मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|नाममहिमा| अभंग १११ ते १२० नाममहिमा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० अभंग १५१ ते १६३ नाममहिमा - अभंग १११ ते १२० संत नामदेवांनी गंगा नदीचे माहात्म्य इतके छान वर्णन केले आहे की, जणू प्रत्यक्ष गंगास्नानाचा भास होतो. Tags : abhangbooknamdevअभंगगंगामाहात्म्यनामदेवपुस्तक अभंग १११ ते १२० Translation - भाषांतर १११एकचि क्षरलें एकचि देखिलें । ब्रह्म हें संचलें हरिनामें ॥१॥एक एकाकार सर्वही आकार । राम हा साकार सर्वांघटीं ॥२॥असोनी निराळा सुमनाचा वास । तैसा ह्रषिकेश जीवां सकळां ॥३॥नामा म्हणे सुमन कळिकाळें एक । तेंचि निजसुख घेई जना ॥४॥११२प्रसन्न वदन सदा विळ आहे । कां करिसी उपाव कर्म जाड ॥१॥मंत्रांचा पैं मंत्र बीज नाम हरीचें । तेंचि हें शिवाचें रामनाम ॥२॥तुटेल भवकंद जासील निजपंथें । झणीं तूं दुश्चितें करिसी चित्त ॥३॥नामा म्हणे भजन सर्व हरीचें करी । होईल बोहरी प्रपंचाची ॥४॥११३एकतत्त्व हरी निर्धार तूं धरी । प्रपंच बोहरी एका नामें ॥१॥अच्युत गोविंद परमानंद छंद । नित्य तो आल्हाद हरिनामीं ॥२॥ऐसा तूं विनटें हरी नामपाठें । जासील वैकुंठें नश्वरता ॥३॥नामा म्हणे तत्त्व नाम गोविंदाचें । हेंचि धरी साचें येर वृथा ॥४॥११४सर्वांमाजीं सार नाम श्रीहरीचें । अखंडीत वाच जप करी ॥१॥निशिदिनीं ह्रदयीं ध्यातो शूलपाणि । पाविजे निर्वाणीं मोक्षपद ॥२॥नामा म्हणे ऐसें स्मरे कां निधान । पावेल सदन वैकुंठीचें ॥३॥११५विठठलासी पाहे विठठलासी ध्याये । विठ्ठलासी गाये सर्वकाळ ॥१॥विठठल हा वृत्ति विठठल जपणें । चित्त वित्त मनें सर्वकाळ ॥२॥सबाह्य विठठल दाटे घनवट । दशदिशा अफाट विठ्ठलचि ॥३॥नामा म्हणे तुम्ही विठठल होऊन । अभंग भजन करीतसां ॥४॥११६सार पैं नाम विठठलाचेम आहे । दिननिशीं सोय मना लावी ॥१॥गुंपजेल मन जोडती पाउलें । तुटती घेतलें मायाजाळ ॥२॥नामचि कारण जप पैं सफळ । उद्धार निर्मळ सकळ जीवाम ॥३॥नामा म्हणे तो हा विठठल पंढरिये । नाम अमृतमर्य चराचरीं ॥४॥११७विठठनामीं आळस न करी गव्हरा । वायांचि वेरझारा शिणतोसी ॥१॥हरी उच्चारण करी हा विचार । नामचि साचार उद्धरण ॥२॥मी म्हणताम अहंता वाढे हे सर्वथा । परी भजनापरता नाहीं मार्ग ॥३॥मायाजाळ विषय तोडी तोडी सांठा । विठ्ठलनाम पाठा वोळगे जना ॥४॥सर्ग हें लटिकें मोहजाळ फिकें । नामेंविण एके नाहीं दुजें ॥५॥नामा म्हणे उपदेश भजे केशवास । वैकुंठनिवास वोळगे तुज ॥६॥११८तुझें तुज सांकडें पडलें थोर कोडें । तें करी माजीवडें ब्रह्मार्पण ॥१॥ब्रह्म हरी ध्याई मन ठेवीं ठायीं । विठठलाच्या पायीं दिननिशीं ॥२॥अनुभवग्रहणीं विठठल निशाणी । घडेल पर्वणी नित्यकाळ ॥३॥नामा म्हणे सुघड मन करी वाड । इंद्रियांची चाड धरुं नको ॥४॥११९ज्याचे मुखीं नाम तोचि एक धन्य । त्याचें शुद्ध पुण्य इये जनीं ॥१॥नामसंकीर्तन नित्य नाम वाचे । दहन पापाचें एका नामें ॥२॥ऐसा जो अखंड जपे रामनाम । नाहीं तयासम दुजें कोणी ॥३॥नामा म्हणे नाम विठठलाचें जपा । हाचि मार्ग सोपा परब्रह्मीं ॥४॥१२०सकळ साधनांचे सार । रामकृष्ण हा उच्चार ॥१॥म्हणा गोविंद नरहरी । सकळ जीवां तोचि तारी ॥२॥नाम घेतां हरी माधव । तरताती सकळ जीव ॥३॥नामा म्हणे केशव वाचे । धन्य जीवित वैष्णवांचें ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP