मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या ५५१ ते ६००

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ५५१ ते ६००

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


तैसाचि आत्मा सहजगति सच्चिदानंद चिन्मूर्ति ।
त्याचें प्रतिबिंब पडिलें वृत्तीं । तो हा जीव आभास ॥५१॥
आत्मत्वाच्या आहेपणें । जीव आहेसा केला मनें ।
जें आत्मयाचें चिद्रूप देखणें । तेणें होय जाणता ॥५२॥
न कळून आपली प्रियता । मीपणें मानी आभास स्फुरतां ।
एवं वाउगी उमटली आत्मता । नोळखोनि आत्मा ॥५३॥
तस्मात् येथें मुमुक्षूनें । स्वानुभवें विवेचन करणें ।
वास्तविक आत्मा तो अंग होणें । येर त्यागावा आभास ॥५४॥
हा मी जीवासह वृत्तीसी । जाणतसें उद्भवलयासी ।
उद्भव आणि लय जयासी । तो मी नव्हें सहसा ॥५५॥
जैसा पडिला पडिलियानें । मी नव्हें ऐसें जाणावें मनें ।
हा मी वृक्षीं बैसून पाहें नयनें । पडिलियासी ॥५६॥
यासी प्रयत्न दुजा नसे । अज्ञानें जालें तें ज्ञानें नासे ।
येथें विचाराचि पाहिजे मानसें । दृष्टताद्राष्टांतीं ॥५७॥
पाहणें नको गळ घालून । तेवीं न लगती नाना साधन ।
एक विचार पाहिजे परिपूर्ण । अंतवृत्तीचा ॥५८॥
एकदां विचारें कळेना । तरी विवेचन करावें पुनःपुन्हां ।
आणि गुरुमुखें श्रवण मनना । ज्ञान होय तों करावें ॥
सत्शास्त्र आणि सद्गुरू । आणि पाहिजे सद्विचारु ।
हीं तिन्हीही मिळतां वारंवारु । पाहिजे विवेचन ॥५६०॥
अति प्रयत्नें जें म्हणितलें । तें इतुक्याच हेतु पाहिजे कळलें ।
एकदां न कळतां तरी पाहिलें । पाहिजे वारंवार ॥
अधिकार नसतां बळें आणावा । अचाट बुद्धीनें विचार करावा ।
सद्गुरु धुंडून ठाईं पाडावा । बोधक स्वानुभवीं पूर्ण अधिकारी मुमुक्षूसी ।
सद्गुरु मिळे पूर्ण बोधासी । तरीही सत्शास्त्रेंवीण अन्यासी । भेदशास्त्रा काज नसे ॥
जें कां अभेद प्रतिपादक । जेथें आत्मा परमात्मा एक ।
तेंचि सत्शास्त्र निश्चयात्मक । श्रवण करावें ॥६४॥
एवं सद्गुरुमुखें सत्शास्त्रश्रवण । स्वतां विचारें विवेचन ।
वारंवार करणें या नांव प्रयत्न । अतिशयें करावें ॥६५॥
असो तें विवेचन केवीं करावें । तरी रविदत्ता सावध असावें ।
मुख्य आणि आभास निवडावे । सप्रतीतीनें ॥६६॥
आभास हा मिथ्या दिसे । बोधात्मा न दिसे परी असे ।
हा दृष्टांतद्वारां केला असे । कळे ऐसा संवाद ॥६७॥
येणें उपदेशें मुख्य अधिकारी । खुणेसि पावे तीव्रप्रज्ञ जरी ।
तथापि मंद जो मध्यम प्रकारी । तया प्रतीति न बाणे तरी तयासी निरूपण ।
वारंवार पाहिजे श्रवण । तेवींच अंतरीं विवेचन ।
सर्वदा व्हावें ॥६९॥
विवेचन म्हणजे मुख्य आभास । निवडावें भिन्न उपयांस ।
मुख्य आत्मा आपण निश्चयास । सदृढ यावा ॥५७०॥
आभास तो मिथ्यात्वें त्यागावा । त्याचा किंचित् न घ्यावा ।
तरी तोचि संवाद ऐकावा । एकाग्र होउनी हा आभास कोठून कोठवरी ।
असे तो बोलिजे निर्धारीं । हें ऐकून तयाचा करी ।
त्याग मिथ्यात्वें ॥७२॥
यो जागृत्स्वप्नयोरेव बोधाभास्र विडंबना ॥
स्थूलासहित ते जागृति । सूक्ष्मासह स्वप्नभ्रांति ।
या दोहीं अवस्थेप्रति । आभास विडंबन ॥७३॥
आभास म्हणजे मिथ्या भासे । जळीं प्रतिबिंब व्यर्थ जैसें ।
तयामाजीं नांव आलें असे । जडासी जीववी ॥७४॥
स्थूलदेह हा जडात्मक । हस्तपादादि आनख मस्तक ।
जो मागां बोलिला पांचभौतिक । पंचीकृत अन्नमय ॥७५॥
अपंचीकृत जीं तत्त्वें सत्रा । तोचि लिंगदेह स्थूलामाझारा ।
राहून करितसे देहव्यापारा । एकमेकां साह्यपणें ॥७६॥
स्थूलाविण लिंगदेहासी । घेतां नये भोग्यजातासी ।
सूक्ष्मविणही स्थूल जडासी । व्यापार कैचा ॥७७॥
म्हणून स्थूलदेहीं राहून । लिंगदेह करी विषयग्रहण ।
तया व्यापारा नामें दोन । स्वप्न आणि जागृति ॥७८॥
अंतःकरणवृत्ति ज्ञानेंद्रिय द्वारां । पंच विषयांचे येत सामोरा ।
भोक्ता जीव हा होय त्वरा । या नांव जागृति ॥७९॥
हे पांच तत्त्वांचे व्यापार पांच । कर्मेंद्रियांचीही क्रिया तैशीच ।
हें मागें सांगितलें आहाच । स्पष्ट करोनी ॥५८०॥
इंद्रियाविषय प्रत्यक्ष नसतां । त्यांचा ध्यास घेऊन अतौता ।
बुद्धीच कल्पी जीव तया भोक्ता । ते अवस्था स्वप्नं ऐसे हे स्वप्न जागृती दोन ।
व्यापार होती सर्व जीवांलागून । मिथ्यात्वें प्रतिभास असोन ।
भ्रांतीनें सत्य मानिलें अस्ति भाति प्रियरूप आपुलें ।
जें कां मुख्यात्याम्याचें लक्षण बोलिलें ।
तेंचि या आभासासी मानिलें ।
बिंबाचें प्रतिबिंब जेवीं या आभासाचे लक्षण । असज्जड दुःख संपूर्ण ।
हें टाकून आरोपी अज्ञान । अस्ति भाति प्रिय हेंचि ॥८४॥
प्रतिबिंबित देहद्वयांत । तो जीवही नेणोनि भ्रांत ।
उगाची सर्वही संघात । मी म्हणोन बैसला ॥८५॥
आणि तया सर्व संघाता । अस्ति भाति आरोपी प्रियता ।
हेंचि जाण विडंबन तत्त्वतां । असे तें त्यागिजे ॥८६॥
हस्त आहे पाद आहे । उदर कंठ मस्तक आहे ।
नख केश सर्व आहे । हेंचि विडंबन ॥८७॥
श्रोत्र आहे त्वचा आहे । चक्षू जिव्हा घ्राण आहे ।
वाचा पाणी पाद आहे । हेंचि विडंबन ॥८८॥
उपस्थ गुदही मीच आहें । प्राण अपान व्यान आहें ।
उदान आहें समान आहें । हेंचि विडंबन ॥८९॥
उपप्राणादि वायु आहें । अहंकार चित्त मीच आहें ।
बुद्धि मन अंतःकरण आहें । हेंचि विडंबन ॥५९०॥
गुण असती वृत्ति आहे । जीव असे सर्वही आहे ।
एवं अस्तित्वरूप सर्वां पाहे । हेंचि विडंबन ॥९१॥
तैसेंचि हस्तासी अंधारी कळे । पाद नखासी लागतां कळे ।
उदर कंठा बोटासी कळे । हेंचि विडंबन ॥९२॥
नख शिख अवघियांस कळे । दृष्टीसी पार्श्र्वभागासी कळे ।
मागें पुढें अधोर्ध्व कळे । हेंचि विडंबन ॥९३॥
श्रोत्रासी शब्द कळतसे । त्वचा हे स्पर्शा जाणतसे ।
डोळा रूपा ओळखीतसे । हेंचि विडंबन ॥९४॥
जिव्हा हें रसातें जाणे । सुगंध जाणून घेतसे घ्राणें ।
वाचा बोलोनियां जाणे । हेंचि विडंबन ॥९५॥
पाणी जाणें घेणें देणिया । उपस्थ जाणे मैथुनक्रिया ।
गुद जाणे विसर्गा यया । हेंचि विडंबन ॥९६॥
प्राण जाणे व्यान जाणें । उदान समान अपान जाणे ।
उपप्राणांसही होय जाणणें । हेंचि विडंबन ॥९७॥
अहंकार सर्वा जाणतसे । चित्त चिंतना ओळखीतसे ।
एवं हे अवघेचि जाणती । हेंचि विडंबन ॥९८॥
वृत्ति जाणे गुण जाणती । जीव तो जाणे सहजगती ।
एवं हे अवघेचि जाणती । हेंचि विडंबन ॥९१॥
ऐसें जडरूप सर्व असतां । ज्ञानरूपचि मानिलें तत्त्वतां ।
कोणीच नाही जाणिल्या परता । हेंचि विडंबन ॥६००॥

N/A

References : N/A
Last Updated : October 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP