी ॥३॥कुंटिणी जारिणी शुकामिसें गाय । वैकुंठासी जाय तत्क्षणीं ॥४॥पाहा वाल्ह्या कोळी उफराट्या नामें । भविष्य संभ्रमें वाखाणिलेम ॥५॥नामा म्हणे किती सांगावा निर्धार । साधन सोपारें नाम एक ॥६॥९९नाम न म्हणे आवडी । व्यर्थ वाचे बडबडी ॥१॥जिव्हा नव्हे ती वाचक । भोगी आळसें नरक ॥२॥करी आरालिया निंदा । परी न म्हणे गोविंदा ॥३॥असत्या आवडी । सदा वाचेसी रोकडी ॥४॥निंदेवांचूनि पातक । सत्या जाणा माझी भाक ॥५॥गर्जे नामाचे पवाडे । पायां कळिकाळ पडे ॥६॥निज सहज चैतन्य । नामा म्हणे नां जाण ॥७॥१००जयासी लागली रामनामाची गोडी । त्यानें केली प्रौढी परमार्थाची ॥१॥कलिमाजीं नाम सुलभ सोपारें । यालागीं आदर नामीं धरा ॥२॥आणिक साधनें आहेती उदंड । सेवितां वितंड कष्ट तेथें ॥३॥सोवळें ओवळें उंच नीच वर्ण । नाहीं येथें गुणदोष कांहीं ॥४॥नामा म्हणे सर्व सिद्धांताचा भाव । प्राणियांचें दैव कोण जाणे ॥५॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP