मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|नाममहिमा| अभंग १०१ ते ११० नाममहिमा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० अभंग १५१ ते १६३ नाममहिमा - अभंग १०१ ते ११० संत नामदेवांनी गंगा नदीचे माहात्म्य इतके छान वर्णन केले आहे की, जणू प्रत्यक्ष गंगास्नानाचा भास होतो. Tags : abhangbooknamdevअभंगगंगामाहात्म्यनामदेवपुस्तक अभंग १०१ ते ११० Translation - भाषांतर १०१नाम जींही उच्चारण केलें । तींही वैकुंठ साधिलें ।भवसागर पार पावले । उद्धरले हरिभक्त ॥१॥नाम दुर्लभ दुर्लभ । तारील हा पद्मनाभ ।पुंदलिकें करोनियां स्वयंभ । केशव मूर्ति केली उभी ॥२॥ऐसें अगाध हरी रुपडें । प्रत्यक्ष पुंडलिकापुढें ।भक्ती काज कैवाडें । भीमातरीं उभा असे ॥३॥वर्णावया न पुरे शेष । वेदां न घालवे कास ।तेथें शास्त्र काय घेती भाष । रुप वर्णावया हरीचें ॥४॥उद्धव अक्रूर द्वापारीं । त्यासवें खेळले हरी ।मग ते उद्धरिले अवधारी । ज्ञान देऊनि श्रीकृष्णें ॥५॥नामा म्हणे ऐसें नाम । हरिकथेसी धरी प्रेम ।तरी तुझा धन्य जन्म । मनुष्य जन्मीं असतां ॥६॥१०२हरिनाम पाठ हाचि भाव । हरी हरी हाचि देव । हरिविण न फिटे संदेह । सर्व जिवांचा जाण पां ॥१॥हरितत्त्व ज्याचे देहीं । तोचि तरला येथें पाही ।हरिविण या डोहीं । भवसागर कैसा तरेल ॥२॥रामकृष्ण वासुदेवा । हाचि सर्व जिवांचा विसावा ।येथें पोकारुनियां धांवा । विठ्ठलनाम उच्चारी ॥३॥नामा जपे ह्रदयीम सदा । रामकृष्ण हाचि धंदा ।हरिराम परमानंदा । हाचि जप जपतसे ॥४॥१०३पद तीर्थ दान हें सर्व कुवाडें । नाम एक वाड केशवाचें ॥१॥मुमुक्षु साधकीं सदा नाम गावें । तेणेंचिया व्हावें अखंडित ॥२॥विपत्तीचें बळें न होतां विन्मुख । नाममात्र एक धरा वाचे ॥३॥जीवन्मुक्त शुक मुनि ध्रुवादिक । तयासी आणिक ध्यास नाहीं ॥४॥नामयाची वाणी अमृताची खाणी । घ्यावी आतां धणी सर्वत्रांही ॥५॥१०४केशव नाम गाय माधव नाम गाय । विठ्ठल नाम गाय कामधेनु ॥१॥वेणुवादीं चरे पाणी पी भीवरें । ती गाय हंबरे भक्तालागीं ॥२॥भक्तीसुखें धाय प्रेमें तें पान्हाय । भुकेलिया खाय पातकासी ॥३॥नामा म्हणे गाय पंढरीसी आहे । पापिया न साहे पाठीं लागे ॥४॥१०५आदरें जपतां केशवाचें नाम । वैकुंठ हें धाम पायां पडे ॥१॥आणिक सायास करुनि कदापि । चौर्यांशींच्या सिपीं गुंफीं नका ॥२॥याजसाठीं हरिनाम निरंतरीं । तारील निर्धारीं भाक माझी ॥३॥भावभक्ती क्रिया नलगे आणिक । कीर्तन तारक म्हणे नामा ॥४॥१०६केशव म्हणतां क्लेश जाताती परते । त्याहुनि सरतें आणिक नाहीं ॥१॥वेद कां पढसी शास्त्रें कां शिणसी । उदंड वाचेसी हरी म्हणा ॥२॥याहुनि पैं सार नाहीं हो दुसरें । भीष्में युधिष्ठिर उपदेशिला ॥३॥नामा म्हणे धरा केशवीं विश्वास । तुटे गर्भवास नामें एकें ॥४॥१०७शेतीं बीज नेतां थोडें । मोटे आणिताती गाडे ॥१॥एक्या नामें हरि जोडे । फिटे जन्माचें सांकडें ॥२॥बाळे भोळे जन । सर्व तरती कीर्तनें ॥३॥नामा म्हणे नेणें मूढें । नाम स्मरावें साबडें ॥४॥१०८तोडीं हें बिरडें मोह ममता आधीं । विषय बाधा कधीं गुंफो नको ॥१॥असे घराश्रमीं भजे सर्वांभूतीं । मी माझें पुढतीं म्हणों नको ॥२॥तूं तंव लटिका आलासी कोठुनि । मी माझें म्हणोनि म्हणतोसी ॥३॥नामा म्हणे मूळ राम परब्रह्म । जगाचा विश्राम त्यासी भजे ॥४॥१०९मी म्हणतां अहंता होईल पूर्णता । भजन सर्वथा न घडे येणें ॥१॥आपुलें आपण विचारावें धन । हरि हाचि पूर्ण भजें कारे ॥२॥हेंचि भजन थोर करी निरंतर । नाम हें सधर मनें गिळी ॥३॥नामा म्हणे अपार नाम पारावार । श्रीराम सुंदर जप करी ॥४॥११०एकांत एकला सर्व आहे हरी । ऐसेंचि अहर्निशीं ध्यायिजे तूं ॥१॥सर्वांभूतीं विठठल आहे आहे साचे । हें तंव वेदींचे वचन जाण ॥२॥मार्ग हाचि सोपा गेले मुनिजन । जनीं जनार्दन हाचि भावो ॥३॥नामा म्हणे नाम मंत्र उच्चारण । सर्वही कारण होईल तुझें ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP