मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|नाममहिमा| अभंग १ ते १० नाममहिमा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० अभंग १५१ ते १६३ नाममहिमा - अभंग १ ते १० संत नामदेवांनी गंगा नदीचे माहात्म्य इतके छान वर्णन केले आहे की, जणू प्रत्यक्ष गंगास्नानाचा भास होतो. Tags : abhangbooknamdevअभंगगंगामाहात्म्यनामदेवपुस्तक अभंग १ ते १० Translation - भाषांतर (१)नामाचा महिमा नेणेची पैं ब्रह्मा । म्हणोनियां कर्मा अनुसरला ॥१॥नाम हेंचि कर्म नाम हेंचि धर्म । केशव हेंचि वर्म सांगितलें ॥२॥नाम सुद्ध स्नान नाम शुद्ध संध्या । नामाविणें वेद आणिक नाहीं ॥३॥करितां आचमन केशव नारायण । करिती उच्चारण आधीं हेंचि ॥४॥लग्नाचिये काळीं म्हणती सावधान । लक्ष्मीनारायण चिंतन करा ॥५॥देहाचिये अंती प्रायश्चित्त देती । शेवटीं वदविती रामनाम ॥६॥ऐसिया नामापरतें नाहीं सार । गिरिजेसी शंकर उपदेशी ॥७॥करिती पितृश्राद्ध कर्म आचरती । शेवटीं म्हणती एको विष्णु ॥८॥नामें होय गति नामें होय मुक्ति । नामयाचे चित्तीं रामनाम ॥९॥(२)म्हणतां वाचे वंदी तया यम । काळादिकांसम तुज एका ॥१॥ऋद्धि सिद्धि दासी अंगण झाडिती । उच्छिष्टें काढिती मुक्ति चारी ॥२॥चारी वेद भाट होऊनि गर्जती । सनकादिक गाती कीर्ति तुझी ॥३॥सुरवरांचे भार अंगणीं लोळती । चरणरज क्षितिं शिव वंदी ॥४॥नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू । करी तो सांभाळू अनाथांचा ॥५॥(३)नामें सदा शुद्धि प्राणिया होतसे । नामापाशीं असे भुक्तिमुक्ति ॥१॥नामा ऐसें सोपें नाहीं त्रिभुवनीं । नाम संजीवनी साधकांसी ॥२॥नामें भक्ति जोडे नामें कीर्ति वाढे । नामें सदा चढे मोक्ष हातां ॥३॥यज्ञ दान तप नामें आली हातां । नामें सर्व सत्ता प्राप्त होय ॥४॥नामा म्हणे सदा नाम ज्याचे मुखीं । नाहीं याच्या तुकीं दुजा कोणी ॥५॥(४)नामें तो सरता नामें तो परता । नामें पंढरिनाथा भेटविलें ॥१॥नाम हेंचि तारी नाम भवसागरीं । उतरीं पैलतिरीं नाम तुझें ॥२॥नाम तें अंजन नामें बोधे मन । नामेंचि निधान चांगया जाला ॥३॥मार्गीं जातां तुम्ही उर्गेचि नसावें । वाचेसि म्हणावें रामकृष्ण ॥४॥रामकृष्ण हरी मुकुंदमुरारी । केशव नरहरी नारायण ॥५॥ऐसा हा सतत आठव नामाचा । नामा म्हणे कैचा दोष तया ॥६॥(५)चिंतातुर देहीं न साहे काजळी । नामाची पाजळी उभय दिवीं ॥१॥प्रकाश पडेल ब्रह्म हें दिसेल । वैकुंठ जोखेल भजनभक्तीं ॥२॥नाहीं यातीवर्ण नाहीं हें वेदोक्त । नार्मेचि संतृप्ति होती जीवा ॥३॥नामा म्हणे हेंचि बीजसार । तुटेल येरझार भवबंधाची ॥४॥(६)गोक्षीर लाविलें अंधळिया मुखीं । तेथील पारखी जिव्हा जाणे ॥१॥तैसे देवा तुझें नाम निरंतर । जिव्हेसी पाझर अमृताचे ॥२॥सोलूनियां केळें साखरें घोळिलें । अंधारीम खादलें तरी गोड ॥३॥द्राक्षफळां घड सेवितां चोखड । तयाहूनि गोड नाम तुझें ॥४॥आळूनियां क्षीर तुपाचिये आळे । कालविलें गुळें गोड जैसें ॥५॥जाणोनियां नामा करी विनवणी । अमृताची खाणी नाम तुझें ॥६॥(७)नामचि हें आहे पंचतत्त्वा ठाव । नाहीं दुजा भाव देखावया ॥१॥देखणारा जाहाल कर्पुराची वाती । नामाग्निं विश्रांती ठाई जाहाली ॥२॥द्वैताद्वैत तेथें नेणे जाणपण । गेलें हरपोन नामें सर्व ॥३॥नामदेव म्हणे अनाम तें नाम । नाना नामभ्रम तेथें दुजा ॥४॥(८)हडबडलीं पातकें । घेताम रामनाम एक ॥१॥राम म्हणतां तत्क्षणीं । चित्रगुप्तें सांडिली लेखणी ॥२॥घेऊनि पूजेचा संभार । ब्रह्मा येतसे समोर ॥३॥नामाम म्हणे जरी हें लटकें । तरी हें भंगो मस्तक ॥४॥(९)असत्याचें मूळ बैसलें ये वाचे । तें न फिटती साचे तीर्थोदकें ॥१॥हरीनामामृत प्रक्षाळी जिव्हेतें । पाणिये बहुतें काय करिती ॥२॥गंगासागरादी तीर्थे कोडीवरी । हरिनामाची सरी न पवती ॥३॥हरिनाम गंगे सुस्नात पै जाला । नाम्या जवळी आला केशिराज ॥४॥(१०)वैष्णव तो बळी । सदाशिव चंद्रमौळी ॥१॥त्याचा भक्त तो रावण । मारुनि छेदिला अभिमान ॥२॥आणिक तो बाणासूर । छेदिला शिवासमोर ॥३॥अनिरुद्धा समयीं ख्याती । केली तयाची फजिती ॥४॥भस्मासुर भस्म जाला । जाळुनियां भस्म केला ॥५॥मारुनियां मुक्त केलें । परि ते भक्त नाहीं जाले ॥६॥नामा म्हणे देवाधिदेव । भजावया पंढरीराव ॥७॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP