मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|नाममहिमा| अभंग १३१ ते १४० नाममहिमा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० अभंग १५१ ते १६३ नाममहिमा - अभंग १३१ ते १४० संत नामदेवांनी गंगा नदीचे माहात्म्य इतके छान वर्णन केले आहे की, जणू प्रत्यक्ष गंगास्नानाचा भास होतो. Tags : abhangbooknamdevअभंगगंगामाहात्म्यनामदेवपुस्तक अभंग १३१ ते १४० Translation - भाषांतर १३१मायेचा कळवळा मायाची जाणे । तैसें मी तान्हें माऊलिये ॥१॥विठठल श्रीरंग डोळस प्रसन्न । नित्य अमृतघन वोळला सदा ॥२॥जननी जनक तूंचि वो मुकुंद । नाम हें गोविंद शुद्धरसु ॥३॥येई वो केशवे नित्य नामरुपें । मी तुज आलापें आळवित ॥४॥माधवा श्रीधरा वेगीम येई त्वरें । मज वो नावरे प्रेमवेधु ॥५॥नामा म्हणे तूं जीवन आमुचें । नित्य केशवाचें प्रेम मज ॥६॥१३२केशवासी पाहे केशवासी ध्याये । केशवासी गाये सर्वकाळ ॥१॥केशव पैं हाचि वृत्तीसहित मन । केशववासी ध्यान सर्वकाळ ॥२॥सबाह्यअंतरीं सांडिना कोणासी । जाणों अंतरासी साक्ष भूत ॥३॥नामा म्हणे तुम्हीं केशव होऊनि । पंढरीं पाटणीं नांद बापा ॥४॥१३३वेदाचें महिमान जनीं जनार्दन । आणिक वचन तेथें नाहीं ॥१॥भूतीं दया धरा भक्तिभाव करा । हरिहरां वेद सांगे ॥२॥सर्व हेंचि सार ब्रह्ममय खरें । आणिक दुसरें न दिसे आम्हां ॥३॥नामा म्हणे समर्थ वेद तो आमुचा । सांगे नित्य जपा रामकृष्ण ॥४॥१३४साधन साधितां होताती आपदा । म्हणोनि गोविंदा स्मरे कां रे ॥१॥कृष्णकथा सार सांगे कां सधर । तुटेल येरझार जन्ममरणा ॥२॥निष्फळ निखळ भावीं तूं सफळ । भजन केवळ सर्वांभूतीं ॥३॥नामा म्हणे भक्ति होईल विरक्ति । तुटेल यातायाती जन्ममरण ॥४॥१३५भवसिंधुचा पार तरे तो पोहणार । बळिया परम धीर भजनशील ॥१॥नामची सांगडी लावूनि कासे । दृढ प्रेमरस वोसंडती ॥२॥सत्वाचा सुभट असंग एकट । वैराग्य उद्भट निर्वासन ॥३॥कामक्रोध जेणें घातले तोडरीं । निर्दाळिले वैरी लोभदंभ ॥४॥रजतमाचे जेणें तोडिले अंकुर । केला अहंकार देशधडी ॥५॥नामा म्हणे जया नामी अनुसंधान । तोचि परम धन्य त्रिभुवनीं ॥६॥१३६भवसिंधुचा पार तरावयालागीं । साधन कलियुगीं आणिक नाहीं ॥१॥अहनिंशीं नाम जपा श्रीरामाचें । सकळ धर्माचे मुगुटमणी ॥२॥न चले वर्णाश्रम धर्म आचरण । न घडे व्रत दान तप कोणा ॥३॥नव्हे तीर्थाटन पुराण श्रवण । नव्हे ब्रह्मज्ञान शास्त्रबोध ॥४॥नव्हे ध्यान स्थिती भावेंविण वोजा । न घडे देवपूजा एकनिष्ठ ॥५॥नामा म्हणे नाम राघोबाचें गातां । ब्रह्म सायोज्यता घर रिघे ॥६॥१३७तुटे मायाजाळ विघडे भवसिंधू । जरी लागे छंदू हरिनामाचा ॥१॥येर कर्मधर्म करितां या कलीं । माजी कोण बळी तरला सांगा ॥२॥न पढवे वेद नव्हे शास्त्रबोध । नामाचे प्रबंध पाठ करा ॥३॥नव्हे अनुष्ठान न कळे ब्रह्मज्ञान । करावी सोपान कृष्णकथा ॥४॥न साधे हा योग न करवे वैराग्य । साधा भक्ति भाग्य संतसंगें ॥५॥नामा म्हणे साधन न लगे आणिक । दिधली मज भाक पांडुरंगें ॥६॥१३८पंढरीचा राजा उभा भक्तकाजा । उभारुनि भुजा वाट पाहे ॥१॥घ्यारे नाम सुखें प्रेमें अलौकिक । साधनें आणिक करुं नका ॥२॥मनाचेनि मनें ह्रदयीं मज धरा । वाचेनें उच्चारा नाम माझें ॥३॥बोलोनियां ऐसा उभा भीमातीरीं । नामा निरंतरी चरनापाशीं ॥४॥१३९हरिहर ब्रह्मा इंद्रादिक देव । इच्छिताती सर्व पायधुळी ॥१॥यांवरी गोपाळ आनंदें नाचती । भूषणें श्रीपती शोभायमान ॥२॥पाहोनियां सुख आले सर्व देव । पंढरीचा राव पाहावया ॥३॥नामा म्हणे मिषें गोपाळकाल्याचे । निरंतर वाचे घेत नाम ॥४॥१४०वदनीं तुझें नाम अमृत संजीवनी । असतां चक्रपाणि भय कवण ॥१॥या जन्ममरणाची कायसी मग चिंता । तुझिया शरणागता पंढरीनाथा ॥२॥ह्रदयीं तुझें रुप बिंबलें साचार । तेथें कवण पार संसाराचा ॥३॥नामा म्हणे तुझें नाम वेळोवेळ । म्हणतां कळिकाळ पायां पडे ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP